आरोग्य.कॉम
  • मुखपृष्ठ
  • पर्यायी उपचार पद्धती
    • आयुर्वेद
    • होमिओपॅथी
    • निसर्गोपचार
    • अ‍ॅक्युप्रेशर
    • अ‍ॅक्युपंक्चर
    • अरोमा थेरपी
    • बॅच फ्लॉवर औषधे
    • घरगुती उपाय
    • मसाज
    • योग
    • ध्यान
    • रेकी
    • संमोहन
    • बॉडीवर्क
  • आजार आणि रोग
    • सामान्य आजार
    • संसर्गजन्य आजार
    • विशिष्ट आजार
  • कुटुंबाचे आरोग्य
    • पुरूषांचे आरोग्य
    • वृध्दांचे आरोग्य
    • महिलांचे आरोग्य
    • मुलांचे आरोग्य
    • किशोर आरोग्य
    • प्रथमोपचार
    • तंदुरूस्ती
    • पोषक पदार्थ आणि अन्न
    • पाळीव प्राणी
  • आरोग्य संपदा
    • वैद्यकीय करियर
    • ग्रामिण आरोग्य
    • हॉस्पिटल्स
    • रुग्णहक्क समिती
    • आरोग्यासाठी टिप्स
  • विमा
    • आरोग्य विमा
    • वैद्यकीय नैतिकता
    • टेलीमेडिसीन
    • इच्छामरण
  • लैंगिकता
    • लैंगिकता म्हणजे काय?
    • लैंगिक शिक्षण
    • गर्भधारणा
    • विवाह
    • कामजीवन आणि अपंगत्व
    • मासिकपाळी
    • ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिझम
    • शरीरभाषा
    • लैंगिकतेपार
    • फेटिशीझम
    • लैंगिक संवेदना गोठणे
  • स्व-मदतगट
    • एपिलेप्सी
    • स्किझोफ्रेनिया
    • पार्किन्सन्स
    • व्यसनमुक्ती
    • स्थुलता
    • कर्करोग
    • नैराश्य
    • अपंगत्व
    • मुत्रपिंड स्व-मदतगट
    • सेतू
    • कोड - पांढरे डाग
    • सहचरी मदत गट
Aarogya.com
English | ગુજરાતી | नोंदणी | लॉग-इन
  • मुख्यपृष्ठ
  • स्व-मदतगट
  • कर्करोग
  • "आस्था" स्तनाचा कर्करोग मदत गट

"आस्था" स्तनाचा कर्करोग मदत गट

  • Print
  • Email
Details
Hits: 4754

कर्करोग: मोटार, अपघात व हृदयविकाराचा झटका या मृत्युच्या कारणांनंतरचे तिसरे सर्वात मोठे मृत्युला कारणीभूत ठरलेले एक कारण. आम्ही कर्करोगाने पिडीत असलेल्या रुग्णाला शल्य चिकित्सेचे, रेडिएशन केमोथेरेपीचे आणि हार्मोन थेरेपीचे उपचार देतो. परंतु हे पुरेसे नाही आहे. जरी आम्हाला कुटुंबाचा मजबूत आधार असला, विशेषज्ञ डॉक्टर, निकटवर्ती सहकारी मित्र, भावनांचे देवाण घेवाण करण्यासाठी नातेवाईक असले तरी काहीतरी अजूनही राहतय. कालांतराने हे मित्र त्यांचे नातेवाईक आपापल्या कामात व आपापल्या आयुष्यात गुंतून जातील.

त्यावेळेस फक्त एकच मदत त्यांना मिळत राहील ती म्हणजे स्व-मदत. ही मदत कायमस्वरुपी, आयुष्यभरासाठी आणि आपल्या हक्काची असते. पण हे वाटते तितके सोपे नाही. एखादा त्रास ज्याने भोगला आहे तोच व्यक्ती त्याच त्रासातून मार्गक्रमण करणा-या दुस-या व्यक्तीचे दुःख समजू शक्तो. तेच एकामेकांना चांगली मदत करू शकतात. तेच एकामेकांना पुन्हा आनंद मिळवून देतात. या देवाण घेवाणीतून स्व-मदत गटाची निर्मिती झालेली आहे.

