सहचरी मदत गट
व्यसनमुक्तीच्या वाटेवरची सर्वात पहिली पायरी म्हणजे स्वमदत गट शोधणे होय!
सामान्यत: व्यसनी आणि मद्यपी माणुस एकलकोंडा असतो. ऐकाकी असतो. म्हणूनच सगळ्यात प्रथम त्याचा एकाकीपणा त्याचं एकटेपण संपायला हवे. कुठल्याही स्वमदत गटात जावून हे एकाकीपण कमी करणं हा सर्वांत परिणामकारक उपाय आहे. अशा गटात गेल्यावर सुध्दा आपल्या पैकी अनेकांना एकटं एकटं वाटतंच राहतं. या कलेत आपले हात धरणारे फारच थोडे असतात! लक्षात ठेवा बदल क्षणार्धांत होत नाहीत. म्हणूनच म्हणतात. ‘येत राहा’ व्यसनमुक्तीसाठी स्वमदत गट हे एक साधन आहे. पण त्या साधनाचा उपयोग मात्र करायला हवा. स्वमदत गट तुम्हाला व्यसनमुक्त करणार नाही. इथे तुम्हाला एक सुखावह वातावरणात असण्याचा अनुभव मिळेल. या गटातल्या मित्रांच्या व्यसनमुक्तीच्या अनुभवातून जी प्रेरणा, शक्ती आणि आशा सापडेल त्याचा उपयोग करून पाहण्याची संधी मिळेल. इथे समजलेली तंत्रे वापरून बघता येतील.
इथे आल्यानंतर (सवयीने!) लगेचच कुठेही निष्कर्ष काढून निर्णय घेवू नका. स्वमदत गटाचा उपयोग होतोच! फक्त तुमच्या आयुष्यात फायदा होण्याची संधी तुम्हीच द्यायला हवी. जे रूचतं तेवढचं स्वीकारा आणि अंमलात आणा.
बर्याचदा तुम्हाला वाटेल, ‘याचा काही उपयोग नाही.’ किंवा आतून वाटेल, ‘माझ्यात बदल होणं शक्यच नाही’ ‘मी जे काही करतोय ते बहुतेक बरोबर नाही!’ असे विचार तुम्हाला सतावतील! पण तरीही तुम्ही येत राहा!
तुमचे प्रश्नं, तुमच्या समस्या इतरांपेक्षा ‘खास’ वेगळ्या आहेत असं काही समजू नका, स्वमदत गटाचा उपयोग प्रत्येकाला होतोच. फक्त येत राहा. व्यसनमुक्तीसाठी थोडेसे प्रयत्न करावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. पण मित्रांनो, तुमच्या स्वत:पेक्षा तुमच्या प्रयत्नांची किंमत का जास्त आहे?
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी सर्वाधिक मौल्यवान व्यक्ती आहात! आणि तुम्ही मौल्यवान ठरण्यास निश्चितच समक्ष आहात. म्हणून थोडीसी चिकाटी, थोडासा संयम आणि स्वत: बद्दलची थोडीसी काळजी असणं एवढं गरजेचं आहे!
तुमच्या सुचनाचं स्वागत आहे! तुमचं मत मोकळेपणानं सांगा, तुमच्या प्रतिसादावरच हा गट उभा राहणार आहे. तुमचा व्यसनमुक्तीचा प्रवास सुखाचा, आनंदाचा आणि समृध्दीचा व्हावा!
कुंटुबियासांठी स्वमदत गट
व्यसन हा एक सर्वव्यापी आजार आहे आणि त्यामुळे कुंटुबजीवन अतिशय त्रासदायक होते. कुटुंबीयांना कोंडीत सापडल्यासारखं होत. कुटुंबातल्या जवळच्या माणसांना जास्तच भावनिक त्रास होतो. आणि नैराश्य, चिंताग्रस्त आणि इतर मनोकायिक आजार होऊ शकतात. कुंटुबियांना सर्वसाधारण पण असे त्रास अनुभवायला येतात.
