Print
Hits: 4676

स्किझोफ्रेनिक रूग्णाचे अनुभव - काही नोंदी
माझी कुठलीही हालचाल सहजरीत्या होत नाही, मला प्रत्येकवेळा विचार करावा लागतो.’ मला जर पाणी प्यायचं झालं तर प्रत्येक बारीक बारीक गोष्ट आठवायला लागते’, कप शोधा, नळापर्यंत जा, नळ चालू करा, कप भरा, पाणी प्या. असं एक संपूर्ण चित्र तयार करावं लागतं व मनात असलेलं पहिलं चित्र पुसून नवीन चित्र तयार करावं लागतं.’

‘कुठलाही विचार मनात स्थिर रहात नाही, अगदी सेकंदभर सुध्दा. विचार मनात येतो व जातो’. ‘माझा मेंदू बरोबर काम करत नाही, मनात आलेले विचार व ते मांडणं ह्यामधे समन्वय रहात नाही. त्यामुळे बोलताना माझे हातवारे होतात व शब्द नंतर येतात. काहीसं मुक्या माणसासारखं होतं’.

निश्‍चित विचार करण्याअगोदर दोन तीन निरनिराळे विचार आधी मनात येतात व नंतर एक विचार पक्का होतं मला जे बोलायचं असतं त्या अनुषंगाने शब्द न येता निराळेच शब्द बाहेर पडतात व मला जे म्हणायचं असतं ते राहून जातं. त्यामुळे लोकं निराळंच काहीतरी ऐकतात व त्यांचा समज चुकीचा होतो.

काही माणसं मी मुर्खासारखं बोलत आहे असं समजतात. मला मग परत विचार करायला लागतो, बोलता बोलता अचानक काय म्हणायचं तेच डोक्यातून जातं आणि मी एकदा काहीतरी चुकीचं बोलून जातो.

(च्यापमन - १९६६ दि अर्लि प्रॉब्लेमस्‌ ऑफ स्किझोफ्रेनिया - ब्रिटीश जनरल ऑफ सायकिऍट्री - ११२,२२५ -२५१ मधून उधृत केलेला उतारा.)