
कॅन्सर - माणसाला मृत्यूकडे घेऊन जाणारा जगातील तिस-या क्रमांकावरील कारण. पहिले अपघात, दुसरे हृदयविकार आणि तिसरे कारण कॅन्सर. पण अशाही परिस्थितीत जेव्हा कॅन्सर सहीत जगणा-या व्यक्ती एकत्र येतात, आणि आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देतात तेव्हा त्या जगण्याला एक नवा अर्थ प्राप्त होतो.
आस्था ही एक स्तन कर्करोगाच्या रुग्णांची स्वयंसेवी संस्था आहे. ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट घेतलेले काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक ह्यासाठी काम करतात. एकमेकांना मानसिक आधार देणे, उपचारांना मदत करणे, मनोबल उंचावणे, जीवनस्तर उंचावणे, व समाजामधे कर्करोगाविषयी जनजागृती निर्माण करणे हा ह्या गटाचा मूळ उद्देश आहे. तज्ञांची व्याख्याने, शिबीरे, कार्यशाळा आयोजीत करणे, वर्तमानपत्रे, दूरदर्शन, प्रसारमाध्यमांतून लोकांपर्यन्त पोहोचणे ह्या गोष्टी सुद्धा ’आस्था’ तर्फे केल्या जातात.
आस्था सपोर्ट गृप आयोजित "यमाच्या बैलाला" एकांकीका
"यमाच्या बैलाला" हे सदरचे नाटक गावोगाव सादर करून कर्करोगाबद्दल माहिती देणे आणि जनजागृती निर्माण करणे हे काम आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट गृप मनापासून करत आहे. ह्या नाटकातून कॅन्सर आणि मृत्यू हे समीकरण आता राहिले नसून व्यवस्थित उपचार घेतल्यास माणूस कसा पूर्ण बरा होऊ शकतो ही माहिती खूप छान विनोदी रीतीन दिली आहे. सर्व वयांतील माणसांच्या मनाला भिडणारे हे नाटक आपल्याला खूप काही शिकवून जाते.
स्थळ
यशवंतराव चव्हाण सभागृह
कोथरुड, पुणे
दिनांक: ३० जुलै, २००९
वेळ: संध्याकाळी ५
आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट गृप बद्दल अधीक माहिती घेण्यासाठी संपर्क
अपर्णा अंबिके: +९१ - ९८२२६६७६८३
माधवी सागडे: +९१ - ९८६०९९२९७२
ह्या नाट्यप्रयोगाचे आयोजन कसे कराल?
- आस्थाशी संपर्क साधून नाटकाच्या उपलब्ध तारखांची चौकशी करणे.
- त्याप्रमाणे तुम्हाला योग्य असेल ती तारिख ठरवणे.
- त्यानुसार स्थानिक नाट्यगृहाचे आरक्षण करणे.
- नाटकाच्या काही दिवस आधी पत्रकार परिषद घेणे (ऐच्छिक).
- त्या नाटकाची स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात, महत्त्वाच्या वर्तमान पत्रामध्ये भित्तीपत्रके लावणे.
- नाटकाला पत्रकार आणि प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रण देणे.
- प्रश्नोत्तरांसाठी अनुभवी अन्कॉलॉजिस्ट/ऑन्कोसर्जन ह्यांना उपस्थित रहाण्याची विनंती करणे.
- नाटकानंतरची प्रसिद्धी.