Print
Hits: 4113

नोकरी विषयी
एपिलेप्सी असलेल्या बर-याच जणांना नोकरी मिळवण्यासाठी समस्या येतात. एपिलेप्सी असणा-या लोकांनी इंटरव्हू मध्ये सांगितले की त्यांना एपिलेप्सीचे झटके पूर्वी यायचे आणि आता ते आटोक्यात आहेत, तरी देखिल त्यांना नोकरी मिळत नाही. बरेच जण ते लपवतात आणि जेंव्हा त्यांना ऑफीस मध्ये एपिलेप्सी चा झटका येतो तेंव्हा त्यांना नोकरी गमवावी लागते. या कारणांमुळे संवेदनाने एपिलेप्सी विषयी वेगवेगळ्या कंपन्यांमधून जागरुकता मोहिम करायचे ठरवले. त्यामुळे लोकांचे एपिलेप्सी विषयी गैरसमज दूर होतील आणि ते लोक देखिल इतर लोकांप्रमाणे काम करु शकतात हे सर्वांपर्यन्त पोहोचेल.

सभासदांना शिक्षणाकरता व इतर कोर्सेस करता प्रोत्साहन
संवेदनाच्या मते एपिलेप्सी मुळे ब-याच जणांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते ,किंवा काही कारणामुळे जर त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नसेल तर त्यांनी घरी खिन्न होऊन बसण्यापेक्षा लहान लहान कोर्स करुन स्वत:च्या पायावर उभे रहावे.
हा या मागचा उद्देश, फक्त मुलांकरताच नाही तर शिक्षकांमध्ये सुद्धा जागरुकता करण्यासाठी सुद्धा आहे.

शाळांमधून जागारुकता
पुष्कळ मुलांना एपिलिप्सीमुळे शाळेत ऍडमीशन मिळण्यासाठी अडचण येते, काही जणांना शाळा सोडण्यासाठी सांगण्यात येते. काही मुलांना शाळेत घेतले असले तरीही त्यांचे एपिलेप्सीचे झटके बघून इतर मुले त्यांच्यापासून लांब रहातात. यामुळे शाळांमधुन जनजागृती करणे अतिशय आवश्यक आहे.

ग्रामीण भागांमधुन जागरुकता
पाच वर्षांपासुन संवेदना पुणे शहरात काम करते आहे. पण आता आम्हाला ग्रामीण भागापर्यंत सुद्धा आमचे कार्य पोहचवायचे आहे. ग्रामीण भागात ह्या विषयी माहिती पोहोचविणे, जनजागृती करणे असे अनेक उपक्रम आम्हाला हाती घ्यायचे आहेत.