आरोग्य.कॉम
  • मुखपृष्ठ
  • पर्यायी उपचार पद्धती
    • आयुर्वेद
    • होमिओपॅथी
    • निसर्गोपचार
    • अ‍ॅक्युप्रेशर
    • अ‍ॅक्युपंक्चर
    • अरोमा थेरपी
    • बॅच फ्लॉवर औषधे
    • घरगुती उपाय
    • मसाज
    • योग
    • ध्यान
    • रेकी
    • संमोहन
    • बॉडीवर्क
  • आजार आणि रोग
    • सामान्य आजार
    • संसर्गजन्य आजार
    • विशिष्ट आजार
  • कुटुंबाचे आरोग्य
    • पुरूषांचे आरोग्य
    • वृध्दांचे आरोग्य
    • महिलांचे आरोग्य
    • मुलांचे आरोग्य
    • किशोर आरोग्य
    • प्रथमोपचार
    • तंदुरूस्ती
    • पोषक पदार्थ आणि अन्न
    • पाळीव प्राणी
  • आरोग्य संपदा
    • वैद्यकीय करियर
    • ग्रामिण आरोग्य
    • हॉस्पिटल्स
    • रुग्णहक्क समिती
    • आरोग्यासाठी टिप्स
  • विमा
    • आरोग्य विमा
    • वैद्यकीय नैतिकता
    • टेलीमेडिसीन
    • इच्छामरण
  • लैंगिकता
    • लैंगिकता म्हणजे काय?
    • लैंगिक शिक्षण
    • गर्भधारणा
    • विवाह
    • कामजीवन आणि अपंगत्व
    • मासिकपाळी
    • ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिझम
    • शरीरभाषा
    • लैंगिकतेपार
    • फेटिशीझम
    • लैंगिक संवेदना गोठणे
  • स्व-मदतगट
    • एपिलेप्सी
    • स्किझोफ्रेनिया
    • पार्किन्सन्स
    • व्यसनमुक्ती
    • स्थुलता
    • कर्करोग
    • नैराश्य
    • अपंगत्व
    • मुत्रपिंड स्व-मदतगट
    • सेतू
    • कोड - पांढरे डाग
    • सहचरी मदत गट
Aarogya.com
English | ગુજરાતી | नोंदणी | लॉग-इन
  • मुख्यपृष्ठ
  • वृध्दांचे आरोग्य

वृध्दांचे आरोग्य लेख

पुन्हा वसंत येऊ द्या!

  • Print
  • Email
Details
Hits: 4252

वृध्दांनी, मृत्यूबद्दलचा विचार करणे सोडून द्यावे. त्यामुळे मृत्यूबद्दल वाटणारे भय कमी होईल. कोणत्या पध्दतीने केव्हा आणि कसा मृत्यू येईल याबद्दलची काळजी प्रत्यक्ष मृत्यूच्या वेळेपर्यंत पुढे ढकलावी व आनंदाने जीवनाला सामोरे जावे.

तात्पर्य, जीवनात हसतमुख राहा म्हणजे जीवनाच्या सोनेरी संध्याकाळी सुध्दा तुम्ही त्याच मजेने जीवन व्यतित करू शकाल.

जीवनाच्या साठीत तुम्ही येउन पोहचला आहात, त्यामुळे कित्येक समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागत असेल. त्या समस्यामुळे तुम्ही घायाळ होणार का जीवनाच्या अखेरपर्यंत व्यवस्थितपणे मार्गक्रमण करणार?

"म्हातारपण म्हणजे दु:खच !" असे समीकरण तुम्ही मांडत नसाल तर पुढील लेख तुमच्यासाठीच आहे. वृध्दापकाल सुखमय होण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ संगीता ठाकूर तुमच्याशी चर्चा करीत आहेत.

वृध्दांच्या विचार विश्वातला बराचसा भाग मृत्यू त्या विषयाने व्यापलेला असतो. कधीकाळी खूप दूरवर असणारा मृत्यू जवळपास येऊन ठेपल्याची भावना होते. मृत्यूच्या कल्पनेला सामोरे जाणेसुध्दा वृध्दाना कष्टदायक वाटते.

त्या वयात सर्वसाधारणपणे पुढील प्रश्न मनात येतात.
मी नेमका कधी मरेन?
स्वत:च्या मृत्यू नेमका कधी येणार हे कळणे अशक्य आहे हे वृध्दांना माहीत असतं, तरीही आपली जीवनरेषा किती लांब आहे याचा थोडा फार अंदाज त बांधतातच त्याचप्रमाणे मग ते उर्वरित भविष्यासंबधी योजना आखतात. पन तरीही जेव्हा ते आजारी पडतात, त्या प्रत्येक वेळी त्यांच्या मनात विचार येतोच की आपली वेळ आताच तर भरली नाही ना!

