Print
Hits: 4234

एपिलेप्सीचा इसवीसन पूर्व इतिहासातही उल्लेख आहे. या आजाराला कोणत्याही भौगोलिक, जातीय, सांस्कृतिक, आर्थिक सीमा नव्हत्या. हा विकार कोणालाही व कोणत्याही वयात होऊ शकतो. जवळजवळ १०० लोकांमधे १ व्यक्ती अपस्माराने पिडीत असते. एकतर त्या व्यक्तीला लहानपणापासून हा विकार जडलेला असतो किंवा वय झाल्यावर त्या व्यक्तीवर या आजाराने ताबा मिळवलेला असतो. जर या आजाराचा योग्यवेळी उपचार झाले नाहीत तर लहान मुलाच्या वाढीबरोबरच अपस्माराचे झटके पुन्हा पुन्हा वारंवारीतेने येत राहतात त्याचे प्रमाण वाढतच जाते. एपिलेप्सी ही एक व्यापकता एक समस्या आहे.

या आजारातील बरेच लोक सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात. येणा-या झटक्यांवर जितके चांगले नियंत्रण असेल तितकेच चांगले आयुष्यही जगता येते. हे चांगले जीवन जगण्यासाठी रुग्णाच्या व त्याच्या जवळ राहणा-या व्यक्तीच्या पुढील तीन गोष्टींवर अवलंबून आहे.

  1. अपस्माराचा झटका येण्याआधी त्याची तिव्रता अधिक आहे किंवा सौम्य आहे हे ओळखणे.
  2. झटका येण्याआधी त्याबद्दलची काळजी स्वतःहून व वेळोवेळी घेत राहणे.
  3. रुग्णामधे समाज स्विकृती असायला हवी.

शहरात व प्रगत भागात पहिल्या दोन गोष्टींबाबत लक्षणीय बदल झालेले आहेत पण तिसरी बाब अजुनही चिंताजनक आहे.

न्युरॉलॉजिस्टच्या पिढ्यांनी समाजातील अपस्मारसंबंधी गैरसमज काढून टाकण्याचे काम उत्कृष्टरित्या केले आहे. मोठ्या शहरांवर दृष्टिक्षेप टाकल्यास प्रगती दिसून येते. जस्तीत जास्त लोक आता या आजाराच्या निवारणासाठी व चिकित्सा व्यवस्थापनासाठी पुढे येऊ लागले आहेत. त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. तुलनात्मक दृष्ट्या रोजची घ्यायची औषधे, निरोगी जिवनशैली खरोखरच सुधारलेली आहे. अपस्मार रोखणारी औषधेही चांगलीच आहेत. निदान करण्यासाठी अद्यावत यंत्रसामग्री चांगल्या डॉक्टरांकडे उपलब्ध आहेत.

तसेच दुस-या बाजूने विचार केला तर अपस्मार आजाराबरोबर जगणारे व त्यांची काळजी घेणारे आजही संबंधित काही गोष्टींपासून अजाण आहेत. जसे शैक्षणिकबाबी, रोजगार, विवाह इत्यादी. असे नेहमीच सांगितले जाते की या आजाराबाबत समाजाचा दृष्टिकोन पिडीतासाठी आजारापेक्षाही अती क्लेशकारी राहीला आहे.

ढोबळ मनाने विचार केला तर अपस्माराने पिडीतांचे चार प्रकार पडतात.

