तृतीय पक्षीय प्रशासन हे भारतातील विमा उद्योगाचा पाठीचा कणाच आहे. या लेखाद्वारे आपणास त्यांच्या कार्याची कल्पना येईल.
TPAs ची भूमिका कोणती?
विमा कंपनीच्या इच्छेनुसार कार्यात सक्रिय रहाणे हीच TPAs ची प्रमुख भूमिका असते. पण तसे करु शकत नाही कारण तशी आवश्यक संरचना यात नाही.
TPAs विमानिती धारकांची संपूर्ण माहिती आपल्या अधिकाराअंतर्गत घेते आणि त्यांचे नितीसंबंधातील विषय हाताळते. यात विना रोखरकमी व्यवस्थापन, विमा धारकांसाठी २४ तास हेल्पलाईन, रुग्ण व्यवस्थित उपचार घेतील व विम्याचा लाभही त्यांना घेता येईल अशा चांगल्या रुग्णालयाची यादी, आरोग्याविषयी उपयुक्त माहिती, विशेषज्ञाविषयी माहिती पुरवते. यांच्या कामाची यादी वाढतच असते.
TPAs प्रणालीचे कार्य कशाप्रकारे चालते?
चांगल्या प्रकारे आयोजित केलेल्या TPAs सिद्ध करु शकते की ताणाच्या सर्वोच्च क्षणी ही प्रणाली वरदान ठरते. TPAs प्रणाली थेट रुग्णालयाशी उपचारांच्या आर्थिक मुलभूत गरजांची हाताळणी करत विमा धारकांच्या कामाचा घेर कमी करते. मुल खेळत असताना बाप आपल्या मुलांचा खर्च ज्याप्रमाणे सोसत असतो त्याच प्रमाणे या प्रणालीचे कार्य अविरत चालू असते.
ह्या प्रणालीचे कार्य कसे चालते
- विमा कंपनी कडून आपण विमानिती खरेदी केल्यानंतर सर्व विमा नोंदी मान्यताप्राप्त अशा TPAs मधे स्थानांतरित होते.
- TPAsचा विमानितीमधे कंपनीद्वारे उल्लेख केला जातो. आपण TPAs शी संपर्क साधावा निती क्रमांक व कर्मचा-याचे नाव ओळख म्हणून द्यावे.
- सर्वसाधारणतः विम्याचे कागदपत्र तिन दिवसात विमा कंपनीकडून TPAsकडे स्थानांतरीत केले जातात.
- TPAs कडून आपणास अनन्यसाधारण असे कार्ड वितरीत केले जाते. जे रुग्णालयात दाखल करतेवेळी कामी येते व रुग्णालय ओळख पत्र म्हणून याचा स्विकार करते.
- TPAs द्वारे पुरवल्या जाणा-या सुविधांचे पैसे विमा कंपन्यांकडून रुग्णालयांना थेट पुरवले जातात. TPAs ला धारकांकडून कोणतीही आकारणी घेण्याचा अधिकार नसतो.
- कोणत्याही मोक्याच्या क्षणी मदत घेतलेली असली तरीही आपण वार्षिक विमाशुल्क पुढे सातत्याने भरावा.
- जर आपणास विम्याची रक्कम वापरण्याची गरज भासल्यास TPAs च्या २४ तास टोल फ्री असणा-या क्रमांकावर संपर्क साधावा व रुग्णालयात दाखल करण्यासंबंधी माहिती द्यावी.
- TPAs आपणास रुग्णालयाची यादी पुरवते त्याच बरोबर त्या रुग्णालयाशी कोणत्याप्रकारे विमा कंपनीचे व्यवहार आहेत याची माहितीही पुरवते. आपण आपली निवड करावी व स्वतःला रुग्णालयात दाखल करुन घ्यावे. रुग्णालयातील अधिका-यांना आपले कार्ड म्हणजेच ओळखपत्र दाखवावे. जेणे करुन अधिका-यांना TPAs आपला खर्च पुरवणार असल्याची माहिती त्यांना मिळेल.
- TPAs आपल्या अधिकारांसहित असलेले एक पत्र रुग्णालयाला पुरवते. जेणेकरुन आपणास पुढील उपचार कोणतीही काळजी न करता घेता येतील. TPAs द्वारे सर्व व्यवहार हाताळले जातात.
- TPAs कडे असा एक डॉक्टरांचा समुह उपलब्ध असतो जो आपल्या उपचारावर व्यवस्थित लक्ष ठेऊन असतो. त्याचप्रमाणे सुरु असलेले उपचार विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे आहेत किंवा नाही यावरही देखरेख होत असते.
- रोखरकमेविना व्यवहार: आपले उपचार संपल्यानंतर आपण बिलाची चिंता न करता आपल्या घरी जाण्यासाठी आपला मार्ग मोकळा असतो. TPAs आणि रुग्णालय यांच्यात थेट व्यवहार होतो.
- त्यानंतर TPAs बिले व कागदपत्रे विमाकंपनीला पोच करते जेणे करुन रुग्णालयाची थकित रक्कम फेडली जाते.
मुल्यांची जोडणी आता फकत एका दुरध्वनी संपर्काइतक्या अंतरावर राहीली आहे! TPAs आपल्या मदतीसाठी आहोरात्र तयार असते. जर काही कारणास्तव TPAs ने आपला दावा रद्दबातल केल्यास आपण हे प्रकरण ओम्बुडमॅन पर्यंत घेऊन जाऊ शकतो. ही एक अशी प्रणाली आहे जी आपल्या विमा संबंधीत दाव्यासाठीच काम करते. तसेच ही आपल्या शासनातर्फेच राबवली जाते. आपणास संबंधीत लेखात ओम्बुडमॅन विषयी माहिती मिळते.