माझा मृत्यू कोणत्या कारणामुळे(आजारामुळे) ओढवेल?
६५ वर्षाचे एक वृध्द गृहस्थ म्हणतात की माझ्या अतिरक्तदाबामुळे मला पक्षाघाताचा झटका येऊ शकतो हे जाणवल्यावर मी योग्य ती काळजी घेईन. माझी अपूर्णावस्थेतील कामे पूर्ण करेन. कधी ना कधी मला मृत्यू येणार आहे याची मला जाण असली तरी तो वेदनारहित असावा असे मला वाटते.

पुढील आयुष्य असह्य वाटत असेल तर माझे हे आयुष्य मी इथेच संपवू शकतो कां? मला असाध्य आजार झालेला असल्यास मी आत्महत्या करू शकतो कां?

मला वेदनामय मृत्यू येईल कां?
मृत्यूचा विचार वृध्दांना नेहमीच मानसिक तणावात ठेवतो. त्यांच्या अनेक दु:खापैकी हे सर्वात गंभीर दु:ख होय.

स्मृतीभ्रंश
जीवशास्त्रीय बदलांमुळे आणि पेशींच्या र्‍हासामुळे वृध्दापकाली स्मृती कमी होत जाते. जसजसे वय वाढत जाते तसतशी स्मृतीभ्रंशाची तीव्रता वाढत जाते.

काही दिवसांपूर्वी सांगितलेले ते सर्व विसरून जातात. जुन्या घटना बऱ्याच अंशी लक्षात राहतात पण ताज्या घटना मात्र विसरल्या जातात. नजीकच्या भूतकाळातील गोष्टी विसरण्याची काही कारणे पुढीलप्रमाणे

अ) ती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी ते (कष्ट) प्रवृत्त होत नाहीत.
ब) इतरांचे संभाषण ऐकू येणे कठीण होत जाते.

निद्रानाश
वृध्दापकालात झोपेचे प्रमाण कमी कमी होत जाते. ६० ते ७० व्यावर्षी रात्रीची झोप सर्वसाधारणपण एक दोन तासांनी कमी होत जाते. प्रदीर्घ झोप जवळजवळ नाहीशीच होते.

सेवानिवृत्ती समस्या
नोकरी, धंद्यातून निवृत्ती मिळावी याची प्रथम वाट बघितली जाते, पण ही गोष्ट जेव्हा प्रत्यक्षात येऊन ठेपते तेव्हा मात्र ती नकोशी वाटते. निवृत्तीचा काल असा घालवायचया ही मोठीच विवंचना होऊन बसते. मग अशा वेळी या वृध्द माणसांना एकाकी, निरूपयोगी, उदासीन वाटू लागते.

मग असे पुरूष त्यांच्या पत्‍नींशी विचित्रपणे वागू लागतात. पत्‍नींच्या सतत चूका काढणे, तिच्यावर वैतागणे अशा घटना घडू लागतात. बर्‍याच वेळा वृध्दांना अर्थिक अडचणींशी सामना करावा लागतो. मग अशा वेळी मुलांवर अवलंबून राहणे ही कल्पना स्विकारायला त्यांना अवघड वाटते. मुलावर अवलंबून रहात असताना आपली वर्चस्व गाजविण्याची वृत्ती जर वृध्दांना सोडता आली नाही तर परिस्थिती आणखीच बिकट होत जाते.

६४ वर्षांची एक वृध्द स्त्री म्हणते, ‘माझा नवरा कामानिमित्त बाहेर असे तेव्हा बरे होते. आता सतत घरी असल्यामुळे तो अगदी चिडचिडा होतो व सतत माझे डोके खातो.

६५ वर्षाचे एक आजोबा म्हणतात की प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा माझ्या डोक्यात हा विचार येतो की आता हा आजचा दिवस आपण घालवायचा तरी कसा? कोणाच्या घरी जायचं? कोणत्या बागेत जाऊन बसायचं आणि आज जेवायच्या वेळी कोणते पदार्थ असणार आहेत?