व्यसनाचेच विचार: कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. डोक्यात फक्त त्याच्या बद्दल आणि त्याच्या व्यसनाबद्दलच विचार असतात.
नैराश्य: त्याच्या व्यसनमुक्तीसाठी कुंटुंबीयांकडुन केलेले प्रयत्न अपयशी ठरल्याने त्यांना नैराश्य येतं.
मुक्तांगण व्यसनमुक्ती सल्ला केंद्र.
नारायण पेठ, पुणे.
गटाचं काम मुक्तांगणच्या उपसंचालक मुक्ता पुणतांबेकर करतात.
अल ऍनान
मद्यपी व्यक्तींच्या कुटुंबीयांचा हा स्वमदत गट आहे. बारा पायर्यांच्या कार्यक्रमावर, हा गट काम करतो. व्यसनी व्यक्तींचे कुटुंबीय, नियमितपणे भेटतात आणि प्रसन्नता टिकवायची आहे/हवी आहे अशा व्यसनी व्यक्तीच्या कुंटुंबीयांना येथे विनामूल्य सदस्यत्व आहे. ही जागतिक पातळीवर काम करणारी संघटना असून, भारतातील मुख्य शहरात त्याच्या सभा चालतात. पुण्यातील सभा दर गुरूवारी/रविवार संध्याकाळी ७.३० वाजता लक्ष्मणराव आपटे प्रशाला, आपटे रस्ता, डे. जिमखाना पुणे ४
अलटिन
हा मद्दपी व्यक्तींच्या मुलांसाठीचा गट आहे. आता हे सिध्द झालं आहे की, व्यसनी व्यक्तींची मुले भावनिक दृष्ट्या अधिक संवेदनशील असतात. व्यसनाधिनता आणि आनुवांशिकता यांचा संबंध असल्याने मुलांना व्यसनापासून स्वत:ला वाचविण्याचीही गरज असते. त्यांनी त्याच्या जीवनात प्रसन्नता ठेवत, व्यसनी पालकाशी नातं टिकवायचं असतं या सभा अल्आ ऍनोन सभेबरोबरच होतात.
वैवाहिक मार्गदर्शन: सहजीवन गट
व्यसनाचा सर्वाधिक परिणाम पती-पत्नी नात्यावर होतो. म्हणुनच उपचारानंतर लगेचच, व्यक्तीला या नात्यात सुधारणा घडविण्यासाठी अग्रक्रमानं प्रयत्न करायला सांगितलं जातं. व्यसनी व्यक्ती आणि त्याची पत्नी अशा जोडप्यांसाठी हा गट मुक्तांगण मित्राने स्थापन केला आहे.
ओझ्याची जाणीव
व्यसनी व्यक्ती त्याच्या जबाबदार्या पेलत नसल्यामुळे कुटुंबाच्या जबाबदार्या वाढतात. आणि आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदार्यांच्या ओझ्यामुळे ते दबून जातात.
अपराधीपणा - समाज अनेकदा व्यसनाचं कारण म्हणजे त्याच्या कुटुंबीयाचं वर्तन असे प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष आरोप करीत असतो. त्यामुळे त्यांना अपराधी वाटायला लागतं. अशा बहुसंख्य व्यक्तींना त्यांच्या समस्या आस्थापूर्वक समजून घेऊन नातं जोडणारं कुणी भेटत नाही. याशिवाय व्यसनी व्यक्तीलाही व्यसनमुक्तीसाठी मदत करण्याची त्यांची जबाबदारी त्यांना पूर्णपणे झटकूनही टाकता येत नाही. म्हणूनच स्वमदत गट आणि आधारगट त्यांच्यासाठी अत्यावश्यक ठरतात.
