Print
Hits: 4404

एकविसावे शतक आज आपल्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले आहे. मानवी जीवनातल्या अनेक उत्क्रांत्या आपण पाहिल्या आहेत. क्षणक्षणाला क्रांती करणार्‍या या जगात ताणतणाव वाढतच आहेत.

नाना त-हेच्या मानसिक तणातणावांनी निर्माण झालेल्या शारीरिक आजारांबरोबर मनाच्या अनेक व्याधींनी आज सा-या जगभर आपले पाय घट्‌ट रोवले आहेत.

मानसिक आजार हा चिकट, चिवट, प्रदीर्घ मुदतीचा आणि काहीसा शाप वाटणारा ठरू पाहात आहे. अशा आजारांमुळे व्यक्तीचे वैयक्तीक आणि समाजाभिमुख जीवनही अत्यंत अवघड बनत जाते. मानसिक आजार व त्याचे उपचार यांबाबतची फारशी जागरूकता अजूनही सामान्य जनमानसात नसल्याने या व्यक्ती एका अर्थी अपंगच होत उपचार यांबाबतची फारशी जागरूकता. अजूनही सामान्य जनमानसात नसल्याने या व्यक्ती एका अर्थी अपंगच होत जातात. या व्यक्तींना त्यांच्या या मानसिक अपंगत्वातून आणि असमर्थतेतून बाहेर काढून सक्षम आणि समर्थ बनवायचे असेल तर औषधोपचारांबरोबर नितांत गरज आहे ती समाजाभिमुख मानसिकतेच्या पुनर्वसनाची!

याच पुनर्वसनाच्या प्रक्रियेला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्‍न करणारी एक संस्था-चैतन्य मेंटल हेल्थ केअर सेंटर (चैतन्य मानसिक आरोग्य सेवा केंद्र).

वैफल्याने ग्रासलेल्या, मनाने कोसळलेल्या, नैराश्याने मानसिक दृष्ट्या विकलांग झालेल्या, भावनिक आधाराची गरज असणार्‍या पण जगाशी नव्याने, निकोप दृष्टीने नाते जोडू इच्छिणार्‍या सा-या जणांसाठी ‘चैतन्य’ ने नवे दालन उघडले आहे.

आवश्यकतेप्रमाणे अधिकांत अधिक नऊ महिने ते एक वर्ष एवढ्या अनेक सुविधांचा लाभ घेता येईल. मानसिक आरोग्य क्षेत्रातील विविध तज्ञांचे ज्ञान रूग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. आजार आपल्या श्वासोच्छ्‌वासाइतक्या सहजतेने कसा स्वीकारावा, जीवनातील कटु पण सहज सत्याला खंबीरपणे आणि दृढनिश्‍चयाने कसे सामोरे जावे व आपले मनोबल कसे वाढवावे याच उत्तम मार्गदर्शन येथे केले जाईल. मानसिक आजाराच्या पुनर्वसन-प्रक्रियेचा खर्‍या अर्थाने सर्वांगीण विचार करणार आहे.

चैतन्यची ध्येयधोरणे

सेवा केंद्रात उपलब्ध असणार्‍या सुविधा
चैतन्य मानसिक आरोग्य सेवा केंद्रात उपलब्ध असणार्‍या सुविधा. या सुविधांचा तीन पातळ्यांवर विचार करता येईल.

वैयक्तिक - मनोरूग्णांना या केंद्रात राहता असताना खालील सुविधांचा लाभ घेता येईल

  1. औषधोपचार (फारमॅकॉलॉजिक ट्रीटमेंट)
  2. दिवसांतील सक्रियतेचे वेळापत्रक (ऍक्टिव्हिटी शेड्युलिंग)
  3. वैयक्तिक समुपदेशन/मानसोपचार (इंडिव्हीज्युअल काउन्सेलिंग अँड सायकोथेरपी)
  4. गट - उपचार पध्दती (ग्रुप थेरपीज्‌)
  5. वर्तनोपचार (बिहेवियर थेरॅपी)
  6. योगोपचार (योगो थेरपी)
  7. चलनवलन - उपचार (मूव्हमेंट थेरपी)
  8. शेती व बागकाम उपचार (ऍग्रिकल्चरल अँड हॉर्टिकल्चरल थेरपी)
  9. कलासंयुक्त उपचार (आर्ट थेरपी)
  10. मनोरंजनात्मक उपचार (रिक्रिएशनल थेरपी)

संपर्कासाठी +९१ २० २६९३४०७८ / २६९३४०७९ / २६९३००६० किंवा
इ-मेल:This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.