Print
Hits: 4027

के.ई.एम. इस्पितळाशी ओळख
१९७८ साली डॉ. बानू कोयाजी यांच्या आग्रहाने, वैद्यकीय सामाजिक विभागाची पुण्यात के.ई.एम. इस्पितळात सुरवात करण्यात आली. याची सुरवात उपचारादरम्यान रुग्णांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे पहाण्यसाठी करण्यात आली होती. गेल्या दोन दशकांपासून या विभागाने आजारी, चिंताग्रस्त, भयभित झालेल्या, शुद्ध हरपलेल्या रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. वैद्यकीय समाज कार्यकर्ते (MSW) हे रुग्ण व इस्पितळातील वैद्यकीय व्यवस्थापन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असतात.

गेल्या कित्येक वर्षांपासून वैद्यकीय समाज कार्याने आपले कर्मचारी व आपले कार्यक्षेत्र वाढवले आहे. त्यापैकी बहुतांश लोक इस्पितळात येणा-या गरजू व गरीब रुग्णांना मदत पूरवण्यास बांधिल आहेत. इस्पितळात येणा-या ब-याच प्रकरणांना डॉक्टर, परिचारिका MSW यांनाच सांभाळायला किंवा हाताळायला सांगतात. या विभागात ९ व्यवसायिक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आहेत व त्यात एका वरीष्ठ सल्लागाराचाही समावेश आहे.

कर्करोगाने पिडीत बालकांसाठी प्रेरणा मदत गट
कर्करोग हा विनाशकारी आजार आहे व जेव्हा त्याचा एखाद्या मुलावर आघात होतो तेव्हा फक्त त्यामुलावर प्रभाव पाडत नाही तर त्याच्या पूर्ण कुटुंबाला यातना सोसाव्या लागतात. या आघातामुळेच तो मुलगा किंवा मुलगी आपली भुक गमावून बसतात. मुले शाळेत जाणे किंवा मित्रात मिसळणे टाळतात. पालक आपल्या मुलांविषयी चिंतीत असतात. याला उपचाराची महागाई आणखी भर घालते. त्यामुलांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनाही प्रोत्साहन देण्याची आवशक्ता असते. तसेच त्यांना सकारात्मक मार्गदर्शनाचीही गरज असते.

प्रेरणा हीच मदत पुरवण्याचे काम करते. अशा कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी के.ई.एम. इस्पितळातील ओन्कोलॉजी व समाज सेवा विभागाने प्रेरणा मदत गटाची सुरवात केली. या गटात येऊन लोकांना मदत तर मिळतेच शिवाय या आजाराविषयी माहितीही पुरवली जाते. येथे येऊन आपल्या समस्यांवर चर्चा करता येते. या गटामुळे त्यांना मानसिक आधार मिळतो. तसेच कर्करोगाच्या तज्ञांकडून, सामाजिक कार्यकर्ते व बाल मानसोपचारकांकडूनही मदत मिळते. तसेच या गटामुळे डॉक्टर आणि इस्पितळातील कर्मचारी यांच्याशी कौटुंबिक वातावरण तयार व्हायला मदत होते. या सर्व मार्गांनी आजाराचा आघात, उपचार, इस्पितळात दाखल करण्याबाबत आधी घेतलेला धसका नाहीसा होतो व जगण्याची नवी प्रेरणा मिळते.

MSW हे प्रेरणाशी एकरुप झालेले आहेत व ते वर्षातून ७ ते ८ वेळा सामुहिक सत्राचेही आयोजन करतात. ह्या सत्रात त्यांनी या कालावधीत कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले याचे अनुभव कथन करतात व ते या आजाराविषयी अधिकाधिक लोकांना माहिती पुरवतात. ओन्कोलॉजिस्ट हा या मदत गटाचा महत्त्वाचा सदस्य आहे. प्रेरणा सर्वांना ते या लढाईत एकटे नसून आम्हीही त्यांच्या बरोबरच आसल्याचे सांगून मनोधैर्य वाढवतात.

पाठपुरावा
वैद्यकीय सामजिक कार्यकर्ते सतत प्रयत्नशील असतात. रुग्ण उपचार बरोबर घेतो आहे किंवा नाही. सामाजिक किंवा आर्थिक कारणामुळे रुग्णांनी उपचार अर्धवट सोडू नये याकरीता सतत पाठपुरावा करत असतात.

भेट
रुग्णांच्या घरी, शाळेत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी उपचार पुनःर्वसनाच्या दॄष्टिकोनाने सतत किंवा आवशक्ता भासत असेल तर भेट देत असतात.

इतर उपलब्धता
जेव्हा रुग्णाला आणखी वेगळ्या मदतीची आवशक्ता असते तेव्हा के.ई.एम. इस्पितळात अशा अनेक गरजा किंवा मदत पुरवणा-या इतर मदतीचीही उपलब्ध्ता असते. जसे विशेष शाळा, छत्र छायेसाठी घर, ऑर्फनेज, रोजगार उपलब्ध करुन देणा-या संस्था, वैवाहिक समुपदेशन, इतर इस्पितळे इत्यादींचा यात समावेश यात असतो. अधिक खर्चिक असणा-या केमोथेरेपी व रेडियेशन पद्धतींसाठी धन जमा करण्यासाठीही यांचे कार्यकर्ते झटत असतात.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.