Print
Hits: 4607

व्यसनमुक्तीसाठी योगविद्येचे योगदान
व्यसनमुक्तीचे नैसर्गिक मार्ग (Natural Ways for Deaddiction)
प्रश्नोत्तरे:
ड्रग्सच्या व्यसनाचे वेद्यकीय दुष्परिणाम काय आहेत ?
जी माणसे व्यसनाधीन आहेत त्यांना अनेक वेद्यकीय समस्यांना सामोरे जावे लागते. जसे कर्करोग, ह्रदय विकार, फुफ्फुसांचे आजार इत्यादी. स्कँनिंग, एक्स रे, रक्ततपासणी इत्यादी चाचण्यांद्वारे आपल्याला हे समजू शकते. उदा. काही टेस्टमुळे हे कळते की तंबाखू, स्मोकिंग मुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसांचा, रक्ताचा, किडनीचा कर्करोग झाला आहे की नाही. किंवा काही ड्रग्स मुळे मेंदूमधे असंतुलन होते, ते सुद्धा मेंदूसाठी आणि मज्जासंस्थेसाठी हानिकारक असते.

ड्रग्स सेवनामुळे मानसिक असंतुलन होऊ शकते का? किंवा मानसिक असंतुलनामुळे माणूस ड्रग्स सेवनाकडे वळतो का?
ड्रग्स सेवन आणि मानसिक असंतुलन ह्या दोन्हीही हातात हात घालून चालणा-या गोष्टी आहेत. ड्रग्सच्या अतीसेवनामुळे अनेक व्यसनाधीन माणसांचे मानसिक असंतुलन होताना दिसते. काही विशिष्ट प्रकृतीच्या माणसांमधे आणि व्यसनांमधे हे प्रमाण जास्त आढळते.

ड्रग्सच्या व्यसनामुळे घरातील इतरांना कोणकोणत्या आपत्तींना सामोरे जावे लागते?
व्यसनाधीनतेच्या भीषण दुष्परिणामांना व्यसनी माणसांना तर तोंड द्यावे लागतेच, परंतु व्यसनाच्या आपत्तीचे दुष्परिणाम कुटुंबियांच्या तब्येतींवर सुद्धा होतात. उदाहरणार्थ:
- गरोदर स्त्रीच्या तब्येतीवर, लहान बाळावर लगेच त्याचे परिणाम दिसतात. आणि ते परिणाम फक्त शारिरीक तब्येतींवरच होतात असे नाही, तर मानसिक परिणाम, वागण्यातले बदल ह्या गोष्टी सुद्धा दिसतात. गरोदर स्त्रीचा मानसिक ताण वाढणे, निरुत्साही होणे असे बदल सुद्धा दिसून येतात. लहानबाळांवर व्यसनामुळे हे परिणाम होतात, परंतु त्याचे फळ लगेच दिसेल असे नाही. ती मुले वाढीच्या काळात असताना नंतर अचानक सुद्धा त्यंच्यात वागण्यातला बदल, मूड सतत बदलणे असे परिणाम दिसतात.

एखाद्या गोष्टीच्या आहारी जाण्याचे काही विशिष्ट दुष्परिणाम दिसून येतात का?
निकोटीन हे एक ऍडिक्टिव स्टीमुलन्ट आहे जे सिगारेट, तंबाखू मध्ये आढळते.
तंबाखू सिगारेट च्या सेवनाने कर्करोग, ब्रोंकायटल डिसऑर्डर होण्याचा धोका जास्त असतो. दारुच्या सेवनाने मेंदू आणि शरीरातील बरेच अवयव खराब होतात. मेंदुतील काही विशिष्ट भाग विषेशत: सेरेब्रल कॉर्ट्रेक्स वर परिणाम होतो.
सर्वात जास्त वापरले जाणारे मेरुआना हे ड्रग आहे. हे ड्रग स्मरणशक्ती, कार्यक्षमता, यांवर परीणाम करते तसेच ह्रदयाचे ठोके वाढवते, फुफ्फुसांना इजा करते. त्यामुळे एखाद्य व्यसनाच्या आहारी जाण्याचे भरपूर दुष्परिणाम दिसून येतात.