तरुण पौढ जे नुकतेच यौवनावस्थेतून गेले आहेत, अशांना शरीरातील अंग व त्यांची पुनरोत्पादन क्षमतेविषयी ज्ञान असणे गरजेचे असते. या वयात लैगिक शिक्षण हे फक्त पर्यायी शिक्षणाचा भाग नसून त्याचे ज्ञान असणे किशोरांसाठी आवश्यक असते. त्यांना यावयात नातेसंबंधांविषयी व सुरक्षित संभोगाविषयी माहिती असणेही आवश्यक असते. जेणे करुन प्रसंग ओढावल्यास आपले वर्तन कसे असावे याची जाणिव त्यांना होईल.
कोणताही प्रयोग न करता थांबणे हा त्यावर योग्य पर्याय आहे.
प्रौढ लोक हाच सल्ला देतात की गर्भनिरोधकाचा वापर न करता योग्य वेळेची वाट पाहणे हाच पर्याय योग्य आहे. पालकांनी मुलांना घरीच शिकवलेले नातेसंबंधाचे महत्व, शाळेत शिकवलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापरापेक्षा अधिक प्रभावी ठरते. किशोरावस्थेतील गर्भावस्था किशोरवयीन मुलांना सकारात्मक प्रोत्साहन देण्याने, स्वयंशिस्त व संयम ठेवायला शिकवून टाळता येते. पण एवढ्यावरुन सुरक्षित संभोगाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण शेवटी निर्णय हा किशोरांनाच घ्यायचा असणार आहे. यात पालक काय करावे किंवा काय नाही यासंदर्भात कोणताच निर्णय घेऊ शकत नाहीत. अशा प्रसंगात त्यांच्या मुलांना नियंत्रणात ठेवणे हे त्यांना शक्य होऊच शकत नाही. तसेच प्रत्येक किशोर वयीन व्यक्ती आपण घेतलेला निर्णय योग्यच असल्याचा विचार करत असते व त्यांचे भविष्य याच गोष्टींवर अवलंबून असते.
अनावश्यक गर्भावस्था व STD
जर किशोरांनी शिक्षकांचे, डॉक्टरांचे, उपदेशकांचे बोलणे न ऎकता किंवा सुरक्षित संभोग न करता बेजबाबदार वर्तन केले तर त्यांना लैंगिक संसर्गजन्य विकार जडू शकतात. लैंगिक संबंध प्रस्थापित करणे टाळणे जमत नसेल तरी योग्य वेळ येईपर्यंत सुरक्षित संभोगाचा अवलंब करणे योग्य व शहाणपणाचे ठरते. जर तसे केले नाही तर असे संसर्गजन्यविकार किंवा गर्भावस्था उद्भवू शकते. याचे अधिक कालावधीसाठी आनंददायक परिणाम होतच नाहीत. कमी वयातील मुलांना मुल होण्याचे प्रमाण चिंताजनक पातळीवर आले आहे.
संगतीचा प्रभाव
निरिक्षणावरुन लक्षात येते की संगतीच्या दबावामुळे बरेच किशोर संभोगाचा अनुभव घेतात. हे मुलांच्या बाबतीत अगदी खरे आहे. ते स्वतः शाररिकरीत्या परिपक्व नसताना संभोगासाठी खेचले जातात. ब-याच मुलांना त्यांच्या पुरुष मित्रांकडून दबाव येत असतो. जर अशा मित्रांनी पूर्वी लैंगिक संबंध प्रस्थापित केले असतील तर ते एक पुरुष असल्याचे सिद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून केलेले कृत्य असते. मुलींनाही अशा प्रकारचा दबाव असतोच पण मुलांच्या प्रमाणाइतका नसतो. नुकत्याच केलेल्या निरिक्षणावरून मुलांचे प्रमाण भरपूर असल्याचे दिसून आले आहे. फार कमी प्रमाण असलेल्या मुलांना असे वाटते की पूर्णतः परिपक्व झाल्यानंतरच संभोग करणे योग्य आहे व त्यावेळेपर्यंत थांबणे हाच योग्य पर्याय आहे.