"आस्था" ह्या मदत गटाचा मुळ उद्देशच स्व-मदत हा आहे. स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण या मदत गटात एकत्रितपणे एकामेकांचे दुःख वाटून घेतात. ते स्वतःचे अनुभव सांगतात व आपल्या भावनाही व्यक्त करतात. ते चांगल्या चांगल्या तज्ञांना मार्गदर्शनासाठी निमंत्रण देतात. त्यांच्या मदतीने ते आपल्या समस्या व आपल्या शंकांचे निवारण करतात. ते आपली सहानभूती वाटून घेतात. त्यांना जगाने त्यांच्यावर दया दाखवावी ही अपेक्षा मुळीच नसते.

डॉ. अनिल अवचट, डॉ. शेखर कुळकर्णी आणि डॉ. मुग्धा यार्दी यांनी या मदत गटाची सुरवात केली होती. गेल्या ब-याच वर्षांपासून पुण्यात हा गट यशस्वीरीत्या कार्यरत आहे. या गटाच्या कार्याचा भाग म्हणून दर महिन्याला अनुभव कथनाचे सत्र आयोजिले जाते. कधी कधी तज्ञांचे व्याख्यानही असते. तसेच आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रश्नमंजूषा स्वरुपाचा कार्यक्रमही घेतला जातो. कधी कधी मनोरंजनाचेही कार्यक्रम राबवले जातात. प्रत्येक कार्यक्रमाची तयारी ही काही स्वयंसेवकांच्या सहाय्याने रुग्णांनीच केलेली असते.

आस्था स्व-मदत गटाने कर्करोगाच्या रुग्णांमधे स्वतःची एक स्वतंत्र ओळख तयार करण्यासाठी प्रेरणा निर्माण केली आहे. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा पूर्णपणे मोकळ्या विचारांनी एकामेकांशी चर्चा करतो. आपण या गटाला मोकळेपणाने फक्त आस्था असेही म्हणू शकता.

डॉ. बावडेकर: "ब-याच दिवसांपासून माझ्या मनात एक कल्पना घोळत होती. हा गट पुण्यात चांगले कार्य करतो आहे आज मला हे बघून मनापासून खुप आनंद होतो आहे." डॉ. बडवे: "मदत गट म्हणजे प्रयोगिक तत्वाची संकल्पना नाही. असे मदत गट संपूर्ण जगात अस्तित्वात आहेत आणि त्यांनी हे सिद्ध केले आहे की मदत गटांमुळे फक्त जीवनशैली सुधारत नाही तर चांगले जीवन जगण्याची इच्छाही वाढते." "आस्था" ची पुण्यात यशस्वी घोडदौड सुरु आहे. प्रत्येक महिन्याला अनुभवकथनाचे सत्र, महत्वाच्या कार्यक्रमांना तज्ञमंडळींना निमंत्रण, त्यांची व्याख्याने हा त्यांच्या कार्याचा एक भागच आहे. चर्चासत्राच्या निमित्ताने सर्वजणाच्या मनातील प्रश्न, शंका यांचे निवारण केले जाते. अशा संपूर्ण कार्यक्रमाची धूरा रुग्ण व सर्व स्वयंसेवक जिद्दीने सांभाळतात. यामुळेच त्यांच्यातली एकता वृद्धिंगत होत जाते.

