Print
Hits: 4281

संवेदना ही अपस्माराने पिडीत व्यक्तींच्या आरोग्यासाठी समाजात काम करणारी एक संस्था आहे. ही संस्था म्हणजे पुण्यातील अपस्मार पिडीतांचा एक स्वमदत गट आहे.

२२ फेब्रुवारी २००९ रोजी संवेदना संस्थेने आपल्या कार्यकालाची पाच वर्ष पुर्ण केली. आम्ही विचार केला याक्षणी जरा थांबावे, पुढच्या कार्यासाठी व समाजात खोलवर पोहचण्याठी काही योजना आखाव्या. याच दृष्टिकोनातुन आजवर केलेल्या कार्याचा धावता आढावा घेतला. संवेदना संस्थेचा वर्धापन सोहळा ७ मार्च २००९ रोजी एस. एम. जोशी सभागृह, पुणे येथे साजरा झाला होता.

एस. एम. जोशी सभागृहात लोकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. त्यात फक्त अपस्माराने पिडीत व्यक्ती नव्हत्या तर त्यांचे कुटुंबिय, त्यांचे हितचिंतक, इतर मदत गटांचे सभासद तसेच प्रख्यात न्युरॉलॉजिस्ट स्वतः हजर होते. कार्यक्रमाला सुरवात प्रार्थनेनी झाली. हीच प्रार्थना इतर स्वमदत गटातही प्रचलित आहे. त्यानंतर लगेचच पुढील प्रेरणादायी समुह गीत सादर झाले. देवा जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्विकारण्यास मनाची प्रसन्नता दे, जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीतील भेद जाणण्याचे ज्ञान मला दे.

त्याचवेळेस संवेदना संस्थेच्च्या sanvedana.aarogya.com ह्या वेबसाईटचे ऊद्घघाटण झाले. प्रेक्षकांसाठी तो एक आनंदाचा सुखद धक्क होता. प्रेक्षकांमधील प्रत्येक जण हा उधघाटण सोहळा पाहताना रोमांचित झाला होता. संवेदना संस्थेचे विश्वस्थ व आरोग्य.कॉम वेबसाईटचे मालक श्री. तुषार संपत व आरोग्य.कॉमचेच श्री. आनंद शिंदे यांनी आरोग्य.कॉमबद्दल माहिती सांगितली. ही वेबसाईट वापरासाठी खुपच सोपी व उपभोक्त्यांसाठी खुप अनुकूलही आहे. तसेच या वेबसाईटला भेट देणारे आपले मत मांडू शकतात, आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करु शकतात व समुपदेशकांशी चांगल्या सल्लागारांशी चर्चाही करु शकतात. ते या वेबसाईटवर, संदेश फलकांचाही वापर करु शकतात व डॉक्टरांशी ई-मेल द्वारे पत्र व्यवहारही ठेऊ शकतात. या वेबसाईटचा सगळ्यात महत्वाचा विभाग म्हणजे ’विवाह’ विभाग. संवेदना संस्थेने या विवाहसुचक मंडळाची सुरवात केली होती आणि अशा विभागाच्या सुरवतीची अपस्माराने पिडीत व्यक्तींना खुप आवश्यक्ता होती. आता अपस्मार पिडीत व्यक्ती आपली ओळख जाहीर न करता या विभागात प्रवेश करु शकतात.

