आरोग्य.कॉम
  • मुखपृष्ठ
  • पर्यायी उपचार पद्धती
    • आयुर्वेद
    • होमिओपॅथी
    • निसर्गोपचार
    • अ‍ॅक्युप्रेशर
    • अ‍ॅक्युपंक्चर
    • अरोमा थेरपी
    • बॅच फ्लॉवर औषधे
    • घरगुती उपाय
    • मसाज
    • योग
    • ध्यान
    • रेकी
    • संमोहन
    • बॉडीवर्क
  • आजार आणि रोग
    • सामान्य आजार
    • संसर्गजन्य आजार
    • विशिष्ट आजार
  • कुटुंबाचे आरोग्य
    • पुरूषांचे आरोग्य
    • वृध्दांचे आरोग्य
    • महिलांचे आरोग्य
    • मुलांचे आरोग्य
    • किशोर आरोग्य
    • प्रथमोपचार
    • तंदुरूस्ती
    • पोषक पदार्थ आणि अन्न
    • पाळीव प्राणी
  • आरोग्य संपदा
    • वैद्यकीय करियर
    • ग्रामिण आरोग्य
    • हॉस्पिटल्स
    • रुग्णहक्क समिती
    • आरोग्यासाठी टिप्स
  • विमा
    • आरोग्य विमा
    • वैद्यकीय नैतिकता
    • टेलीमेडिसीन
    • इच्छामरण
  • लैंगिकता
    • लैंगिकता म्हणजे काय?
    • लैंगिक शिक्षण
    • गर्भधारणा
    • विवाह
    • कामजीवन आणि अपंगत्व
    • मासिकपाळी
    • ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिझम
    • शरीरभाषा
    • लैंगिकतेपार
    • फेटिशीझम
    • लैंगिक संवेदना गोठणे
  • स्व-मदतगट
    • एपिलेप्सी
    • स्किझोफ्रेनिया
    • पार्किन्सन्स
    • व्यसनमुक्ती
    • स्थुलता
    • कर्करोग
    • नैराश्य
    • अपंगत्व
    • मुत्रपिंड स्व-मदतगट
    • सेतू
    • कोड - पांढरे डाग
    • सहचरी मदत गट
Aarogya.com
English | ગુજરાતી | नोंदणी | लॉग-इन
  • मुख्यपृष्ठ
  • स्व-मदतगट
  • व्यसनमुक्ती
  • रागावर नियंत्रण

रागावर नियंत्रण - आपण कोणाला दोष देतो?

  • Print
  • Email
Details
Hits: 8494
Page 2 of 2

आपण कोणाला दोष देतो?
जे आपले हातातले आहेत त्यांनाच. पालक, पत्नी, पाल्य, हाताखालचे सहकारी.
लपलेल्या भावनांचे विचलित प्रकटीकरण हे शरीराची त्यातली प्रतिक्रियाच असते. आपल्यातल्या ब-याच लोकांना डोकेदुखी, मानेत दुखणे, शरीरास जडत्व येणे असे त्रास होतात.

याच रागाच्या भावनेच्या प्रकारात स्वभाव आत्मघातकी बनत जातो, अपघात घडण्याच्या शक्यता अधिक असतात. जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपण दरवाज्याला जोरात धडका देतो, मोटारकार चालवत असताना जोरजोराने हॉर्न किंवा भोंगा वाजवतो, आपण इतक्या वेगाने गाडी चालवतो की कधीही अपघात होऊ शकतो.

उदाहरणार्थ, एकदा मला दुरदर्शनवर क्रिकेटचा सामना बघायचा होता. पण माझ्या वडलांनी मला त्याऐवजी भिंतीवर चित्र टांगण्याचे काम सांगितले. मला खुपच राग आला होता. चित्र टांगण्यासाठी खिळा ठोकताना मी हातोड्याचा जोरदार ठोका दिला. तो खिळ्यावर न बसता माझ्या बोटांवरच बसला. मी माझ्या रागाला ओळखू शकलो नाही.
राग हा वेगवेगळ्या बदलत्या स्वरुपाचा कधी सहज ओळखता येऊ शकणारा तर कधी न ओळखता येणा-या स्वरुपाचा असू शकतो. राग हा आपल्या भाषाशैली, क्रिया किंवा प्रतिक्रियांमधून प्रकट होत असतो.