आवडीनिवडीत बदल
माणसे जसजशी वृध्दत्वाकडे झुकू लागतात तसतशी ती स्वतःचा विचार जास्त करू लागतात. इतरांशी बोलताना स्वतःच्या भूतकाळासंदर्भात सतत बोलत राहतात. आपल्या आजाराबद्दलचा, दिसण्याबद्दलचा, कपड्यांबद्दलचा उत्साह कमी होत जातो. काही जणांची धार्मिक वृत्ती वाढत जाते. निरनिराळ्या तिर्थस्थळांना भेटी देणे, अध्यात्मिक पुस्तके वाचणे, हे प्रकार वाढू लागतात. तर काही वृध्द मंडळीचे, ग्प्पाष्टकात भाग घेणे, वाचन करणे, पत्ते खेळणे अशा गोष्टीत मन अधिक रमू लागते.

वृध्दत्वाबद्दल असणार्‍या गैरसमजूती
वृध्दत्व म्हणजे आजारपण हे विधान नेहमीच बरोबर ठरत नाही. ज्याप्रमाणे तरूण माणसे काही वेळा आजारी पडतात त्याचप्रमाणे वृध्दही आजारी पडतात. काही वेळा काही तरूण मंडळी निकोप, निरोगी असतात, त्याचप्रमाणे काही वृध्द माणसे ठणठणीत असतात. खरं तर ८० वर्षाच्या वृध्दाचा शारीरिक, मानसिक अधूपणा, हा ६० वर्षाच्या माणसापेक्षा नक्‍कीच जास्त असतो.

काही म्हातारी माणसे मात्र सदैव टवटवीत, कार्यप्रवण असातात. उदा. (नेल्सन मंडेला) कारण त्यांच्या मते वृध्दत्व आणि आजारपणाचा काहीही अन्योन्य संबंध नसतो. त्यांना वृध्दापकाल हाही जीवनातील इतर कोणत्याही कालांप्रमाणेच एक वाटतो.

थकवा जाणवणे, विस्मरण होणे, अशक्तपणा वाटणे, इत्यादी वृध्दापकालाशी निगडीत गोष्टी अशा वृध्दांना अवास्तव वाटतात. ते वृध्दापकालीन आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन बाळगून जगताना आढळतात. त्यांच्या आयुष्यात स्मृतीभ्रंश, विस्मरण होणे वगैरे घटना घडत असतात. पण ते त्यांचा बाऊ करत नाहीत. अतिशय सहजपणे या बाबी ते स्विकारतात. ही वृत्ती त्यांना त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य ठणठणीत ठेवण्यास व दीर्घायुष्यी होण्यास मदत करते.

जीवनातील सर्वात खडतर काल
हे विधान नेहमीच खरे नसते. वस्तुस्थिती अशी असते की तारूण्यात काय किंवा वार्धक्यात काय वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या या असतातच. मृत्यू, कर्करोग हृदयविकाराचा झटका, आर्थिक समस्या वगैरे तारूण्यात काय किंवा म्हातारपणी काय दोन्ही वेळा येऊ शकतात. आपण त्या घटना कशा स्वीकारतो आणि त्यांच्यावर कशा रीतीने मात करतो हे महत्वाचे!

उदा. एखाद्या व्यक्तीला नोकरी व्यवसायात अपेक्षित बढती मिळाली नाही तर त्याला हे जीवन व्यर्थ आहे असे वाटू लागते. तर दूसरी व्यक्ती ‘आज नही तो कल!’ असा आशावादी विचार बाळगून शांत राहते. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, गंभीर आजार अशा गोष्टी आयुष्यातील दाहक सत्य म्हणून स्वीकाराव्या व समाधानाने जगत राहावे. आपल्या संपर्कात संबंधित व्यक्तींशी जुळवून घेऊन त्यांना समजावून घेण्याचा वृध्दांनी प्रयत्‍न करावा (इच्छा असल्यास ते तसे वागू शकतात) जुन्या नव्या पिढीतील अंतर, जाणत्या मुलांनी त्यांचे त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी स्वीकारलेली जीवनपध्दती अशा गोष्टी त्यांनी समजावून घ्यावयास हव्यात. नव्या पिढीस विचार-आचार स्वातंत्र्य जरूर द्यावयास हवे. तसेच या नव्या पिढीने त्यांच्या मुलांना वाढविण्याची (संगोपन, पालकत्व) जी पध्दत नियोजित केली असेल तिला संमत्ती द्यावयास हवी.

