Print
Hits: 7099

डिप्रेशनवर मात कशी करावी
डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी व्यक्ती स्वत:लाच मदत कशी करू शकते?
या आजारात असहाय्यता, स्वत:ची किव निराशा आणि गळून गेल्याच्या नकारात्मक भावनांचे अक्षरश: थैमान असते सर्वात प्रथम लक्षात ठेवायला हवं, की या भावना हा या आजाराचा एक भाग आहे. वस्तुस्थिती बद्दलच्या भावना, म्हणजे काही वस्तुस्थिती नाही! जस जसे उपचार होवू लागतात तशा या नकारात्मक भावनांची तीव्रता कमी होवू लागते.

या दरम्यान त्या व्यक्तीने पुढील गोष्टी केल्यास निश्‍चित फायदा होवू शकतो. नजिकच्या भविष्यकाळासाठी. वास्तवाला धरून, जमतील अशी उद्दीष्टे समोर निश्‍चित करावित. आणि पूर्ण करण्याची जबाबदारी घ्यावे. उदा. येत्या दोन महिने मी रोज कामावर जाईन! कोणकोणती कामं पेंडीग आहेत त्याची यादी बनवायची आणि मग सर्वात महत्वाचं काम त्याच्या समोर एक नंबर घालायचा अशी सगळी क्रमवारी करायची मग महत्वाच्या कामात सोप काम कुठलं ते निश्‍चित करायचं आणि सर्वात महत्वाच्या पण सर्वात सोप्या कामान करायची!

आपल्या आवडीची एक तरी गोष्ट अर्धातास तरी करायचीच उदा. टीव्ही. हिंडणे, गप्पा मारणे, वाचणे( मनोरंजक) मूड हळूहळू निश्‍चित बरा होणार याची खात्री बाळगायची. मंत्राचा उपयोग करायला शिकायचं डिप्रेशनच्या आजारात कुटुंबीयांनी कशी मदत करावी? सर्वात महत्वाची मदत म्हणजे पेशंटच्या आजाराचे निदान आणि उपचारांसाठी त्याला राजी करणे आणि डॉक्टरांकडे नेणे या करता शक्यतो प्रत्येक वेळी डॉक्टरांनकडे जाणे आणि मानसोपचारकाने बोलविताच त्याला भेटून पेशंटची प्रगती सांगणे महत्वाचे आहे.

डिप्रेशनची औषध घेताना मद्दपान हे डिप्रेशनला चालना देतं त्यामुळे औषधांचा उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत पेशंटला भावनिक आधाराची खुप गरज असते. जर आजार समजुन घेतला तर त्याच्या नकारात्मक भावनांना हिडीस करणे बंद होईल मदत कुठे मिळेल?

पुण्यात कोणत्याही महत्वाच्या रूग्णालयात सायकिऍट्रिक ओपीडी आहे.