व्यसन म्हणजे काय व ते कसं लागतं त्याचे दुष्परिणाम इत्यादी व्यसनासंबंधीची माहिती मुलांना साधारण वयाच्या कितव्या वर्षापासून द्यावी?
मुलाला साधारण वयाच्या बाराव्या वर्षापासून (इयत्ता सातवी पासून) ‘व्यसन’ या विषयासंबंधी संपूर्ण माहिती द्यायला सुरूवात करावी.
शिक्षक व पालक ह्यांना व्यसन व व्यसनांचे दुष्परिणाम या संबंधात सावध करावं किंवा काय?
दिवसातला जास्तीत जास्त काळ मुलं, शिक्षक व पालक ह्यांच्या सहवासात असतात. त्यामुळे पालक व शिक्षक ह्या दोघांनाही व्यसन व व्यसनामुळे होणारे परिणाम ह्याची माहिती देणं गरजेचे आहे. असं न केल्यास मुलांना चुकीची माहिती मिळून होणारे परिणाम हे अधिक नुकसानकारक असू शकतात.
‘एड्स’ व मादक पदार्थांचे सेवन ह्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का?
‘एड्स’ ची लागण झालेल्या रोग्याचे रक्त व अशा व्यक्तीशी आलेले लैंगिक संबंध ह्यातून पसरणार्या एच. आय. व्ही. रोगजंतूमुळे एड्स होतो. मादक पदार्थांचे सेवन करणार्या व्यक्ती स्वत:ला अशा पदार्थांची इंजेक्शन्स् टोचून घेतात. ह्यासाठी वापरण्यात येणार्या सुया रोगजंतूयुक्त असू शकतात. तसेच नशेच्या अमलामधे असताना मुक्त जीवन जगण्याची जी ऊर्मी असते, त्या पायी अशा व्यक्ती अवैध लैंगिक सुखासाठी बाहेर जातात. ह्यामधून एड्स पसरण्याची शक्यता बळावते.
हेरॉईन (ब्राउन शुगर) चं व्यसन असणार्या व्यक्तींच्या बाबतीत दूरगामी परिणाम काय होतात हे सांगता येईल का?
औषधोपचारांचे मिळणारे प्रतिसाद दुर्दैवानं अत्यंत निराशा जनक आहेत. जेमतेम १०ऽ व्यसनाधीन व्यक्ती पूर्णत: निर्व्यसनी होण्यामधे यशस्वी होतात. बहुतेकांच्या बाबतीत व्यसनातून तात्पुरती सुटका होते पण कित्येक वर्षानंतरसुध्दा एखादी व्यक्ती परत व्यसनी होण्याची शक्यता असते खात्री देता येत नाही.
मादक पदार्थांच व्यसन लागलेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी मुंबई शहरांमध्ये काय सुविधा आहेत?
दुर्दैवानं जरी बरीचशी व्यसनमुक्ती केंद्र असली तरी सुध्दा दूरगामी परिणाम करतील अशी सल्ला देणारी केंद्र वा पुनर्वसन केंद्र सध्या उपलब्ध नाही आहेत. जी उपचारांना यश येण्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे. काही स्वयंसेवक व धर्म प्रसारक संस्था ह्यांनी चालविलेल्या घरसदृश संस्था उपलब्ध आहेत.