Print
Hits: 5343

आपणास आरोग्य विमा निती (हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी) खरेदी करण्या आधी आणि नंतर कोणत्या गोष्टीची कल्पना असणे आवश्यक असते?
आपल्या समोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. सर्व ठिकाणी चौकशी करुन सर्व विमानिती जाणून घेऊन विमा खरेदी करणे कधीही हिताचेच ठरते. फक्त वार्षिक विमा शुल्कावर लक्ष केंद्रित न करता भविष्यात मिळणा-या सोयी व होणा-या गैरसोयींचाही विचार केलाच पाहिजे.

देयकासाठी पर्याय
सर्वप्रथम विचारण्यासारखा प्रश्न म्हणजे विमा कंपनी परतफेड ही रोखरक्कमी करणार आहे की रोखरकमेविना व्यवस्थापन करणार आहे. तसेच ही परतफेड उपचारादरम्यानच होणार आहे की उपचारानंतर हेही विचारून घेणे महत्त्वाचे ठरते. जर उपचाराआधीच होणार असेल तर त्या विमानितीनुसार आपणास उपलब्ध होणा-या रुग्णालयाची नावे नीट तपासून घ्यावीत. जर परतफेड उपचारांनंतर होणार असेल तर आपणास एक विशिष्ट रक्कम अशा समस्यांसाठी व त्यावरील उपचारांसाठी आगोदरच तयार ठेवणे सोपे जाते. तसेच यात आपणास नंतर परतफेडीची हमी असल्याने उपचारांसाठी आवश्यक तो खर्च न विचलित होता करता येतो. विमानितीनुसार आपणास आपल्या राहत्या घरानजिकच्या उपलब्ध रुग्णालयाची तपासणी करुन ठेवणे हे हुशारीचे पाऊल ठरते जे आपणास मोक्याच्या क्षणी कामास येते. तसेच हे करत असताना विमाकंपनीचा रुग्णालयाशी संपर्क कोणत्या पातळीवर आहे हेही तपासून घ्यावे.

असे आजार जे आपल्या विमानितीस पात्र ठरत नाहीत
आपण विमा कंपनीच्या कार्मचा-यांना हे विचारणे फार गरजेचे असते की असे कोणते आजार आहेत की जे आपण घेतलेल्या विमानितीमधे पात्र ठरत नाहीत. उदाहरणार्थ आता नव्या विमानितीनुसार दाताच्या किंवा सौदर्य चिकित्सा आरोग्य विमानितीमधे पात्र धरले जात नाहीत.

कोणत्या गोष्टींचे मुल्य पात्र ठरत नाहीत
काही विमानितीनुसार निदान किंवा औषधोपचारासाठी होणारा खर्च हा विमा कंपनीद्वारे दिला जात नाही. कमीत कमी एका दिवसाचे रुग्णालयात दाखल असणे आवश्यक मानले जाते. या सर्व गोष्टींची व परतफेडीच्या उपलब्धतेची नीट तपासणी करुन घेणे महत्त्वाचे ठरते. यामुळे आपणास भविष्याच्या दृष्टिकोनाने अधिक बचत करणे सोपे जाते.

परत फेडीसाठी लागणारा कालावधी
काही विमानितीनुसार विम्याची निती लागू झाल्यापासून पहिल्या वर्षातच वैद्यकीय समस्या उद्भवल्यास परतफेड केली जात नाही. उदाहरणार्थ, काही विमा कंपन्यांनी मोतीबिंदुच्या चिकित्सेसाठी पहिल्या वर्षात कोणतीही तडजोड केलेली नाही. आपली विमानिती या संकल्पनेच्या प्रकारातली आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे.

नितीच्या इतर मर्यादा
काहीवेळा विमानितीमधे विविध खर्चांसाठी अतिरिक्त उपमर्यादा असतात. आपण एखाद्या विशिष्ट खर्चासाठी विमा कंपनी किती परतफेड करणार आहे याचीही तपासणी करुन घेणे आवश्यक असते. विमानितीनुसार उपचारासाठी योग्य रक्कम नोंद केलेली असते परंतु उपमर्यादेच्या नियमांनुसार परतफेड कंपन्यांकडून रोखली जाऊ शकते.