आपणास यामुळे वेदना व दुःख येऊ शकते, यामुळे आपल्याला व इतरांना दुखापत होऊ शकते तसेच नैराश्यही येऊ शकते.
लपवलेला किंवा सुप्त राग, क्रोध.

भावना
निराशा
नैराश्य
गप्प नाराजगी
स्वतःला कमनशिबी मानणे, स्वतःचे समर्थन

भावना प्रकट करण्याची पद्धत.
मी उदास आहे
माझे मन विस्कळीत झाले आहे.
मला आत्महत्या करावीशी वाटते.
माझी मरायची इच्छा आहे.
(गप्प)
हं हुशार आहेस
(विरुद्धाअर्थी)
बिच्चारा मी
मी एकटाच सहन करतोय.

शाररिक लक्षणे
डोकेदुखी
कडकपणा येणे किंवा आखडणे
भूक मरणे
झोप न येणे
प्रत्येक क्षणी ताण जाणवणे

मानसिक लक्षणे
एकाकीपणा
नैराश्य
गरज नसलेले युक्तीवाद करणे
समाजापासून किंवा समूहापासून एकटे दुर राहणे
गप्प विचारात मग्न राहणे

स्वभाव लक्षणे
शाब्दिक शिविगाळी करणे
हिंसक
व्यसनाकडे वळणे

आपण एवढे रागीट का आहोत?
लवकर व सरळसोटपणे राग येण्याला दोन महत्त्वाची कारणे आहेत. एक म्हणजे आपण आपल्यात खूप राग साठवून ठेवतो. याला फक्त थोडीसे उत्तेजन भडकण्यासाठी पुष्कळ असते. आपल्या आयुष्यात निराशा करणारे खूप अनुभव आपण घेतले आहेत आणि अशावेळी आपण आपला राग व्यक्त करण्यासाठी सभोवताली फिरताना कारणच शोधत राहतो.

दुसरे कारण म्हणजे बराच काळापासून आपण पाहिले आहे की रागामुळे बरेच काही साध्य होते. आपत्तीकालीन परिस्थितीत याचा आपण शस्त्र म्हणून वारंवार वापर करतो. हळुहळू आपला मुळ स्वभावात रागिटपणा येतो. आपला इतरांशी सर्वसाधारणपणे वागतानाही विक्षिप्तपणा येतो.

आपल्याला व्यसनमुक्त झाल्यावर पूर्वावस्थेत येताना ब-याच समस्या येतात त्यांना आपण सामोरे जातो. कधी कधी आपल्याला घरी परतण्यास उशिर होतो. घरी पत्नी चिंता करत असते. त्यावेळेस ती वेगळयाच प्रकारे वागते. यात आपल्यावर विश्वास नाही असा भाग नसतो. कदाचित ती अशावेळेस काही प्रश्न विचारणारही नाही. पण तिला आपली चिंता असणे सहाजिकच आहे. संभाषणात उडणारे खटके आपल्याला क्रोधित करतात.

कधी कधी खुले संभाषणही होतात जसे,"तू मला कित्येकवेळा फसवले आहेस. तू पुन्हा व्यसन करणार नाहीस यावर मी विश्वास कसा ठेऊ? ती आपल्याला जबाबदारी देते पण ती आपण पूर्ण करु असा विश्वास मात्र ठेवत नाही. ती प्रत्येक गोष्टीत पाठलाग करत राहते. आपण पाहतो की आपली मुल जो मान आपल्याला द्यायची तोही आता देईनासे झाले आहेत. आपण वारंवार प्रयत्न करुनही मुले समस्या सोडवण्यासाठी आपल्या आईकडेच जातात. अशी सर्व परिस्थिती आपणास रागाच्या भावनेकडे नेते. तरीही हा राग आपल्याला व्यक्त करता येत नाही व त्याचा संचय होण्यास सुरवात होते.

