गरोदरपणात एपिलेप्सीचे औषधे घेणे थांबवावे काय?
आईच्या एपिलेप्सीमुळे बाळामध्ये काहीतरी दोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतू अशा प्रकारच्या बाळाच्या जन्मदोषाचे प्रमाण सधारणत: ६ टक्के इतके आहे. याचाच अर्थ ९४ बालके आईला एपिलेप्सी असली तरी निर्दोष जन्मतात.
गर्भात असलेल्या मुलात जन्मदोष असेल तर ते जन्मदोष स्त्रिला आपण गरोदर आहोत हे कळण्यापुर्वीच निर्माण झालेले असतात. त्यामुळे गरोदरपणासाठी एपिलेप्सीची औषधे थांबविणे योग्य नाही. त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषधे थांबवू नयेत. एपिलेप्सीच्या औषधांपेक्षा गरोदर स्त्रीला आलेल्या झटक्यांचा तिच्या पोटातल्या बाळावर जास्त परिणाम होतो.
बहुतेक रुग्ण स्त्रियांना गरोदरपणात इतर वेळेपेक्षा जास्त प्रमाणावर झटके येतात, असे सर्वसामान्यपणे दिसते. गरोदरपणासाठी एपिलेप्सीचे औषध बंद करणे, तसेच झोप न येणे हेच बहुदा त्यामागचे कारण असते. त्यासाठी पुरेशी विश्रांती घेणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे कमी करणे योग्य असते.
प्रसूतीच्या वेळी झटका येऊ शकतो का?
होय. तसा झटका येऊ शकतो. तो प्रचंड तणावामुळे येतो. परंतु त्यावर लगेचच उपाय करता येतो. शिरेतुन औषधांचा डोस टोचून तो आटोक्यात आणता येतो.
बाळाला स्तनपान देता येतो का?
एपीलेप्सीच्या औषधांचा अंश मातेच्या दुधात उतरतो. परंतु सहसा नवजात बालकाला त्यापसुन धोका नसतो. कधीकधी त्यामुळे बाळाला सारखी (जास्त) झोप येणे व स्तन चोखताच न येणे अशी अडचण येऊ शकते. अशावेळी बाटलीने बाहेरचे दुध पाजावे लागते. एरवी बाळाला स्तनपान देण्यात कोणतीच अडचण नाही.
बाळाची निगा राखणे व त्याला वाढविणे हे बरेच जोखमीचे काम असते. ज्या मातेला वारंवार झटके येत असतील, अशा मातेने दुस-या कोणाची तरी मदत घेणे गरजेचे आहे.शिवाय बाळाला उचलून इकडे-तिकडे नेताना, आंघोळ घालताना सतत कोणीतरी बरोबर असणे योग्य असते. बाळाचे कपडे बदलताना त्याला टेबलावर किंवा उंच अशा बेडवर ठेवण्यापेक्षा जमिनीवर ठेऊन कपडे बदलल्यास बाळ हातून पडण्याचा धोका टाळता येतो.
गर्भधारणा आणि एपिलेप्सी
- Details
- Hits: 4928
0