Print
Hits: 4015
kidney Support Group 2nd Meeting किडनी सपोर्ट ग्रुपची २ री मासिक बैठक

दि. ६/८/२०००. किडनी सपोर्ट ग्रुपची २ री मासिक बैठक शांग्रिला गार्डन येथे पार पडली. बैठकीला १८ रूग्ण व त्यांचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते व तज्ञ डॉक्टर असे सर्व मिळून ३५ जण उपस्थित होते.

प्रथम मागील महिन्याच्या बैठकीचे अहवाल वाचन झाले. त्यानंतर डॉ.सदरे यांनी रूग्णांनी या आजाराला कशा प्रकारे सामोरे गेले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच इतर आजारांप्रमाणे मूत्रपिंडविकारा बाबतीतही जनजागरण करणे कसे गरजेचे आहे यावर प्रकाश टाकला. डॉ. अंबिके यांनीही रूग्णांच्या समस्येबाबत मार्गदर्शन केले. नजिकच्या भविष्यात जनजागरण कँप घेण्यास सर्वांनी उत्साहाने मान्यता दिली. प्रथमच बैठकीस आलेले श्री. गायकवाड, श्री. वासवानी, श्री गणपत मनूकर व प्रकाश गायकवाड यांनी आपल्या समस्यांबाबत मोकळेपणाने चर्चा केली. त्यांना इतर रूग्णांनी आपल्या अनुभवातून मार्गदर्शन केले.

Aarogya 2nd Meeting Report आरोग्य २ दुसरी मिटींगचा अहवाल

जहांगीर हॉस्पीटलचे तंत्रज्ञ श्री. राजू यांनी रूग्ण व तंत्रज्ञ यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकला व रूग्णांनी कशा पध्दतीने वागले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. सभेमध्ये २ ठराव एकमताने मंजूर झाले

१. समिती स्थापन करून नोंदणीकरण करणे.
२. जनजागरण मोहिम (Awareness Camp) राबविणे.

या बैठकीस aarogya.com चे संचालक श्री. तुषार संपत व त्यांचे सहकारी श्री. मिलींद चितळे, डॉ. शिल्पा लिमये, यशोदा वाकणकर तसेच कॅडिला हेल्थ केअर झायडस्‌ बायोजीन कंपनीचे प्रतिनीधी. स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छिणारे श्री. अमित बहीरट, संजीवन हॉस्पिटलचे तंत्रज्ञ श्री पेंडसे, श्री. राजू, श्री. सुहास मुल्हेरकर, श्री. नितीन शहा इत्यादी उपस्थित होते.