एपिलेप्सी
एपिलेप्सी स्व-मदत गट
सहवेदनेतून आनंदी जीवनाकडे…
’संवेदना फाऊंडेशन’ हा पूर्णपणे पेशंटनी पेशंटसाठी चालवलेला एपिलेप्सी स्व-मदत गट आहे. गटामध्ये आम्ही ’पेशंट’ हा शब्द न वापरता त्यांना आम्ही ’सभासद’ म्हणतो. सर्व सभासद आणि त्यांचे पालक हे सहवेदनेतून जात असतात. आपल्या मनाची उभारी वाढवण्यासाठी , अनुभव एकमेकांना सांगण्यासाठी आणि काही वेळा तज्ञांची मते ऎकण्यासाठीही आम्ही एकत्र जमतो.
महिन्यातील एका रविवारी गटाची मासिक सभा भरते. त्या सभेत आमचे शेअरिंग म्हणजे अनुभवांची देवाण- घेवाण होते. त्यातून सकारात्मक विचार पुढे येतात.
आम्ही एपिलेप्सी संबंधित इतर विषय सुध्दा हाताळतो
- आहार आणि एपिलेप्सी
- योग- प्राणायम आणि एपिलेप्सी
- एपिलेप्सीसाठी सुजाण पालकत्व
- छंदाचे मह्त्त्व
- युवा पिढीतील आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिबीर
- एपिलेप्सी विषयाचे गैरसमज
स्व-मदत गट सुरु झाल्यानंतर अनेक सभासदांच्या मनातील एपिलेप्सी विषयीचा न्युनगंड जाण्यास सुरुवात झाली आहे तसेच एपिलेप्सीसहित आपण आपले जीवन अधिक अर्थपूर्ण कसे जगू शकू यावर आम्ही विचार करायला लागलो. समाजाचीही ह्या आजाराकडे बघण्याची दृष्टी बदलावी, हा सुध्दा आमचा उद्देश बनला.
फीट आली असता इतरांनी काय करावे....
- गडबडून जाण्यापेक्षा धीराने घ्या.
- पेशंटच्या मानेखाली उशी किंवा हात ठेवा आणि कुशीवर झोपवा.
- त्याचा चष्मा काढून ठेवा आणि कपडे थोडे सैल करा.
- दारं खिडक्या उघडून पेशंटला मोकळी हवा मिळू घ्या.
- पेशंटच्या तोंडातून गळणारी लाळ टिपून घ्या.
- पेशंटच्या अवती भोवती गर्दी करु नका.
- पेशंटला पाणी पाजू नका. पाणी श्वासनलिकेत जाऊन पेशंट गुदमरु शक्तो.
- कांदा, चप्पल नाकाला लावणे आवश्यक नाही.
- फीटमुळे होणारी त्याच्या हातापायाची थरथर जबरदस्तीने थांबवू नका.
एपिलेप्सी रुग्णाने आपल्या खिशात कायम एक चिठ्ठी बाळगावी ज्यामध्ये खालील माहिती असेल.
स्वत:चे नाव, पत्ता, डॉक्टरचे नाव, टेलिफोन नंबर, औषधाचे नाव इत्यादी. त्यामुळॆ अडचणीच्या वेळी योग्य ती मदत उपलब्ध होऊ शकेल आणि रुग्णाच्या जीवाचा धोका टळू शकेल.
एपिलेप्सीविषयी गैरसमज.....
- फीट ही भुतबाधा, देवीचा कोप, वेडाचा झटका यामुळॆ कधीच येत नाही.
- हे केवळ गैसमज असून त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
… यामध्ये आपलेही स्वागत आहे.
एपिलेप्सी सल्ला केंद्र
नुतन सोसायटी, गोंधळी गल्ली,
मावळे हॉस्पिटल समोर, मोदी गणपती मागे,
५३४ नारायण पेठ, पुणे: ४११०३०.
दर मंगळवारी दुपारी ४:३० ते ६:३० (कृपया फोन करून यावे.)
संपर्क : यशोदा वाकणकर, मोबाईल - +९१-९८२२००८०३५.
राधिका देशपांडे, मोबाईल - +९१-९८५०८८७६४४.
ई मेल:This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.