  1. गट १. असे लोक ज्यांनी अपस्मार आजारावर औषधांनी नियंत्रण मिळवले आहे, ज्यांना अपस्मार होऊन कमी अवधी झालेला आहे व जे या आजारासह सर्व स्तरावर कार्यरत आहेत.
  2. गट २. असे लोक ज्यांना ठराविक वर्षांपासून बराच काळ उपचाराच्या व औषधांच्या माहितीच्या अभावाने येणा-या झटक्यांवर नियंत्रण मिळवता येत नाही. (असे लोक ज्यांना एकाच वेळी अनेक झटके येतात).
  3. गट ३. असे लोक ज्यांना मोठ्या कालावधीपासून येणा-या झटक्यांवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. या आजारामुळे ज्यांच्या आयुष्यातल्या सर्व भागांवर प्रभाव पडला आहे. यावर कसे नियंत्रण मिळवावे यापासून अजाण आहेत व ज्यांना अधिक काळजीची व दक्षतेची आवशक्ता आहे.
  4. गट ४. असे लोक जांना अपस्माराबरोबरच न्युरॉलॉजिकल समस्या आहेत. मानसिक गती मंदावली आहे. जे पूर्णतः आपली काळजी घेणा-यावर व जे त्यांच्या गरजा पुर्ण करतात अशांवर अवलंबून आहेत

या आजाराने पिडीत व्यक्तीचे शिक्षण, रोजगार व लग्न त्या त्या व्यक्तीच्या आजाराच्या वर्गीकरणामुळे विलग झाले आहे.

शैक्षणिक: पिडीतांपासून शैक्षणिक भाग विलग होण्याची गैरसमज, दुर्लक्ष, पालकांमधे व शिक्षकांमधे वावरणारी भीती ही कारणे आहेत. आपल्या देशात पालक जास्त काळजी करणारे व भिती बाळगणारे असतात. यामुळे ते त्याच्या अपस्मार असणा-या मुलांना लांब असणा-या शाळेत पाठवण्यास धजावत नाहीत. याला शिक्षकही स्वतःच्या डोक्यावरील भार टाळण्याच्या दृष्टिकोनाने दुजोरा देतात. शाळेतील वर्गामधे अजाणतेमुळे येणारा झटका नियंत्रणात आणता येत नाही व ते लक्ष विचलित करणारे असते. जर शाळेतील शिक्षकांचा दृष्टिकोन नकारात्मक असेल तर मुलांचाही दृष्टिकोन नकारात्मकच होतो. अशावेळेस त्या अपस्मार पिडीत व्यक्तीला लाजेने मान खाली घालावी लागते व अशाने त्यामुलामधे न्युनगंड तयार होतो. शैक्षणिक दृष्ट्या लोक अपस्मार पिडीताच्या बाजूने विचार करत नाहीत.

रोजगार: एकदा जर एखाद्या मुलाचे शिक्षण काही कारणास्तव पुर्ण झाले नाही तर जरी त्यामुलाने या आजारावर नियंत्रण ठेवायला शिकले असले तरी त्यामुलाचे भवितव्य धुक्यात अडकल्यासारखे होते. इथे पुन्हा अपस्मार पिडीत व्यक्ती रोजगार कमवण्यासाठी किंवा स्वबळावर काही करण्यासाठी असमर्थ असल्याचे ठरवले जाते. ज्यांना वारंवार या आजारामुळे झटके येतात त्यांनी न डगमगता आपल्या गुणांना उजळवून टाकले पाहिजे आणि समाजाचे हिस्सेदार व जबाबदार नागरिक बनले पाहिजे.

विवाह: शैक्षणिक व रोजगाराच्या अपात्रतेमुळे लग्नाच्या शक्यता कमी होत जातात. वैवाहिक जीवनाच्या इच्छा आकांशा कमी होत जातात. लोक लग्नाआधी आपल्या साथीदाराला आपल्या अपस्मार आजाराविषयी पुर्वकल्पना द्यायचा सल्ला देतात.

अपस्मार पिडीतांना खरी गरज आहे स्वतःचा आत्मविश्वास दृढ करण्याची. त्यांनी होऊ शकेल तितके स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करावा. इतर दुस-या कोणत्याही व्यक्तीप्रमाणे त्याचेही काही ध्येय असावे, ज्ञान असावे व ते ध्येय पुर्ण करण्यासाठी कौशल्य असावे.
या आजाराबरोबर जीवन जगणारे व त्यांची काळजी घेणा-यांनी खालील आज्ञांचे पालन करावे.

दहा आज्ञा

डॉ. प्रविण शाह यांच्या सहकार्याने