याच्या तात्पर्यात काय घडते?
आपण अगदी लहान मुलांप्रमाणे वागतो. त्यांच्याप्रमाणेच भावना सांभाळण्याचा प्रयत्न करतो. लहान मुले वारंवार रडतात आपण रडू शकत नाही पण वारंवार व्यसनाकडे वळतो. आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडत नाही व आपण अतातायीपणा करू लागतो. ही परिस्थिती व्यसन केल्याने बदलेल असा विचार आपण करु लागतो. एवढ्या काळात आपल्याला कळते की रागाने काही साध्य होत नाही. आपल्या मनातील या भावनेला बाहेर पडण्यासाठी सकारात्मक मार्ग दिला पाहिजे.

आपण रागाची हाताळणी कशाप्रकारे करु शकतो?
रागावर नियंत्रण करण्याचे उपाय सोपे नसतात. याची कोणतीही साचेबद्ध योजनाही नसते. आपल्यालाच हे ग्राह्य धरावे लागते की या रागाच्या भावनेमुळे आपण व्यसनाकडे पुन्हा वळू शकतो.

आपल्याला राग येत असल्यास त्याला ओळखा.
आपल्या रागाला हाताळताना पहिली पायरी म्हणजे आपल्याला राग आल्याचे ओळखून स्वतः या गोष्टीचा स्विकार करणे. अशा जागरुक राहण्याने येणा-या रागाची तीव्रता पूर्वीच्या मानाने भरपूर कमी असते. जर आपणास ताण जाणवत असेल व त्याचे कारण शोढण्यात आपण असमर्थ ठरलेलो असल्यास रागाचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचे व्यक्त करा. कारण त्याविषयी आपण जागृक राहणे लगेचच शक्य होत नाही.

जर आपण निराश असाल तर स्वतःला येणा-या रागाचे कारण आपल्याच मनाला विचारावे. जो पर्यंत आपण रागाला व्यवस्थितपणे ओळखत नाही तोपर्यंत ही क्रिया करत राहणे अनिवार्य आहे. जर आपणास सर्वकाही कंटाळवाणे, मन दुखावलेले परिस्थिती असल्यासारखे वाटत असेल तर स्वतःला पुढील प्रश्न विचारावे.

मी कोणत्याही गोष्टीवर रागावलेलो आहे का?
मी ह्या परिस्थितीला तोंड देण्यास घाबरत आहे का?
आपल्या हे लक्षात राहिले पाहिजे की राग हा क्वचितच न परवडणारा असतो पण याचा अर्थ असा नाही की तो निघून जात नाही. राग म्हणजे भावनात्मक प्रतिक्रिया असते आणि ही भावना आहे याविषयी जागृक राहण्यानेच तिव्रता कमी करता येते.

रागाच्या भावनेचा उगम शोधणे.
एकदा का आपण आपल्या रागाला ओळखायला शिकलो की आपणास वेगवेगळे मार्ग सुचत जातात. त्यानंतर लक्षात येते की मूळ समस्या रागाचा उगम जेथून होतो तिथे आहे.

जसे आपण आपल्या वरीष्ठांवर त्यांनी दिलेल्या वर्तणुकीमुळे रागवलेले असतो. पण त्यांना तशी प्रतिक्रिया देता येत नाही म्हणून तो राग मनामधे तसाच घेऊन आपण घरी येतो. तो राग आपल्या पत्नीवर व्यक्त होतो. चहा कॉफी आणण्यासाठी काही मिनिटांचा उशिरही त्यासाठी पुरेसा असतो.

जर आपण कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की हा राग आपल्याला दुस-या ठिकाणी व्यक्त करायचा होता. म्हणजेच हा राग जागाही बदलत राहतो.

आपला राग हा खरा आहे किंवा योग्य आहे किंवा नाही हे ओळखणे.
उदाहरणार्थ, जेव्हा माझ्या पत्नीने दुपारच्या जेवणात काय करु असे विचारले असता, काहीही चालेल असे मी सांगितले. तिने दुपारच्या जेवणात कोरड्या चपात्या बनवल्या म्हणून मी तिच्यावर धावून गेलो तिला ओरडलो," तुला पु-या बनवता आल्या असत्या तरीही तू मला न आवडणा-या चपात्या केल्या". त्यावर पत्नी म्हणाली," मी तुम्हाला आधीच विचारले होते. मी बनवून झाल्यावर आता तुम्ही ओरडत आहात."
हे संभाषण चालत राहिले व मी जेवण न जेवताच वेळ काढली.

