एपिलेप्सी हा मेंदुचा आजार आहे. हा आजार अप्समार फ़िट फ़ेफ़रे आकडी, मिरगी अशा अनेक नावांनी ओळखला जातो. पण मराठीतील त्याचे खरे नाव अप्समार असे आहे. असे असले तरीही एपिलेप्सी हे त्याचे आता सर्वमान्य नाव झाले आहे. या आजारामध्ये रुग्णाच्या शरिराला विविध प्रकारचे झटके येतात. झट्क्यांचे प्रमाण काही जणांच्या बाबतीत जास्त तर काहींच्या बाबतीत्त कमी असते. या झटक्यांना सर्वसामान्यपणे फ़िट आली असे म्हटले जाते.
हा आजार कशामुळे होतो?
या आजाराला काही विशीष्ट कारण नसते, काहींच्या बाबतीत हा अनुवंशिक्ततेमुळे येतो.
खालील कारणांमुळे हा आजार होऊ शकतो
- डोक्याला मार बसणे
- ब्रेन ट्युमर होणे
- मेंदुला सूज येणे
- प्रसुतिच्या वेळी बाळाच्या मेंदुला इजा होणे
- पटकन चढणारा तिव्र होणारा ताप
- मॅनिंजायटिस सारखे मेदुचे आजार.
- सोडिअम, कॅल्शिअमची बाळामध्ये असलेली कमतरता
- औषधांचा प्रमाणाबाहेर डोस
- विषाणू किंवा जिवाणूंचा संसर्ग इ.
ऎपिलिप्सी चे निदान
या आजाराचे निदान करण्यासाठी ठराविक अशी कुठली चाचणी नाही. आजाराचे निदान अचुक होण्याच्या दृष्टीने झटका आलेली व्यक्ती व तो झटका ज्यांनी पाहीला आहे त्यांनी, खालील गोष्टींची नोंद करुन डॉक्टरांना सांगणे उपयुक्त ठरते
- झटका येण्याआधी कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना मिळाली होती का?
- लघवी किंवा नकळत शोचाला होणे.
- जागेपणी आणि झोपेत झटका येण्याचे प्रमाण किती आहे.
- झटका हा सर्वसाधारण प्रकारचा होता कि एखाद्या अवयवापर्यंत मर्यादित होता
- झट्क्याची सुरवात झाली पण पुर्ण झाला नाही असे किती वेळा झाले
- झटक्याची सुरवात कशी झाली, ती एका अवयवापासुन सर्वत्र पसरली कि सर्वच शरिराला एकदम झटका आला
- झटका किती काळ टिकला.
- झटका येण्याच्या काळात, प्रचंड दोकेदुखी, उलट्या, ताप येउन गेला होता का?
- काही मोठा आजार होऊन गेला असेल तर त्याची माहिती.
- डोक्याला काही आघात झाला असेल तर त्याची माहिती
- डायबिटिस किंवा बी.पी. असल्यास त्याची माहिती.
या माहिती बरोबरच रुग्णाची सखोल शारीरिक तपासणी केली जाते. शारीरिक तपासण्यानंतर खालील काही चाचण्या, आवश्यकतेनुसार घेतल्या जातात
- मेंदुचा व छातीचा एक्स-रे
- रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण व ब्लड काऊंट
- अँजिओग्राफी
- बुध्यांक चाचणी आणि पर्सनल टेस्ट
- ई.ई.जी. कॅट सॅकन