लैंगिक शिक्षण आणि गर्भपात
जर लैंगिक शिक्षणाने उच्चांकी ध्येय गाठले नाही तर लैंगिक ज्ञानाअभावी तरुण सुरक्षित संभोग करणार नाहीत व अनावश्यक गर्भावस्थेचे प्रमाण सहाजिकच वाढेल. अशावेळेस त्यांना दोनच पर्याय समोर असतात की बाळाला जन्म देणे किंवा गर्भपात करणे. गर्भपात करणे ही एक चिकित्सा आहे ज्यात चिकित्सेद्वारे गर्भाचा नाश/शेवट केला जातो. ही प्रक्रिया वेगवेगळ्या मार्गाने केले जाऊ शकते पण त्यामागे उद्देश एकच असतो की गर्भशयातून गर्भ काढून टाकणे. भारतात गर्भपाताला कायदेशीर मान्यता आहे. पण इस्पितळात कुटुंबिय सल्ल्याचा आधार घेतला जातो. गर्भपाताच्या चिकित्सेसाठी कुटुंबातील कमीत कमी एका व्यक्तीला गर्भपाताची कल्पना देणे आवश्यक असते.
गर्भपात करणे ही काही साधीसुधी गोष्ट नसते. तसेच ह्या मार्गाद्वारे अनावश्यक गर्भधारणेपासून सुटका मिळणे सोपे नसते. कमी वयात अनावश्यक गर्भधारणा धारण झाल्याने आधीच त्या किशोर वयीन व्यक्तीच्या जीवनाला वळण प्राप्त झालेले असते. तिने कोणताही मार्ग पत्करला असला तरी तिला नकारात्मक गोष्टींना तोंड द्यावेच लागते.
गर्भपातामुळे किशोरांना मानसिक समस्या उद्भवतात. त्यांच्या स्वभावत, वर्तनात बदल होतो. त्यांचे आयुष्य नैराश्याकडे झोकले जाऊ शकते. हे नैराश्य वाढत गेल्यामुळे बरेच किशोर वयीन आत्महत्येचा मार्ग पत्करतात. अन्यथा त्यांच्यात अपराधीपणा किंवा राग या भावना तिव्र स्वरुपाच्या झाल्याचे दिसून येते. काहींना आपल्या बाळाचा मृत्यू आपल्यामुळेच ओढावल्याचा अपराधीपणा जाणवत राहतो, काहींना आपणास लैंगिक शिक्षणाचे ज्ञान मिळूनही आपण सुरक्षितता का पाळू शकलो नाही याचा स्वतःवरच भयंकर राग येतो, तर काही किशोर तिव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया देत राहतात. काही किशोर वयीन मुलींना आपली स्वतःची प्रतिमा स्वतःच ढासळवल्याबद्दल मन सतत विचलित राहते कारण तो प्रसंग वारंवार त्यांच्या डोळ्यासमोर येत राहतो. अशाप्रकारे मानसिक ताण वाढत जाऊन रात्री भितीदायक स्वप्न पडणे किंवा वारंवार भास होणे या सारख्या समस्या उद्भवू शकतात.
अनावश्यक गर्भधारणेमुळे गर्भपात व त्याचे वाढते प्रमाण पाहता किशोरांना लैंगिक शिक्षण देणे महत्वाचे ठरते. त्यांना यासर्व गोष्टींचे ज्ञान असणे व जर आपण चुकीचा मार्ग निवडल्यास त्याचे परिणाम काय असू शकतात या संबंधी माहिती असणे आवश्यकच आहे. सर्वसाधारण नातेसंबंधांचे महत्व त्यांना समजले पाहिजे. एकंदरीत शिक्षणाचा हा भाग अत्यंत महत्वाचा ठरतो. इतर सर्व गोष्टींबरोबरच आपल्या जबाबदा-याही महत्वाच्या असतात आणि याच जबाबदा-यांचे ज्ञान लैंगिक शिक्षणामुळे प्राप्त होऊ शकते. तसेच लैंगिक शिक्षणात यासर्व बाबींचा उल्लेख असणे आवश्यक असते.
लैंगिक शिक्षण: किशोरांना आवश्यक मुद्दे
- Details
- Hits: 13612
10
लैंगिक शिक्षण
तुम्हाला माहीत आहे का?
