Print
Hits: 12507

आपण आपल्या मुलांना संभोगाविषयी ज्ञान देणे आवश्यक का आहे?
ब-याच लोकांना आपल्या मुलांना कमी वयातच संभोग व लैंगिकता याविषयी लैंगिक शिक्षण देणे आवश्यक आहे असे वाटते. पण लहान मुलांना देण्यासारखे त्यात काय आहे? एक पालक म्हणून तुम्हाला यातून काय घेण्यासारखे आहे? लैंगिक शिक्षणातुन आपल्या मुलांना चांगले असे काय मिळू शकते?

आपल्य पाल्ल्याने स्वतःच्या जीवनात जागृक रहावे यासाठी लैंगिक शिक्षण अत्यंत महत्वाचे ठरते. यौवनावस्थेत पदार्पण करण्याआगोदर लहान मुलांच्या लैंगिकतेचा व त्याच्या शिक्षणाचा त्यांचा जीवनात स्विकार होणे आवश्यक आहे. यामुळे ते आपल्या प्रौंढ जीवनासाठी तयार होतील, जेणेकरुन त्यांना आपल्या आयुष्याचे व नातेसंबधांचे महत्व कळायला व एक चांगली व्यक्ती म्हणून जगण्यास मदत होईल.

लैंगिक शिक्षणाद्वारे मुलांच्या मनावर फक्त सखोल सकारात्मक गोष्टी बिंबवल्या जात नाहीत तर त्यांचा आत्मविश्वास व स्वाभिमानास बळकटी आणण्यासही मदत होते. बराच वेळा हाच स्वाभिमान व आत्मविश्वास यौवनावस्थेत गमावला जाण्याची शक्यता असते. या शिक्षणाच्या अभावामुळे वाढत्या वयात शरीरात होणारे बदल समजत नाहीत अशा परिस्थितीत एकतर ते घाबरून जाऊ शकतात किंवा त्या रहस्यमयी परिस्थितीत अधिकाधिक चिंतीत होत जातात. अशा कठीण परिस्थितीत योग्य मार्गदर्शन मिळले नाही तर ते इतरांसमोर भयभित आणि लज्जास्पद आयुष्य जगायला लागतात.

काही शाळांनीही आता त्यांच्या अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश केलेला आहे. काही वर्षांतच हा विषय अत्यंत महत्वाचा बनला आहे. आज जवळ जवळ सर्वच शाळा यात कर्तव्याचा भाग म्हणून सहभाग घेत आहेत. त्यामुळेच आज मुलांना याविषयावर योग्य माहिती आणि स्वतःची एक चांगली ओळख कशी असावी याविषयी ज्ञान मिळते आहे.

परंतु लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त नातेसंबंध व संभोगाविषयीचे ज्ञान नाही. यामधे शाररिक बदल, शाररिक प्रतिमा, लैंगिक भूमिका व त्यांच्या भावना यांचाही समावेश असतो. यात तरुण वयातील मुलांना ते कसे जन्माला आले, त्यांची वाढ कशी होणे अपेक्षित आहे व ते आपला वंश कश्याप्रकारे वाढवू शकतात यासंबंधीचेही विषय असतात.

लहान वयातच मुलांना लैंगिक शिक्षणाची आवश्यक्ता का आहे? हाही एक महत्वाचा मुद्दा यात असतो. मुलांच्या शाररिक वाढी बरोबरच त्यांच्यात अशा विषयांची जागृकता येणे आवश्यक असते. जेणे करुन ते या समाजात योग्य व्यक्ती म्हणून नावारुपाला येतील. लैंगिक शिक्षणाद्वारे मुलांना आपण कशाप्रकारे चुकीच्या निर्णयांना बळी पडू शकतो याविषयीही ज्ञान मिळत जाते. लैंगिक शिक्षणाद्वारे किशोरावस्थेत गर्भवस्था धारण होण्याचे प्रमाणही नियंत्रणात आणले जाऊ शकते.

लैंगिक शिक्षणाची सुरवात घरातूनच होणे हेही तितकेच आवश्यक असते. पालक आपल्या मुलांना विश्वासात घेऊन या सर्व गोष्टींचे महत्व हळुहळू समजावू शकतात. मुलांना आपल्या स्वतःविषयी, आपल्या शरीराविषयी फार कुतूहल वाटत असते. अशावेळेस पालकांनी मोकळ्या मनानी आपल्या मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधून या गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत.

