कोड - पांढरे डाग
२००१ मधे श्वेताच्या संस्थापिका डॉ. माया तुळपुळे यांनी कोड असणा-या व्यक्तींना एकत्र तर केलेच, पण विविध उपक्रमही सुरू केले. भारतात सुमारे दोन ते अडीच कोटी लोकांना हा विकार आहे. पण हे लोक संघटित नाहीत. त्यांना एकत्र आणणे हा संस्थेच्या अनेक उद्देशांपैकी एक. संस्थेची उद्दिष्टे अनेक आहेत.
- कोड असणा-या लोकांना एकत्रित येण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून देणे.
- समाजात या समस्येविषयी जनजागृती निर्माण करणे.
- कोड असणा-या व्यक्तींना समुपदेशनाद्वारे मानसिक आधार देणे.
- विविध स्तरांवर शास्त्रीय माहिती गोळा करणे, संशोधन करून उपचार पद्धती शोधून काढणे.
- भारतातील विविध भागांत जाहीर सभा व चर्चासत्रे घेऊन समाजप्रबोधन करणे. लोकांच्या मनातील गैरसमजुती दूर करणे.
- रोजच्या आयुष्यातील गरजा म्हणजे आयुर्वेदिक उपचार, डाग झाकोळणारी प्रसाधने उपलब्ध करून देणे.
- कोड असलेल्या व्यक्तींकडे समाज विचित्र नजरेने बघतो. लग्नाबाबत नियम अधीकच कडक होतात. लग्न ही ह्या व्यक्तींच्या बाबतीत एक मोठी समस्याच असते. हे लक्षात घेऊन वधू-वर मंडळाची स्थापना २००३ मधे झाली. ह्या उपक्रमाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ६०० नावे नोंदवली गेली, व १७५ मुला-मुलींची लग्ने जमली. आता अंगावर कोड नसलेली मुले सुद्धा लग्नासाठी पुढे येत आहेत.
- वर्षातून २ जाहिर सभा व २ वधूवर मेळावे घेतले जातात. तसेच लेख, आकाशवाणीवरून भाषणे, परिसंवाद आयोजित केले जातात.
संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले जावे आणि सरकार दरबारी व आरोग्य खात्याने या प्रश्नाची दखल घ्यावी, या दृष्टीने संस्थेचे प्रयत्न चालू आहेत.
श्वेता असोसिएशन द्वारा:
डॉ. माया तुळपुळे,
सहवास हॉस्पिटल, २६ सहवास सोसायटी,
कर्वे नगर, पुणे: ४११ ०५२.
दूरध्वनी: ०२०-२५४५८७६०, २५४४०५३०.
ई-मेल: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.