Print
Hits: 3698
Shake Hand शेक हॅन्ड

२६ जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त ‘मुक्तांगण मित्र’ ही संस्था वेगवेगळे जनजागृती साठी उपक्रम राबवत असते.

विषय: व्यसनमुक्ती: स्वत:ला शोधताना
यात विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले मुक्तांगणचे व्यसनमुक्त मित्र व कुटुंबिय भाग घेणार आहेत. तसेच प्रयोगिक तत्वावर पुण्यामधिल एका आरोग्यावरील वेबसाईट आरोग्य डॉट कॉम बरोबर सहकार्य करून जनजागृती करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

आरोग्य डॉट कॉम या साईटवर पुणे व पुण्याबाहेरील बर्‍याच जणांनी मदतीसाठी विचारणा केली होती त्यातूनच हा विचार पुढे आला.

डॉ. अनिल अवचट हे Online Counselling करतील ज्यांना माहिती मदत पाहिजे त्यांना डॉ. अवचट e-mail च्या मदतीने मदत देतील. तसेच आरोग्य स्वमदत गटाच्या (Support Group) मदतीने व्यसनमुक्त मिळवून देण्यासंबंधी मदत करणे.

व्यसनमुक्तीच्या स्वमदत गटाशी आपण This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. येथे संपर्क साधावा.
ही सर्व सेवा विनामूल्य देण्यात येणार आहे.

व्यसनमुक्त रहाण्याच्या रूग्णांच्या पत्‍नींचा एक स्वमदत गट तयार करून त्यांना या आजाराबरोबर लढा देण्यास व स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करणे. इतर संस्था बरोबर संपर्क साधून एक जाळे तयार करणे. सर्व कामामध्ये आपल्या बहुमोल सहकार्याची अपेक्षा आहे. कारण व्यसनमुक्त समाज हे आपले स्वप्न आहे.

आपल्या नव्या प्रवासासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा!!!
मुक्तांगण आरोग्य स्वमदत गटाच्या मदतीने बर्‍या होणार्‍या रूग्णांसाठी नोकरी व व्यवसाय देण्याचा प्रयत्‍न करित आहेत. मुक्तांगण मित्र व आरोग्य स्वमदत गट यांनी आणखी काही संस्थांबरोबर काही प्रकल्प राबवायचे ठरवले आहे. ती नावे पुढील प्रमाणे:

पुणे महानगरपालिका
आय. पी. एच्‌.
यु. एन्‌. डी. सी. पी.
सर्च
एन्‌. आय. एस्‌. डी.
आय्‌. एल्‌. ओ.
व्यसनमुक्तीच्या वाटेवरचा - स्वमदत गट