व्यसनी माणसाला दारू मिळवण्याचे सर्व मार्ग पक्के ठाऊक असतात. कोल्हापूर ते पूणे या प्रवासात व पुण्यात आल्यावरही वडील बरोबर असतानाही त्यांचा डोळा चुकवून नितीन दारू प्यायला. त्यामुळे आता त्याच्यावर कोणाचाही ताबा राहिलेला नाही. घरात राहून तो सुधारू शकणार नाही, हे उघड होतं. शिवाय त्याला स्वत:लाही मुक्तांगणबाबत कुतूहल होतं. म्हणून मग मुक्तांगणमध्ये त्याला दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुक्तांगणमध्ये भोवतालच्या व्यसनमुक्त सहकार्याबरोबर होणार्या ‘शेअरिंग’ म्हणून अल्कोहोलिक ऍनॉनिमसच्या बैठाकांमधून आपण एकटे नाही एवढा दिलासा मिळाला आणि मनातील अपराधाची भावना थोडी कमी व्हायला लागली.
उपचारानंतर कोल्हापूरला परतल्यावर नितीन आणि त्याच्या आई-वडिलांनाही वाटलं. चला, एका मोठ्या धोक्यातून आपण बाहेर पडलो, काही दिवस तसे चांगले गेलेही. पण व्यसन हा एक छुपा आजार असतो. मनाचा तोल क्षणभर जरी ढळला, तरी तो कधी वर येईल हे सांगता येत नाही. काही दिवस अल्कोहोलिक ऍनॉनिमसच्या बैठका, मुक्तांगणच्या कोल्हापुरातील बैठकांना हजेरी असा क्रम सुरू राहिला. थोड्या दिवसांनी नितीनला वाटलं. आता आपल्यावर स्वत:वर ताबा ठेवणं चांगलं जमायला लागलं आहे, काय हरकत आहे, पुन्हा थोडी दारू घेतली तर? तेवढ्याने आपण काही पुन्हा व्यसनी होत नाही. एव्हना नितीनचं व्यसन सुटलं आहे, यावर घरच्यांचा विश्वास बसला होता. घरात नितीनची स्वतंत्र खोली होती. शिवाय दारू पितानाही तो खोलीतील तांब्याभांड्यात घेऊनच पीत असते. त्यामुळे कुणाला संशय यायचा प्रश्न नव्हता. सुमारे तीन महिने हे चोरून पिणं सुरूच राहिलं. अल्कोहोलिक ऍनॉनिमसच्या सुनीता काळे यांना ही Denial Stage लक्षात आली आणि त्यांनी नितीनच्या वडीलांना इशारा दिला.
पहिल्यापासून वडिलांनीच आपलं नुकसान केलं आहे, हा गैरसमज मनात पक्का होताच. आता तर आपण दारू पिऊनही करू शकतोय ना काम? मग वडिलांनी त्यावर आक्षेप घ्यायची गरजच काय, असं वाटून पुन्हा खटके उडायला लागले. त्यावेळी नितीन त्यांच्या एका स्नेह्यांनी सुरू केलेल्या केटरिंग कॉलेजमध्ये काम करत होता. नितीनचं पुन्हा वाढलेलं व्यसन कुणापासूनही न लपविणार्या वडिलांमुळेच ही गोष्ट नोकरीच्या ठिकाणीही सर्वांना कळून आपली नोकरी जाईल, ही भीती नितीनच्या मनात निर्माण झाली. व्यसन वाढतच गेलं.
पुन्हा एकदा मुक्तांगणमध्ये उपचार घेतले गेले. पण आता आपण दारू पिऊनही काम करू शकतो ही भावना मनात पक्कीच होती. आपला काही तोटा होतो आहे, असं वाटतच नव्हतं. उपचार घेऊन आल्यानंतरही दारू पिणं सुरूचं राहिलं. अल्कोहोलिक ऍनॉनिमस, जनस्वास्थ समिती येथील सहकार्यांनी प्रयत्न करून पाहिले. कामाच्या ठिकाणच्या सहकार्यांनीही सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. पण आता कोणीही, अगदी मुक्तांगण, सुध्दा आपल्याला सुधारू शकणार नाही ही नितीनची पक्की खात्रीच होती. यात शारीरिक, मानसिक शक्ती पूर्णपणे खचून भीती, अपराधाची टोचणी या भावनांनी मनात घर केलं होतं. पण त्यावर नितीनकडे उत्तर होतं, तेही एकच - दारू!
त्याच सुमारास डॉ. अनिल अवचट कोल्हापूरात आले होते. नितीनच्या व्यसनमुक्तीसाठी एव्हना पाण्यासारखा पैसा खर्च झाला होता. डॉ. अनिल अवचटांनी नितीनचा मुक्तांगणचा काही हजारांच्या रकमेतील खर्च स्वत: करायची मनावर खोल परिणाम करून गेली.
आपल्यासारख्या ‘वाया’ गेलेल्या माणसावर नुसता विश्वास दाखवणचं. नव्हे तर अर्थिक जबाबदारी घेण्याची तयारीही कोणीतरी दाखवतं आहे आणि आपण मात्र आडमुठेपणाने बदलाची तयारीही दाखवत नाही. अशी टोचणी त्याच्या मनाला लागली.
त्यानंतर मात्र नितीनने मुक्तांगणमध्ये मनापासून सुधारण्यासाठी प्रयत्न केले Rational Emotive Therapy (RET) चा त्याला अतिशय फायदा झाला. परेश कामदर, प्रसाद ढवळे यांच्याशी वेळोवेळी तो मनातल्या भावना विचार यासंबंधात ‘शेअरिंग’ करत गेला. सुधारणेसाठी स्वत:हून प्रयत्न केल्याने भराभर चांगला परिणाम दिसू लागला.
कै. डॉ. अनिता अवचट यांच्यानंतर आता डॉ. अनिल अवचट व त्यांची. मुलगी मुक्ता पुणतांबेकर यांनी तितक्याच समरसतेने आणि समर्थपणे हे काम पुढे सुरू ठेवलं आहे. नितीनमध्ये सुधारणा होऊ लागल्यानंतरही त्याचा आळस व निष्क्रीयता कमी झालेली नाही. अजून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होत नाहीत ही गोष्ट मुक्ताने हेरली व एक दिवस त्याविषयी अत्यंत कडक शब्दात त्याला समज दिली. आजपर्यंत कधीही अशाप्रकारे कडक, अवमानकारक शब्दात न बोललेली मुक्ता आज अशा प्रकारे समज देते आहे. याचा अर्थ आपली तितकीच गंभीर चूक होते आहे हे नितीनच्या लक्षात आलं. तो माझ्या आयुष्यातील `Turning Point' होता असं नितीन सांगतो. ते बोलणं त्याला झोंबलं. पण त्यामुळेच आळस खाडकन उतरला हळूहळू मुक्तांगणमधील काम त्याच्यावर सोपविण्यात यायला लागली.
मुक्तांगणचा परिसस्पर्श - व्यसनी माणसाला दारू...
- Details
- Hits: 6319
0