विशिष्ट अपघातासाठी उपयुक्तता
आजकालच्या राजकारणीय किंवा सामाजाजिक घडामोडीनुसार उद्भवणा-या दंग्यांसाठी किंवा आतंकवादी हल्ल्यांसामधे आपणास विमानितीचा लाभ होणार आहे किंवा नाही याचीही तपासणी करुन घ्यावी.

निष्क्रिय कालावधी
विमा निती विकत घेतल्यापसून पहिल्या ३० दिवसांच्या कालावधीला निष्क्रिय कालावधी म्हणतात. या कालावधीसाठी असलेल्या नियमानुसार परतफेडीचा कोणताही नियम यास लागू होत नाही. विम्याचे संरक्षण आपणास ३१ व्या दिवसापासून लागू असते. तरी अपघातामुळे रुग्णालयात दाखल करावे लागल्यास त्यासाठी आपणास या विमानितीचे संरक्षण विमानिती लागू झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच मिळत असते. आपल्यास विमा उपलब्ध करून देणा-या व्यक्तीस या निष्क्रिय कालावधी संदर्भात अधिकाधिक माहिती विचारून घ्यावी.

नव्या विमानिती धारकांनी घ्यावयाच्या दक्षता
जर आपण नुकतीच नवी आरोग्य विमानिती खरेदी केलेली असेल तर आपली पहिली पायरी पूर्ण झालेली असते. आता आपण स्वतःचे रक्षण योग्यप्रकारे करण्यासाठी विमानितीची मुख्य प्रत व्यवस्थित वाचून घेतली पाहिजे त्यातील विशिष्ठ नमूद केलेल्या बाबी नीट समजून घेतल्या पाहिजेत. खाली उल्लेख केलेल्या गोष्टी निरखून पहाव्यात.

उघड नसलेल्या आरोग्यस्थिती
ब-याच वेळा विमा कर्मचारी विमानिती लागू करण्या अगोदर आपली सध्याची प्रकृती कशी आहे हे तपासून बघत असतात किंवा त्याबाबत प्रश्न विचारत असतात. जर आपण कोणत्याही आजारामुळे किंवा दुखापतीमुळे त्रस्त असू व आपण ह्या गोष्टी विमा कर्मचा-यांना सांगितल्या नाहीत तर आपल्याला मिळणारे संरक्षण रोखले जाऊ शकते किंवा आपणास कोणत्याही खर्चाची परतफेड थांबवली जाऊ शकते.

परतफेडीसाठी अधिकतम मर्यादा
विमा कंपन्यांनी परतफेडीच्या रक्कमांची विशिष्ट मर्यादा निश्चित केलेली असते. यामुळे जर आपला वैद्यकीय खर्च खूप येणार असेल तर अतिरिक्त खर्च आपणास आपल्या खिश्यातूनच भरावा लागतो. म्हणुनच खरेदी करण्या आगोदर किंवा केल्यानंतर आपल्या आरोग्यासाठी यागोष्टीबद्दल जाणुन घेणे महत्वाचे ठरते.

वयोमर्यादा
वैद्यकीय विमा हा सहसा विविष्ट वयोमर्यादेनंतरच उपलब्ध असतो (ब-याच विमा कंपन्याकरीता ही मर्याद ६५ वर्षापर्यत आहे) . जर आपले वय या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आपणास नवी विमानिती लागू होत नाही. त्याचप्रमाणे या वयोमर्यादेनंतर जुनी नितीचे नुतनिकरणही होत नाही. खरतर याच वयात आर्थिक पाठिंब्याची अधिक आवशक्ता असते. शासनाने विमा कंपन्यांना अशा नव्याप्रकारच्या विमानितीसाठी प्रोत्साहीत केले आहे. परंतु अद्यापही त्यावर अंमलबजावणी होणे बाकी आहे.

खालील काही गोष्टी आपणास स्वतःचे आजाराच्या क्षणी किंवा अशा मोक्याच्या क्षणी चांगल्याप्रकारे रक्षण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतात. जर आपला धनसंबंधी केलेला दावा अपरिहार्य कारणाने रद्दबातल करण्यात आला असेल तर आपण तक्रार निवारण विभाग या विमा नियमक व विकास अधिकार (IRDA) यांच्या शाखेत तक्रार नोंदवू शकतो. विमानिती धारकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीच या विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे.