Print
Hits: 6523

व्यसन म्हणजे काय व ते कसं लागतं त्याचे दुष्परिणाम इत्यादी व्यसनासंबंधीची माहिती मुलांना साधारण वयाच्या कितव्या वर्षापासून द्यावी?

मुलाला साधारण वयाच्या बाराव्या वर्षापासून (इयत्ता सातवी पासून) ‘व्यसन’ या विषयासंबंधी संपूर्ण माहिती द्यायला सुरूवात करावी.

शिक्षक व पालक ह्यांना व्यसन व व्यसनांचे दुष्परिणाम या संबंधात सावध करावं किंवा काय?

दिवसातला जास्तीत जास्त काळ मुलं, शिक्षक व पालक ह्यांच्या सहवासात असतात. त्यामुळे पालक व शिक्षक ह्या दोघांनाही व्यसन व व्यसनामुळे होणारे परिणाम ह्याची माहिती देणं गरजेचे आहे. असं न केल्यास मुलांना चुकीची माहिती मिळून होणारे परिणाम हे अधिक नुकसानकारक असू शकतात.

‘एड्‌स’ व मादक पदार्थांचे सेवन ह्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का?

‘एड्‌स’ ची लागण झालेल्या रोग्याचे रक्त व अशा व्यक्तीशी आलेले लैंगिक संबंध ह्यातून पसरणार्‍या एच. आय. व्ही. रोगजंतूमुळे एड्‌स होतो. मादक पदार्थांचे सेवन करणार्‍या व्यक्ती स्वत:ला अशा पदार्थांची इंजेक्शन्स्‌ टोचून घेतात. ह्यासाठी वापरण्यात येणार्‍या सुया रोगजंतूयुक्त असू शकतात. तसेच नशेच्या अमलामधे असताना मुक्त जीवन जगण्याची जी ऊर्मी असते, त्या पायी अशा व्यक्ती अवैध लैंगिक सुखासाठी बाहेर जातात. ह्यामधून एड्‌स पसरण्याची शक्यता बळावते.

हेरॉईन (ब्राउन शुगर) चं व्यसन असणार्‍या व्यक्तींच्या बाबतीत दूरगामी परिणाम काय होतात हे सांगता येईल का?

औषधोपचारांचे मिळणारे प्रतिसाद दुर्दैवानं अत्यंत निराशा जनक आहेत. जेमतेम १०ऽ व्यसनाधीन व्यक्ती पूर्णत: निर्व्यसनी होण्यामधे यशस्वी होतात. बहुतेकांच्या बाबतीत व्यसनातून तात्पुरती सुटका होते पण कित्येक वर्षानंतरसुध्दा एखादी व्यक्ती परत व्यसनी होण्याची शक्यता असते खात्री देता येत नाही.

मादक पदार्थांच व्यसन लागलेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी मुंबई शहरांमध्ये काय सुविधा आहेत?

दुर्दैवानं जरी बरीचशी व्यसनमुक्ती केंद्र असली तरी सुध्दा दूरगामी परिणाम करतील अशी सल्ला देणारी केंद्र वा पुनर्वसन केंद्र सध्या उपलब्ध नाही आहेत. जी उपचारांना यश येण्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे. काही स्वयंसेवक व धर्म प्रसारक संस्था ह्यांनी चालविलेल्या घरसदृश संस्था उपलब्ध आहेत.


 

हेरॉइन (ब्राउन शुगर) हे घेतल्यामुळे काय होतं अस वाटतं?

ब्राउन शुगर घेतल्यानंतर माणूस एका तरल अवस्थेमध्ये जातो. मानसिक पातळीवर खूप बरं वाटायला लागत, जगातल्या कुठल्याही गोष्टीची कसल्याही प्रकारची काळजी रहात नाही, माणसाला माहीत असलेल्या कोणत्याही उपायापेक्षा हेरॉइन हे अत्यंत जालीम, परिणामकारक वेदनाशामक आहे. ज्यामुळे कोणत्याही प्रकारची शारीरिक किंवा मानसिक वेदना जाणवत नाही. हेरॉइनच्या सेवनामुळे शरीराची प्रतिकारशक्ती व लैंगिक शक्ती वाढते. धीर येतो, असा एक खूप मोठ्या प्रमाणावरचा गैरसमज आहे.

‘डी-टॉक्सीफिकेशन’ म्हणजे काय?

मादक पदार्थांचं सेवन करणं थांबवल्यानंतर शरीरामध्ये व मानसिक पातळीवर ज्या प्रतिक्रिया निर्माण होतात, ज्यामुळे व्यक्ती पुन्हा व्यसन करण्यास उद्युक्त होते, अशा प्रतिक्रिया ताब्यात आणून व्यसनी व्यक्तीला व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी उपयोगात आणलेली वैद्यकीय उपचार पध्दती म्हणजे ‘डी -टॉक्सीफिकेशन’.

व्यसनी व्यक्ती अपघातप्रवण असतात का (व्यसनी व्यक्तीला अपघात होण्याची शक्यता अधिक असते का)?

हो, कारण व्यसनाचा प्रभाव असताना, चालताना, वाहन चालवताना, आजुबाजूचा अंदाज घेण्याची क्षमता कमी झालेली असते. प्रतिक्षिप्त क्रिया कमी झालेली असते व लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी झालेली असते.

‘ओव्हर-डोस’ कोणत्याही पदार्थाचे अधिक प्रमाणात सेवन म्हणजे काय?

सततच्या सेवनामुळे अशी वेळ येते की, घेतलेल्या द्रव्याचा शरीरावर परिणाम होण्याचं प्रमाण कमी होत जात. म्हणजेच मादक द्रव्यामुळे होणारा परिणाम सहन करण्याची शरीराची शक्ती वाढते. अशा वेळी व्यक्ती मादक पदार्थाचं प्रमाण वाढवतो. एखाद्या वेळेस अस ही होऊ शकतं की, मादक पदार्थातील भेसळीमुळे हलक्या प्रतीचा पदार्थ मिळतो किंवा अतिशय उच्च प्रतीचा-शुध्द मादक पदार्थ मिळू शकतो. अशा प्रकारच्या पदार्थाच सेवन जर झाल, तर ते तत्काळ जिवाला अपायकारक ठरू शकते.

बरीचशी तरूण मुलं प्रयोग म्हणून, गंमत म्हणून मादक पदार्थांचं सेवन करतात हे योग्य आहे का?

बहुतांश मुलांच्या बाबतीत एकदाच अशा पदार्थाचं सेवन केल्यामुळे व्यसन लागलेलं दिसून येत नाही. पण असे सेवन वारंवार सुध्दा होऊ शकत. त्यामुळे एकदाच काहीतरी घेऊन व्यसन लागतच असं जरी नसलं तरीही अशा प्रकारच्या प्रयोग करण्यासाठी मुलांना परवानगी देणं हे हितावह नाही.

मँड्रक्स म्हणजे काय?

मँड्रक्स हे झोप आणणार गुंगीचे औषध आहे. कायद्याने ह्यावर बंदी घालण्यात आली आहे, मँड्रक्स चे रासायनिक नाव ‘मेथा क्वॅलोन’असं आहे.

माझा मुलगा/मुलगी कोणत्यातरी प्रकारच्या मादक पदार्थाच सेवन करतो/करते अस मला वाटते, मी काय करावे?

सर्व प्रथम आपलं मूल अशा प्रकारच्या पदार्थाच सेवन करत आहे किंवा काय हे निश्‍चित करा. तसं असल्यास शक्यतो त्याच्याशी बोलून बघा. ते असं का करत आहे ह्याची कारण मीमांसा करा. व आवश्यक वाटल्यास तातडीने आपले कुटुंबाचे डॉक्टर वा मानसशास्त्र तज्ञ ह्यांचा सल्ला घ्या.


 

मादक पदार्थांचा होणारा उपयोग काबूत आणण्यासाठी पोलीस काय करत आहेत?

मोठ्या प्रमाणावर अशा पदार्थांची होणारी आवक थांबवण्याचा, त्याला प्रतिबंध करण्याचा व अशा प्रकारची द्रव्ये आणणार्‍यांचा बिमोड करण्याचा पोलीस आपल्या परीने प्रयत्‍न करीत आहेत. परंतु आपल्या कायद्यातील असलेल्या गुंतागुंतीमुळे पोलीस गुन्हेगारांच्या बाबतीत योग्य तो न्याय मिळवण्यात असमर्थ ठरत आहेत.

सर्वात महत्वाचं म्हणजे आपण, पालक, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक असे सर्वजण मिळून अशा प्रकारच्या व्यसनांना आळा घालण्यासाठी कोणते प्रयत्‍न करत आहोत ह्याचा विचार करण्याची गरज आहे.

व्यसनी व्यक्तीला असे पदार्थ विकत घेण्यास पैसा कुठून मिळतो?

प्रथम प्रत्येक जण त्याला वैयक्तिक खर्चासाठी दिलेल्या पैशांचा उपयोग करतो. नंतर स्वत:च्या मालकीच्या वस्तूंच्या बदल्यात असे पदार्थ मिळवतो. हळूहळू उधार- उसनवार सुरू होते. चोर्‍या करायला सुरूवात होते. व सरते शेवटी अशा पदार्थांचा वापर व विक्री सुरू होते. आपल्या बरोबरीची मुलं, मित्र ही पहिली शिकार होतात. व शेवटी ही माणसं पूर्णपणे अविचारी होतात व वेश्यागमन व काहीवेळा खून करण्यापर्यंतची मजल गाठतात.

‘सॉफ्ट ड्रग्ज’ व हार्ड ड्रग्ज’ म्हणजे काय?

हे शब्द ह्या विषयांमधे पूर्णत: अनभिज्ञ असलेल्या लोकांसाठी वापरले जातात. ‘सॉफ्ट ड्रग्ज’ म्हणजे गांजा, चरस इत्यादी ज्यांच्यामुळे व्यसनी लोकांच्या मते फारसा अपाय होत नाही. ‘हार्ड ड्रग्ज म्हणजे हेरॉइन, कोकेन इत्यादी जी गंभीर प्रमाणात परिणाम करू शकतात. व्यसनी मुलांच्या मधे असा एक प्रवाद आहे की, ‘सॉफ्ट ड्रग्ज’ घेतलेले चालतात. त्यामुळे काही विशेष परिणाम होत नाही.

‘ड्रग्ज’ जवळ बाळगणे ह्या संदर्भात प्रचलित कायदा काय आहे?

‘नारकॉटिक्स ड्रग्ज’ ऍन्ड सायकोट्रॉपिक सब्सस्टंसेस्‌ (एन.डी. पी. एस्‌) ऍक्ट १९८८ ह्या कायद्यामध्ये झालेल्या बदलांनुसार ‘ड्रग्ज’ शी संबंधित असलेला कोणताही गुन्हा हा अजामिनपात्र गुन्हा म्हणून दाखल केला जातो. ‘ड्रग्ज’ च्या व्यापारातून जमा केलेली संपत्ती, मालमत्ता जप्त होऊ शकते. सुनावणीच्या अगोदर ‘ड्रग्ज’ च्या साठ्याची प्रयोग शाळेत तपासणी झाल्यानंतर विल्हेवाट लावता येते व ‘ड्रग्ज’ बाळगणार्‍यांना कैदेत टाकता येते.

गरोदरपणात हेरॉइन चं सेवन करण्यामधील धोके कोणते?

हेरॉइनचा परिणाम थेट गर्भावर होतो त्यामुळे होणार्‍या मुलाला अगोदराच हेरॉइनची सवय झालेली असते व जन्माला येणारं मूल जन्मत:च हेरॉइन न मिळाल्यास व्यसनी व्यक्तीमधे, मादक पदार्थ व मिळाल्यास आढळणार्‍या लक्षणांची शिकार होईल.

नवीन ड्रग्ज ची निर्मिती म्हणजे काय?

अशा प्रकारचे ड्रग्ज तयार करणं हे बेकायदेशीर असून अगदी नवीन प्रकारचे आहेत. नैराश्य, उतावीळपणा, अस्वस्थता, काळजी इत्यादीसाठी वापरण्यात येणारी रासायनिक द्रव्ये एकत्र करून नवीन प्रकारचे मादक पदार्थ (जसे डी. पी. टी. - ट्रिप्टामाइन पासून, एम. डी. एम. ए., एक्स्टसी - फेनेथिलामाइन पासून) तयार केले जातात.

ज्या वनस्पतीपासून अशा प्रकारची मादकद्रव्ये तयार केली जातात, अशा वनस्पतींची लागवड करणारा भारत हा एक मोठा देश आहे का?

हो भारतामध्ये कायदेशीर रित्या अशा प्रकारच्या झाडाची लागवड होते. व त्याचा वापर औषधी उपयोगासाठी केला जातो.

‘नाही म्हणायला शिकवा’ ह्या कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे?

हा कार्यक्रम मुलांमध्ये स्वप्रतिष्ठा वाढवणं हे ध्येय ठेवून तयार केलेलं आहे. ह्यामधे स्वत:बद्दलचा आदर, आयुष्यजगणं ह्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी, अपयशाचा स्वीकार करणे, राग-नैराश्य ह्यावर ताबा, मिळवणं, अडचणी निवारण करण्याचे मार्ग शोधण्याची व अमलात आणण्याची कुवर निर्माण करणं, वेळेचं योग्य व्यवस्थापन करणं, वैचारिक पातळी, व हुशारी वाढविणं इत्यादी गोष्टी मुलांमध्ये रूजविण्याच्या दृष्टीने.