डॉ. आनंद नाडकर्णी: "आपण जर कर्करोगाने पिडीत असलेल्या रुग्णाची नुसती कल्पना केली तर डोळ्यापुढे त्याचे नकारात्मक चित्र उभे राहते. त्या चित्रात तो रुग्ण अगदी दयनीय अवस्थेत, लाचार आणि निराशेने घेरलेला असा दिसतो. पण इथे मला असे काहीच दिसत नाही. ते स्वतःच्या भावना व्यक्त करतात म्हणजेच स्वतःला व्यक्त करतात. ते समाजात जागृकता आणत आहेत. ही खरोखरच चकीत करणारी गोष्ट आहे. हे सर्व काही जसे नाविन्यपूर्ण आहे तसेच समाजात नवी क्रांती आणणारेही आहे."

"जेव्हा एखादी स्त्री कर्करोगाने पिडीत होते तेव्हा ती आधी पूर्णतः निराश होते जीवनातली उत्तेजनाच निघून गेलीली असते. जेव्हा ती या गटात सामिल होते तेव्हा तीला रुग्ण म्हणून कोणीच संबोधत नाही किंवा तिला तसे कोणी मानत नाही. ह्या गटात त्या एकमेकींच्या मैत्रिणी म्हणूनच वावरतात. हा मैत्रिणींचा समूह वाढतच जातो, आणि यांच्या चेह-या वरील हास्यही."

"आस्था" ने महाराष्ट्रातील अशा अनेक मदत गटांना मदत केली आहे. त्यांनी नाशिक, कराड, बारामती, डोंबिवली, कोल्हापुर या ठिकाणच्या अनेक महिला मंडळांना व पुण्यातील बचत गटांना भेट दिली आहे. आस्थाचे स्वयंसेवक वेगवेगळ्या ठिकाणच्या रुग्णांना त्यांच्या स्थानिक ठिकाणी गट चालू करुन तो चालवण्यासाठी प्रेरणा देतात. त्यामागे त्यांचे नाव व्हावे किंवा पैसा मिळावा अशी कोणतीच आस ते बाळगत नाहीत. हे सर्व काही ते कोणतीही आकारणी न घेता मोफत करत असतात. ही त्यांची स्वयंसेवा आहे. त्यापैकी बरेच जण हेच सांगतात की " आम्हाला खरे आयुष्य कसे जगावे हे कर्करोगाला समोरा समोर तोंड द्यायला लागल्यापासून शिकायला मिळाले". कर्करोगाने त्यांना आयुष्याची खरी किमत कळाली. प्रत्येक दिवशी उगवणारा सूर्य हा त्यांच्यासाठी वरची मिळकतच असते असे ते मानतात. तसेच आस्था मुळे त्यांना आयुष्याचा खरा अर्थ समजण्यास मदत झाली असे ते म्हणतात.



संपर्क
सौ. माधवी सागडे
E-mail id: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
सौ. अपर्णा आंबिके
E-mail id: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
डॉ. रश्मी जोशी
E-mail id: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
डॉ. शेखर कुळकर्णी
E-mail id: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.


0

कर्करोग

  • के.ई.एम. हॉस्पिटल- "प्रेरणा" बालकांसाठी कर्करोग स्व-मदत गट
  • आस्था उपक्रम
  • "आस्था" स्तनाचा कर्करोग मदत गट

Swine Flu

National Award for Outstanding achievement by a Non-Professional - Tushar Sampat

Introducing Digital Practice for Doctors & Healthcare professionals

विशिष्ट आजार
सामान्य आजार

आरोग्य नेटवर्क

आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.

» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pune Aarogya
Digital Media Dedicated to Healthcare of Punekars

वेबसाईटशी लिंक करा

aarogya logo

ईमेल कोड

आमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या

 आरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.

स्वास्थ्य साधने

  • हेल्थ डिरेक्टरी
  • संदेश बोर्ड
  • हेल्थ कॅल्क्युलेटर

आरोग्य.कॉम विषयी

आरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.

अधिक वाचा...

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू

अधिक वाचा...

सदस्यांच्या प्रतिक्रया

“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.!”

  • आमच्या विषयी
  • प्रतिक्रिया
  • गोपनीयता नीति
  • साइट मॅप
  • संपर्क
  • मित्रांशी संपर्क साधा

कॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.