अशा प्रसंगांमधे राग येणे सहाजिकच आहे पण आपल्याला कळाले पाहिजे की आपला हा राग खरा व योग्य नाही आहे. जर माझी काय अपेक्षा आहे हे मी पत्नीला सांगितलेच नसेल तर तिच्यावर राग काढणे कस योग्य ठरु शकेल.

रागाचा ख-याने सामाना करा.
जर आपण आपल्या रागाला ओळखलेच नाही किंवा त्याला बाहेर पडण्यासाठी सकारात्मक मार्ग दिला नाही तर आपली अवस्था प्रेशर कुकर सारखी होऊ शते. कुकर मधे ज्याप्रमाणे वाफ निघून जावी म्हणून मार्ग केलेला असतो त्याचप्रमाणे आपल्या रागालाही बाहेर पडण्यासाठी जागा करणे आवश्यक आहे. जर वाफ जाण्यासाठी जागा केलीच नसती तर आतला दाब वाढत जाऊन कुकर फुटून त्याचे तुकडे पडू शकतात त्याचप्रमाणे आपला उद्रेक थांबवण्यासाठी भावना निघण्याकरीता वाट तयार करणे अपरिहार्य आहे.

अशी सुरक्षिततेसाठी जागा बनवणे शक्य आहे का?
संपूर्ण आराम, विश्रांती करणे हे रागिष्ट माणसाला फायदेशीर ठरु शकते. आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे शांतता व संतुलित राखण्यास मदत मिळते ह्याचा शोध घेणे गरजेचे आहे. दिवसातून एकदा तरी अशा गोष्टी केल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे प्रतिक्रिया देणे ताबडतोब थांबवावे. जेव्हा आपण रागात असू तेव्हा आरडाओरडी न करता त्याची तिव्रता कशाप्रकारे कमी करता येईल याचा सतत प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.

राग खूपच उर्जा तयार करत असतो. याची साचेबद्ध बांधणी केली पाहिजे. रागापासून मुक्त होण्यासाठी शाररिक हलचाली हे चांगले माध्यम ठरु शकते. अशा उर्जा प्रत्युर्जीत करण्यासाठी मैदानी खेळ, बागकाम करणे किंवा आपल्या घरात स्वच्छता ठेवायला हातभार लावणे हे चांगले पर्याय ठरु शकतात.

या प्रयत्नांनंतर आपण संवाद साधण्याच्या अवस्थेत यायला लागतो. आपल्या कुटुंबियांशी चांगले संवाद साधल्याने,त्यांच्या गोष्टी समजून घेतल्याने आपला स्वभाव मनमोकळा होण्यास मदत होईल. जर पती पत्नी आपल्या भावना व्यक्त न करता साठवून ठेवत असतील तर पुढे संवादातही समस्या निर्माण होऊ शकतात व एकामेकांच्या समस्या, भावनांना समजून घेता येणारच नाही.

आपण आपल्या रागासंबंधी संवाद कसा साधू शकतो?
व्यसनातून बाहेर पडल्यानंतर पूर्वस्थितीत येताना ब-याच समस्यांना सामोरे जावे लागते. आपली बाजू व्यवस्थित मांडता न येणे ही आणखी एक समस्या आपल्या समोर असते. अशावेळेस आपण अतिउच्च पातळीवर जाऊन वागायला लागतो, रागाच्या भरातील ही वर्तणूक इतरांना दुखावते. कधी कधी या त्यावर्तणूकीच्या विरुद्ध आपण काही न बोलता इतर कोणालाही आपल्या भावनांचा थांगपत्ताही लागू देत नाही.

एकदा एका झाडाखाली साप रहात होता. तो त्याझाडाच्या बाजूने येणा-या जाणा-या गावक-यांना चावून सतत घाबरवत असे. गावात त्याची दहशत झाली होती. गावक-यांनी एका सज्जन माणसाला सापाची समजूत काढण्यासाठी विनवले. त्यामाणसाने सापाला त्याची वर्तणूक कश्याप्रकारे चुकीची आहे ते समजवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या वर्तणूकीमुळे कशाप्रकारे इतरांना कसा त्रास होतो हेही समजवले. सापानेही पुन्हा असे करणार नाही असे वचन दिले.

