स्किझोफ्रेनिक रूग्णांच्या कुटुंबियांनी काय करावे व काय करू नये
काय करावे
- व्यक्तीमध्ये अशी लक्षणे दिसली तर ताबडतोब उपचारासाठी त्याला डॉक्टराकडे घेऊन जा.
- रूग्ण औषधं सांगितलेल्या पध्दतीने वेळच्यावेळी घेतो का नाही इकडे जातीनं लक्ष द्या.
- रूग्णाच्या दररोजच्या कार्यक्रमामध्ये रस घ्या.
- रूग्णाने केलेल्या छोट्या छोट्या कामाचं सुध्दा कौतुक करा.
- त्याच्या सध्याच्या क्षमतेमध्ये होऊ शकेल अशी कामं त्याला द्या.
- आहे त्या परिस्थितीमध्ये दररोजची कामं करण्यासाठी त्याला उपयुक्त करा.
काय करू नये
- रूग्णाकडे दुर्लक्ष करणे.
- सामाजिक कार्यक्रमामध्ये आपण घेत असलेला सहभाग त्याच्या लक्षात येणार नाही, याची काळजी घेणे.
- रूग्णाला बरोबर घेऊन समाजात वावरतांना काळजी करणे.
- त्याच्या आजाराबद्दल त्याला लाज वाटेल किंवा अपराधी वाटेल अशी जाणीव करून देणे.
- त्याच्या आकलन शक्तीबद्दल उघड उघड अविश्वास दर्शवणे.
- रूग्णाने कामाची जबाबदारी टाळण्यासाठी कंटाळा केलेला चालवून घेणे.