आपल्या मुलांच्या आयुष्यात शक्यतो कमी ढवळाढवळ करणे श्रेयस्कर ! कारण आपली जाणती मुले सर्व बाजूंनी पूर्णपणे विकसित झालेली असतात. त्यांचं स्वतःचं म्हणुन एक वेगळं, विशिष्ट व्यक्तीमत्व विकसित झालेले असते. त्यामुळे सर्व बाबतीत आपण स्वयंपूर्ण व्हावे असे त्यांना वाटणे ओघानेच येते. याचा अर्थ असा मात्र नव्हे, कि आपली मुले समाजाच्या दृष्टीकोनातून गैरमार्गाने वागत असली तर त्यांना दटावायचे नाही. या वयातही वृध्दांना, त्यांच्या मुलांना सल्ला देण्याचा, मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहेच. पण त्या अधिकाराचा वापर योग्य पध्दतीने व्हावयास हवा.

जीवनातील अपरिहार्य कंटाळा व एकाकीपणा दूर घालविण्यासाठी नवीन छंद या वयातही जोपासायला हवेत. नवीन सहकारी (मित्रमैत्रिणी)जोडायला हव्यात. बागकाम, सहली, प्रवास, लहान मुलांना शिकविणे, बालवाडी काढणे, समाजोपयोगीकामे करणे (अंधशाळा, बहिर्‍या मुक्यांच्या शाळा किंवा अनाथाश्रमात जाऊन काम करणे) वाद्य वाजविणे, अशा प्रकारचा विरंगुळा शोधून त्यात मग्न राहीले तर वृध्दत्व बोचत नाही किंबहुना वृध्दत्वाचा विचार फार कमी वेळा त्यांच्या मनात येतो.

मित्र जोडणे हा खरोखरीच चांगला छंद आहे. म्हातार्‍या माणसांना त्यांच्या तारूण्यात नोकरी व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या, यामुळे सग्या-सोयऱ्याकडे जाणेयेणे, जमले नसेल तर आताच्या रीकामपणात त्यांनी ओळखी वाढविणे, मैत्री करणे, स्नेह संपादन करणे अशा गोष्टी जाणीवपूर्वक करायला हव्यात. शक्य असेल तर वृध्द माणसांनी नियमितपणे चालत फिरायला जावे. त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता, आरोग्य उत्तम, रहाण्यास मदत होईल. शारीरिक स्वास्थ्यामुळे मानसिक आरोग्यही सुधारेल. वृध्दांनी मृत्यूबद्दलचा विचार करणे सोडून द्यावे. त्यामुळे मृत्यूबद्दल वाटणारे भय कमी होईल कोणत्या पध्दतीने, केव्हा आणि कसा मृत्यू येईल याबद्दलची काळजी प्रत्यक्ष मृत्यूच्या वेळेपर्यंत पुढे ढकलावी व आनंदाने जीवनाला सामोरे जावे.

मध्यमवयीन स्त्री पुरूषांनी भविष्यात साकारायच्या वृध्दत्वाच्या भूमिकांची जाणीव, ओळख करून घेण्यास सुरवात करावी. त्यामुळे कार्यालयात व्यवसायाच्या ठिकाणी, कुटुंबात सार्वजनिक जागी नवीन भूमिका स्वीकारणे सोपे जाईल.

वृध्दत्वातील शारीरिक व मानसिक बदल कसे आणि केव्हा येणार याचे नेमके ठोकताळे नसतात. व्यक्तिगणिक त्यात खूपच विविधता असू शकते.

तात्पर्य, जीवनात हसतमुख रहा म्हणजे जीवनाच्या सोनेरी संध्याकाळी सुध्दा तुम्ही त्याच मजेने जीवन व्यतीत करू शकाल.

Swine Flu

National Award for Outstanding achievement by a Non-Professional - Tushar Sampat

Introducing Digital Practice for Doctors & Healthcare professionals

विशिष्ट आजार
सामान्य आजार

आरोग्य नेटवर्क

आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.

» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pune Aarogya
Digital Media Dedicated to Healthcare of Punekars

वेबसाईटशी लिंक करा

aarogya logo

ईमेल कोड

आमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या

 आरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.

स्वास्थ्य साधने

  • हेल्थ डिरेक्टरी
  • संदेश बोर्ड
  • हेल्थ कॅल्क्युलेटर

आरोग्य.कॉम विषयी

आरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.

अधिक वाचा...

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू

अधिक वाचा...

सदस्यांच्या प्रतिक्रया

“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.!”

  • आमच्या विषयी
  • प्रतिक्रिया
  • गोपनीयता नीति
  • साइट मॅप
  • संपर्क
  • मित्रांशी संपर्क साधा

कॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.