Print
Hits: 4872

आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी व्यसनापासून दुर राहणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मनात वेगवेगळ्या विचारांचे वादळ घोंघावत असते. व्यसनावर आपण आजवर विश्वासू मित्राप्रमाणे भरोसा ठेवला आहे. तो आपाल्याला सर्व नकारात्मक विचारांपासून सुटका देतो असा आपण सतत विचार करत असतो.

  1. जेव्हा मी दुःखी व निराश होतो तेव्हा मी व्यसन केले आणि मी आनंदी झालो.
  2. जेव्हा मी निराश व एकांतवासात होतो तेव्हा व्यसनानी माझ्या प्रत्येक दुःखात मित्रत्वाचे पालन करत माझे दुःख वाटून घेतले.
  3. असा निकटवर्ती जो मला कधीच निराश होऊ द्यायचा नाही. अशा अजाणपणामुळे आपण नकळत व्यसनाशी अदृश्य अशा साखळीने बांधले जातो. अशावेळी आपल्याला आपल्या कुटुंबाच्या किंवा व्यसनाशी संबंध नसलेल्या मित्रांच्या कोणत्याही गोष्टीत रस वाटत नाही. आपणच समाजापासून स्वतःला तोडतो व व्यसन आपल्याला सभोवताली कुंपण घालून बंदिस्त करते.

व्यसनाचा तो चमत्कारिक आनंद आपल्याजवळ फार काळ टिकत नाही. व्यसन आपल्या पाशात आपल्याला अडकवत जाते. आपण एकवेळ उदास होतो, गोंधळून जातो व दुःखी होतो. नंतर एकवेळ अशी येते की आपल्याला व्यसनाशिवाय जगता येईल हा विचारही करवत नाही.

  1. मी या माझ्या समजुतीशिवाय, व्यसनाशिवाय कसा जगू शकेन?
  2. मी माझ्या समस्यांना कसे तोंड देऊ?

हे विचार आपली मानसिक कुचंबणा करतात.

बालनने सांगितलेले त्याचे अनुभव पाहुयात. व्यसनापासून तीन आठवडे दूर राहिल्यानंतर मी माझी व्यसनाची प्रबळ इच्छा थांबवू शकलो नाही. मी फारच कमी प्रमाणापासून सुरवात केली होती. मला तेवढ्या प्रमाणातच थांबायचे होते पण अपयशी ठरलो. अपयशी ठरलो कारण नियंत्रण राहीले नाही, शक्तीहीन झालो, पुन्हा नेहमीच्या प्रमाणातच व्यसन करु लागलो. आता मला या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी मदतीची आवश्यक्ता होती. इथे मी पहिला धडा घेतला. मी आता व्यसन करुन अजिबात चालणार नाही थोड्या प्रमाणासाठीही नाही. काही वर्षांनीही नाही. माझ्या मनावर हे बिंबवले गेले की व्यसन माझ्यासाठी मृत झाले आहे.

पुढे तो म्हणतो,
मृत हा शब्द मला माझ्या वडलांची आठवण करून देतो. जेव्हा मी १४ वर्षांचा होतो तेव्हा माझे प्रिय वडील वारले. हा माझ्यासाठी, माझ्या भावासाठी, कुटुंबातील सर्वासाठी खुप मोठा धक्का होता. माझी आई खूप दुःखी झाली होती. ती खूप घाबरलेली होती जणू या गोष्टीचा तिने धसकाच घेतला होता.

हे सत्य नाही आहे, माझे पती मला सोडून जाऊ शकत नाही. नाही असे होऊच शकत नाही. मधूनच ती रागाने भडकायची, पुन्हा निराश व्हायची. ती हे मान्य करायला तयारच नव्हती की तिचे पती तिला कायमस्वरुपी सोडून, फार दूर निघून गेले आहेत. जेव्हा ती भितीने सैरभैर झाली होती तेव्हा तिला समजवण्यासाठी आजुबाजूचे काही लोक तिला समजवण्यासाठी आले होते त्यापैकी काही जणांना मी ओळखत होतो काही माझ्या ओळखीचे नव्हते.

त्यांना काय झाले होते?
एवढ्या कमी वयात जायला त्यांना असे काय झाले होते? ते आजारी होते का? हेच प्रश्न प्रत्येक जण विचारत असे. माझी आई रडत असे आणि प्रत्येकाला कसे झाले? काय झाले? समजावून सांगत असे. तिला त्याच त्याच गोष्टी सांगण्याचा कंटा