एका आठवड्यानंतर एका माणसाने पाहिले की काही लोक साप रहात असलेल्या झाडाच्या आजुबाजूला जमले आहेत. जवळ जाताना त्याला कळाले की लोक त्या सापाला दगड फेकून मारत आहेत व साप कोणताही विरोध न करता जमिनीवर निपचित पडून आहे. त्या माणसाला बघून साप उठला व माणसाला म्हणाला," तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कोणालाही त्रास देत नाही पण हे लोक पहा मला कशी वर्तणूक देत आहेत."

त्यावर सज्जन माणसाने सांगितले,"अरे सर्पा, तुला मी कोणालाही चाऊ नको असे सांगितले होते. कोणालाही विरोध करु नको किंवा इतरांचे अत्याचार सहन कर असे सागितलेच नव्हते.

कधी कधी आपण गोष्टीमधील सापाप्रमाणे वागायला लागतो. आपण इतरांवर आरडाओरडी करून किंवा त्यांना मारुन दुखवत असतो किंवा काही न बोलता, आपल्या भावना व्यक्त न करता गप्प रहात असतो. आपण एकतर एकदम आक्रमक होतो किंवा एकदमच शांत होऊन जातो.

कोणालाही न दुखवता विरोध दर्शवणे किंवा चुका दाखवून देणे.
काहीवेळा आपली चुका दर्शवण्याची पद्धत, आपले शब्द चुकीचे असतात. त्यामुळे आपली बाजू बरोबर असूनही त्यावर लक्ष दिले जात नाही किंवा विरोध केला जातो. जर आपण आपली बाजू मांडण्याची पद्धत व शब्द योग्य असतील म्हणजेच कमी दुखवणारे किंवा कमी तिव्रतेचे असतील तर हे साध्य होऊ शकते.

आपण हे कसे करु शकतो?

  • ज्या व्यक्तीने आपल्याला दुखवले आहे त्या व्यक्तींशी थेट संवाद साधावा. समोरासमोर व डोळ्यात डोळे मिळवून संवाद होणे आवश्यक.
  • लवकरात लवकर आपली तक्रार समोर मांडावी परंतु योग्य वेळ निवडणे आवश्यक. जसे, जर तुम्ही आपल्या पत्नीवर नाराज असाल तर संध्याकाळी जेव्हा तुम्ही सर्व कामापासून मुक्त असता व आराम करण्याची वेळ असते तेव्हा आपली बाजू थेट मांडावी. सकाळी जेव्हा तुम्ही बाहेर कामासाठी जाण्याच्या तयारीत असता. त्यावेळेस यासर्व गोष्टी मांडणे चुकीचे ठरेल कारण त्यावेळेस आधीच मनामधे वेगवेगळे विचार घोळत असतात त्यावेळेस संवाद व्यवस्थित साधता येत नाही.
  • जर आपल्या मुलाने परीक्षेत चांगले मार्क मिळवले नसतील तर त्याला त्याच्या मित्रांसमोर न फटकारता एकांतात त्याला समजवावे. इतरांसमोर त्याला सुनावल्याने त्याच्या भावनांना ठेच लागण्याची शक्यता असते. त्याला त्याच्या कृत्याबाबत लाज वाटण्याला आपणच कारणीभूत ठरु शकतो. म्हणूनच ह्या गोष्टी एकांतात मांडणे गरजेचे असते.
  • इतरांशी तुलना करणे टाळावे. एखाद्या व्यक्तीचे दुस-या व्यक्तीशी तुलना करुन बोलण्याने तो संवाद सकारात्मक मार्गाकडे जात नाही. जर आपल्या पत्नीने जेवण करपवले असेल तर तिला पुढच्या वेळेस काळजी घे असे सांगावे. अशावेळेस तुमच्या इतर मित्रांच्या पत्नींचे उदाहरण देऊन बोलण्याने विरुद्ध परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.
  • एकावेळेस एकच तक्रार मांडावी. तसेच एकदा एखादा मुद्दा मांडून झाल्यावर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उकरत बसू नये.
  • मांडण्याच्या गोष्टी सरळपद्धतीने मांडाव्यात. आढेवेढे घेत किंवा व्यंग दाखवत या गोष्टी समोर ठेऊ नये.
  • प्रत्येक वेळेस, नेहमीच किंवा कधीही नाही सारखे शब्द टाळावे. जसे
  • तू प्रत्येक वेळेस या अशा गोष्टींना जबाबदार असते किंवा असतो.
  • तू नेहमीच बेजबाबदारपणे वागतेस किंवा वागतोस.
  • तुझ्यात कधीही बदल होणार नाहीत.
  • फक्त शाब्दिकरीत्या बाबी मांडाव्यात.
  • जर आपणास आपल्या आईने केलेल्या गोष्टी पटत नसतील तर तिला कसे वागणे आपल्याला अपेक्षित आहे हे समजवावे. अशा परिस्थितीत आपल्या अपेक्षा न सांगता आदळ आपट केल्याने तुमचे नेमके काय सांगणे आहे हे तिला कळणे कठीण होऊन बसेल. तिने केलेल्या चुका तिला कळणारच नाहीत.