कुंटुंबीयांसाठी असलेले काही स्वमदत गट
सहचरी - मुक्तांगण मित्राचा व्यसनी व्यक्तींच्या पत्नींचा हा गट आहे. या गटाची अशी धारणा आहे की पत्नी, पतीचं व्यसन नियंत्रित करू शकत नाही, बरं करू शकत नाही आणि सर्वात महत्वाचं त्याच्या व्यसनाला त्या अजिबात कारणीभूत नाहीत. एकदा का हे तत्व स्वीकारलं की त्या अजिबात कारणीभूत नाहीत. एकदा का हे तत्व स्वीकारलं की त्या पतीला व्यसनमुक्तीसाठी सकारात्मक मदत करू शकतात. हे करत असतानाच या गटातील स्त्रियांनी आपल्या त्रासदायक सवयीचे आत्मपरीक्षण करावं आणि त्या बदलण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा असते.
महिन्यातुन या गटाच्या सभा होतात. अनुभवकथन, चर्चा, वैयक्तिक मार्गदर्शन आणि पाहुण्यांकडून मार्गदर्शन अशा प्रकारे सहचरीचं काम चालतं.
सभाच्या जागा आणि वेळा अशा:
- महिन्यातल्या दुसर्या सोमवारी - संध्याकाळी साडेसहा वाजता, मुक्तांगण व्यसनमुक्ती सल्ला केंद्र, नूतन भारती सोसा. माती गणपती जवळ, नारायण पेठ, पुणे ३०
- महिन्यातल्या दुसर्या गुरूवारी - सकाळी अकरा वाजता. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, आळंदी, पुणे ६.
- वैयक्तिक मार्गदर्शन - दर सोमवारी संध्या. ५.३० ते ७.३०
महिन्यातून दोनदा या गटाच्या सभा होतात. वर्षातून एकदा कार्यशाळा घेतली जाते. या गटात, अपेक्षा आणि मागण्या, प्रेम घरातील मतभेद आणि भांडणे, समंजस पालकत्व अशा वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. या सभा चर्चेच्या अंगाने भरतात आणि मोकळेपणे सर्वांनी बोलावं म्हणून उत्तेजन दिले जाते. जून्या सभासदांच्या अनुभवातून नवी जोडपी बरच काही शिकतात. ह्या सभा डॉ. अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी, मुक्ता पुणतांबेकर घेतात.
गट छोट्यामोठ्या सहलींचा आयोजनही करतो, आणि जोडप्यांना नवे आस्था असलेले मित्र-मैत्रिणी भेटतात.
सभांच्या जागा - वेळा:
महिन्याच्या शेवटच्या बुधवारी संध्या. ६.३० वाजता
मुक्तांगण व्यसनमुक्ती सल्ला केंद्र
नारायण पेठ, पुणे ३०
महिन्याच्या तिसर्या गुरूवारी दु. १२ वाजता
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र
आळंदी रस्ता, पुणे ६
पुनर्वसनासाठी मदत
व्यसनी व्यक्तीला नोकरी मिळवणं ही मोठी समस्या असते. भारतातील बेकारीची समस्या लक्षात घेता हा प्रश्न अजूनच गंभिर बनतो.
माणसाकडे गुणवत्ता, कौशल्य, शैक्षणिक पात्रता, असून सुध्दा त्यांना नोकरी मिळत नाही. काळ्या भूतकाळचं सावट त्यांना नोकरीपासून दूर ठेवतं. आय. एल. ओ. सारख्या अपवादात्मक संघटना, स्वतःची पायावर उभे राहण्यासाठी मदत करतात. पण गरजेच्या तुलनेत मदतीचे पर्याय फारच थोडे आहेत.
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. ने अशा व्यक्तींना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची सुरूवात केली आहे. प्रथम अशा व्यक्तींची एक डेटा बँक तयार केली जाईल आणि जिथे जागा भरणे आहे अशा ठिकाणी त्यांची माहिती शिफारशीसह दिली जाईल. आपल्या मौल्यवान प्रतिक्रीया येथे स्वागताहार्य आहेत.