आपल्या मुलांना यासर्व विषयाची माहिती व शिक्षण देण्याची योग्य वेळ कोणती?
आपल्या लहान मुलांशी लैंगिकते विषयी बोलताना आपणास ब-याच अडचणी येऊ शकतात. आपल्याला आपल्या मुलांसमोर हे विषय निट मांडता आले पाहिजेत यासाठी हे विषय त्यांना सोपे करुन सांगा. त्यांच्या प्रश्नांनाही उत्तर देताना न अडखळता सोप्या भाषेत उत्तर द्या जेणेकरुन उत्तराबाबत पुन्हा नवे उद्भवणार नाहीत. त्यांना समजेल अशा भाषेत या गोष्टी त्यांच्यासमोर मांडणे महत्वाचे ठरते.

आजच्या पिढीतील मुलांना सगळ्या गोष्टी समजतात व ते जे ऎकतात, बघतात त्यावर मोठ्याप्रमाणात प्रभावित होतात. प्रसिद्धीमाध्यमांचा यासाठी मुलांच्या जीवनात महत्वाचा वाटा असतो. यामुळे कदाचित काही गैरसमजूती होण्याची शक्यता दाट असते. अशा समजूतींना सुधारण्याचे काम पालकांनीच करायचे असते. मुलांशी संभोगाविषयी थेट संवाद साधणे ही जरी सोपी गोष्ट नसली. तरी तो विषय मांडण्याचे कौशल्य पालकांनी आत्मसात केले पाहिजे. आपल्या पाल्ल्याचे भविष्य चांगल्या लैंगिक शिक्षणावर अवलंबून असते हे काम पालकच चांगल्या प्रकारे करु शकतात.

जसजसे ते तारुण्यात पाऊल ठेवायला सुरवात करतील तसतसे त्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे द्यायला सुरवात करावी. हा त्यांचा आयुष्यातील महत्वाच्या पडावातील सुरवातीचा कालावधी असतो व तो सगळ्यात चिंताजनकही असतो. अशा वयात ते पालकांना चकीत करणारे व गोंधळात टाकणारे प्रश्न विचारू शकतात. त्यांना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे बाळाचा जन्म कसा व का होतो? जर आपण हीच संधी साधून या प्रश्नाचे उत्त्र दिले नाही तर आपल्या मुलाच्या मनात वेगवेगळ्या संकल्पना जन्म घेऊ लागतात. अशा वेळेस ते जे बाहेरील व्यक्तींकडून ऎकतात त्यावर विश्वास ठेऊन गैरसमजूत करुन घेतात. पुढे ते अशा समजूतींना अनुसरुन चुकीची पाऊले उचलू शकतात.

आपल्या मुलांना यौवनावस्थेत जाण्याआगोदर त्यांना लैंगिक शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यांना होणा-या शाररिक बदलासाठी त्यांची मानसिक व शाररिक तयारी करुन देणे ही आपली पालक असण्याच्या नात्याने जबाबदारीच आहे. काही मुलींना यौवनावस्थेला लवकर म्हणजेच वयाच्या १० व्या वर्षी सुरवात होते. तर मुलांना यावयात स्वप्नदोषासारख्या समस्येनी सुरवात होते. जर आपण आपल्या मुलांना याची पूर्वकल्पना दिलेली असेल तर ते भयभीत होणार नाहीत.

आपल्या मुलांना आपण प्रामाणिक उत्तर देणेही तितकेच गरजेचे आहे. चुकीचे किंवा विडंबना करुन दिलेले उत्तर त्यांना अधिक गोंधळात टाकते. मार्गदर्शनासाठी एखाद्या चांगल्या पुस्तकाचा आधार घ्यावा. आपण त्यांना जितक्या स्पष्टपणे उत्तर देऊ तितके त्यांना समजण्यास सोपे जाते. सोपा मार्ग म्हणून आपण त्यांना विचारावे की त्यांनी संबंधीविषयी काय ऎकले आहे जर ते योग्य असेल तर त्यास दुजोरा द्यावा अन्यथा ते चुकीचे वक्तव्य असल्याचे सांगून चुक सुधारावी. यात मोकळ्या विचारांनी संवाद होणे फार गरजेचे असते.