तक्रार ऐकताना

  • जेव्हा आपली आलोचना केली जाते त्यावेळेस डोळ्यांत डोळे मिसळून बघणे.
  • कोणताही अडथळा न आणता, सर्व बोलणे निट ऐकून घ्यावी. ऐकणे, ऐकणॆ आणि फक्त ऐकणे हे धोरण बाळ्गावे.
  • जो व्यक्ती युक्तीवाद करतो आहे त्याच्यात चुका शोधू नका.
  • आपण आपली बाजू मधूनच मांडू नये किंवा इतरांच्या चुका काढून त्यावर युक्तीवाद करु नये.
  • तुम्हाला त्या व्यक्तीचे बोलणे समजले असल्याचे त्याला कळवावे.

तात्पर्य- राग हा आपल्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे. पण त्यावर पूर्णतः नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्यासाठी आपल्या रागाला ओळखणे व तो योग्य आहे किंवा नाही याची पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. आपल्यात दडून बसलेला राग काढण्यासाठी आपण शाररिक हलचालींचा किंवा पूर्णतः विश्राम करण्याच्या पद्धतीचा वापर करु शकतो. रागाला ओळखणे, व्यवस्थित समजून घेणे व योग्य मार्गाने व्यक्त करणे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. यामुळे आयुष्य अधिक आरामदायी व ख-याने संतुलित होण्यास मदत मिळते.

  • 1
  • 2

1

व्यसनमुक्ती

  • प्रश्नोत्तरे
  • सभाकेंद्राची यादी
  • मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र
  • रागावर नियंत्रण
  • व्यसन- एक उपचरार्थी परिस्थिती
  • व्यसनमुक्ती आणि योग : फादर ज्यो परेरा यांचे व्याख्यान
  • व्यसनमुक्त होताना
  • ‘मुक्तांगण मित्र’ व आरोग्य.कॉम
  • मुक्तांगणचा परिसस्पर्श

Swine Flu

National Award for Outstanding achievement by a Non-Professional - Tushar Sampat

Introducing Digital Practice for Doctors & Healthcare professionals

विशिष्ट आजार
सामान्य आजार

आरोग्य नेटवर्क

आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.

» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pune Aarogya
Digital Media Dedicated to Healthcare of Punekars

वेबसाईटशी लिंक करा

aarogya logo

ईमेल कोड

आमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या

 आरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.

स्वास्थ्य साधने

  • हेल्थ डिरेक्टरी
  • संदेश बोर्ड
  • हेल्थ कॅल्क्युलेटर

आरोग्य.कॉम विषयी

आरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.

अधिक वाचा...

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू

अधिक वाचा...

सदस्यांच्या प्रतिक्रया

“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.!”

  • आमच्या विषयी
  • प्रतिक्रिया
  • गोपनीयता नीति
  • साइट मॅप
  • संपर्क
  • मित्रांशी संपर्क साधा

कॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.