Print
Hits: 15678

३ डिसेंबर हा जागतिक अपंग दिन का ठरवला गेला?
जागतिक अपंग दिन हा युनायटेड नेशन्स हे एकत्रित कार्य करून अपंगासाठी जाहीर केला. हा दिवस अपंगासाठी व त्यांच्या कार्य क्षमतेसाठी साजरा केला जातो.

या दिवसाचा थोडासा इतिहास: हा दि १९९२ मध्ये जाहीर केला. ह्या दिवशी जनरल असेंब्ली अपंगत्वाबाबत जागृकता, त्यांना राजकीय, सामाजिक, कार्यक्रमास सामील करून घेण्याची भावना वाढवण्यासाठी कार्य केले जाते. १९९९ साठीची यांची थीम ही “सर्वांना नविन शतकाची प्रतिक्षा आहे." जवळजवळ अर्धा बिलीयन लोक, शारीरीक, न्सेसरी, मानसिक यापैकी कोणत्याही प्रकारामुळे अपंग आहेत. ते जगाच्या कोणत्याही भागात राहात असले तरी त्यांच्या आयुष्यावर शारीरीक व सामाजिक प्रकारची अनेक बंधने येतात.

अपंगाना अनेक क्षेत्रात मान्यता मिळवण्यास गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. या क्षेत्रात घडलेली चांगली घटना ज्या मुळे या क्षेत्राला क्षूप चांगले वळण मिळाले ती म्हणजे, १९८१ मध्ये जनरल असेंब्ली ने जाहीर केलेले अपंगत्व वर्षे. तसेच जागतिक अपंगत्व दशक (१९८३ ते १९९२) हे अपंगाचा संपूर्ण सहभाग आहे आणि बरोबरी या भावना वाढवण्यासाठी ह्या दशकाचा वापर केला गेला.

अपंगाच्या हालचालीवर अभ्यास करण्यासाठी १९९२ मध्ये जनरल असेंब्ली ने कार्यक्रम सादर केला होता.

जागतिक कार्यक्रमाला आधारून सॅन्डर्ड रूलस्‌ ऑन इकवॅलायलेशन ऑफ अपॉर्च्यूनिटीस्‌ फॉर परसन्स विथ डीसऍबिलीटीज हे १९९३ मध्ये तयार केले गेले.

ते सर्व नियम गव्हर्मेंट ला बंधन कारक नव्हते. अपंगाच्या नैतिक भावना या नियमांची बळकट झाल्या. युनायटेड नेशन्स चे कार्य हे मिळणार्‍या संधि सर्वत्र उपलब्ध होत आहे यावर केंद्रित होते.