संवेदना संस्थेच्या संस्थापिका श्रीमती यशोदा यांनी गेल्या पाच वर्षात त्यांना जे अनुभवे मिळाले ते अनुभव त्यांनी सविस्तररीत्या लोकांसमोर मांडले. प्रेक्षक व उपस्थित मान्यवर मंडळी ते अनुभव एकाग्रतेने ऎकत होते. सर्वप्रथम त्यांनी संवेदना संस्थेची सुरवात कशी झाली याचे वर्णन केले त्यानंतर यासंस्थेसोबत काम करताना अनुभवातून त्यांना कशाप्रकारे नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या याचेही वर्णन त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या," जेव्हा मी संवेदना गटाचे पहिले चर्चासत्र जाहीर केले तेव्हा मला लोकांच्या उपस्थितीची कल्पनाही नव्हती. पण पहिल्यावहिल्या चर्चासत्राला जवळजवळ ४० लोक उपस्थित होते आणि त्यानंतर प्रत्येक चर्चासत्र गणिक रुग्णांची संख्या वाढतच गेली. आम्ही रुग्णांची संख्या वाढवण्यासाठी व समाजात जागृकता आणण्यासाठी प्रत्येक सहा महिन्यात वर्तमानपत्रात व मासिकांसाठी वेगवेगळे लेख लिहित होतो. प्रत्येक लेखाच्या प्रकाशनानंतर जवळपास ५० लोक दुरध्वनीद्वारे संपर्क साधायचे. आम्हाला अपस्मार विवाहविषयक पहिले भेटसत्र जाहीर झाल्यानंतर १०० दुरध्वनी आले.

संवेदना संस्थेचे संरक्षक आणि विश्वस्थ डॉ. अनिल अवचट यांनी केलेल्या भाषणाने प्रेक्षकांमधे सकारात्मकतेची लाट पसरली. ते म्हणाले," या कार्याला यशाचे फळ येण्याचे मुख्य कारण म्हणजे जे स्वतः पिडीत आहेत ते स्वतः या कार्यात मनःपुर्वक योगदान देत आहेत." तसेच सकारात्मक विचार आणि स्विकार ह्या आपल्या यशस्वी जीवनासाठी अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. आनंद हा माणसाला आनंदाची सवय लावतो तर दुःख माणसाला वास्तवाची जाणिव करुन देत असतो, असेही त्यांनी सांगितले. सर्व प्रेक्षक त्यांची प्रेरणादायी कविता ऎकून खुप प्रभावीत झाले.

जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया
जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया
मज काय शक्य आहे आहे अशक्य काय
माझे मला कळाया दे बुद्धी देवराया

संवेदना चे बिज पाच वर्षापुर्वी रोवले होते पण आता त्याचे विशाल वृक्षात परीवर्तन होण्यास सुरवात झाली असुन ते झाड आता फळ देऊ लागले आहे असे आम्हाला वाटते. कारण प्रख्यात न्युरॉलॉजिस्ट आणि वक्ते डॉ. राहुल कुळकर्णी म्हणाले," जेव्हा मी माझ्या दवाखान्यात एखाद्या अपस्मार पिडीत रुग्णव्यक्तीला बघतो तेव्हा लगेच ओळखू शकतो की हा व्यक्ती संवेदना संस्थेचा सभासद आहे किंवा नाही. त्यांच्या हावभावावरुन लगेच हे समजून येत. संवेदनाचा सभासद असलेल्या रुग्णाचा आत्मविश्वास प्रचंड असतो. मी माझ्याकडे आलेल्या नवीन रुग्णांना संवेदना संस्थेशी संपर्क साधण्याचा प्रथम सल्ला देतो. कारण या स्वमदत गटामुळे रुग्णाची मानसिक व शाररिक स्थितीत सुधार आणण्यास मदत होते."

ते असेही म्हणाले की संवेदना संस्था वाढत आहे आणि एक दिवस हा स्वमदत गट भारतातला सर्वात मोठा स्वमदत गट असेल.

प्रमुख पाहुणे लोकप्रिय मराठी लेखक श्री. मुकुंद टक्साळे म्हणाले," मी माझ्या लहानपणापासून अपस्मार पिडीत व्यक्तींना बघत आलो आहे. पण साधारणतः लोक हा आजार लपवायचे. आज मला आनंद होतो आहे कारण ईथे अपस्माराने पिडीत व्यक्ती पुढे येऊन आपले अनुभव सहजरीतीने लोकांसमोर मांडतात. मी संवेदना संस्थेला शुभेच्छा देतो आणि संवेदना संस्थेचा २५ व्या वर्धापनदिनाचे स्वप्न पाहतो आहे.