Print
Hits: 10271
How to Protect Yourself from Drug?

आठ वर्षांखालील मुलांना त्यांच्या लैंगिकतेबद्दल थोडेतरी ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यांना सांगितलेली प्रत्येक गोष्ट बरोबरच असावी असे त्यांचे बंधन नसते पण आपण समाधानकारक उत्तर द्यावे असे त्यांना अपेक्षित असते. मुलांचे हे वय अतिशय जिज्ञासू असते, त्यांना विविध गोष्टींविषयी कुतुहल असते व त्यागोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते. पण प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांशी योग्य संवाद साधता येईलच असे नाही. बरेच पालक अशावेळेस गोंधळून जातात यामुळे त्यांना मुलांना योग्य माहिती पुरवता येत नाही. टाळाटाळ केल्याने यागोष्टींकडे दुर्लक्ष होत जाते.

यौवनावस्थेतील बदल
यौवनावस्थेत काही नाट्यमय व भावनिक बदल होत असतात व अशावेळेस माहिती किंवा कोणतीही तयारी नसल्यामुळे मुल भयभित होण्याची शक्यता असते. यौवनावस्थेसाठी काही सूचना:

  1. यौवनावस्थेचा बदल मुलामुलींमधे फारच वेगवेगळे असतात. शरीरातील काही भाग मुलांसाठी अनन्यसाधारण महत्वाचे असतात तर मुलींमधेही काहीसे वेगळे भाग असतात. त्यांना प्रजनन अंग असे म्हणतात आणि ते अद्यापही परिपक्व झालेले नाहीत. यावयात त्यांची वाढ होणार असते. बरेच बदल अपेक्षित असतात. हे बदल साधारण असतात व यात घाबरुन जाण्यासारखे काहीच कारण नसते.
  2. प्रौढावस्थेची सुरवात म्हणजे यौवनावस्था होय. यौवनावस्थेत प्रवेश करताच शाररिक परिवर्तन स्पष्ट होत जाते. यौवनावस्थेसाठी कोणतेही विशिष्ठ वय ठरवता येत नाही. काही मुल वयाच्या ९व्या वर्षीच यौवनावस्थेत पदार्पण करतात. पण सहसा हे वयाच्या १० ते १२ व्या वर्षात होत असते. या वयात शरीराची वाढ फारच वेगाने होत असते.
  3. मुलांमधे एका वर्षात उंची ४ इंचांनी वाढते. ही वाढ झाल्यावर त्यांचे खांदे रुंद होत जातात व शरीर स्नायुयुक्त होण्यास सुरवात होते. त्यांचा आवाज अधिक खोलवरचा होत जातो. त्यांच्या जननेंद्रियात वाढ होते व काही ठिकाणी केस येण्यास सुरवात होते. मुलांना जननेंद्रियात होणा-या अनावश्यक वाढीबद्दल व ओली स्वप्ने येण्यासंदर्भात जाणण्याची इच्छा असते. कारण त्याविषयी त्यांना काहीच कल्पना नसते.
  4. मुलींचीही यौवनावस्थेतच वाढ होते. मुलींच्या वजनात किंचित वाढ होते व स्तन हळुहळू वाढायला सुरवात होते. मुलींना वयाच्या ८ व्या वर्षापासूनच मासिकपाळी येण्यास सुरवात होते. अशा वेळेस नेमके काय अपेक्षित आहे हे त्यांना सूचवा. तसेच सेनेटरी पॅड चा वापर कसा करावा याचीही महिती त्यांना द्यावी.
  5. ह्या बदलांमुळे भावनिक उद्रेक, गोंधळलेली अवस्था आणि विचलितता येऊ शकते. हे बदल सर्वसाधारणच असतात पण जर यामुळे अधिकच भावनिक त्रास जाणवत असेल तर ज्ञात व्यवसायिकांना दाखवा. वयोमानाप्रमाणेच लैंगिक शिक्षण, संबंधीत विषयाची पुस्तके, स्पष्टीकरणासहित मदत पुरवणे गरजेचे आहे.

मुलींना मुलांमधील बदल व मुलांना मुलींमधे होणा-या बदलांविषयी माहिती द्यावी.

आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण देणे हे एका खेपेत पूर्ण होणारी गोष्ट नाही किंवा चिमणी कावळ्याची गोष्ट सांगण्याने पुरेशी माहिती त्यांना मिळणार नाही. यासाठी संवादाच्या मालिकाही लागू शकतात. त्यांच्या वयानुसार उदाहरणे व कल्पकता वापरावी.

जेव्हा मुल शाळेत जायला लागतात तेव्हापासूनच त्यांना संभोगा संबंधी किंवा लैंगिक बाबींसंबंधी अथवा शरीरातील अंगांसंबंधी काही गोष्टी कानावर यायला सुरवात होते. असे शब्द मुल वारंवार उच्चारत असतात. जर आपण आपल्या मुलांच्या तोंडून संबंधीत शब्द ऎकले असतील तर मुलांना त्या शब्दाबद्दल काय माहित आहे हे विचारावे. या संधीचा फायदा घेत आपण आपल्या मुलांना संभोगा संबंधी किंवा लैंगिकते संबंधी ज्ञान पुरवू शकतो. त्यांना शरीराच्या अंगासंबंधी प्रजननासंबंधी किंवा बाळाचा जन्म कसा होतो या संबंधी ज्ञान पुरवू शकतो.

जर आपले मुल वारंवार असे शब्द उच्चारत असेल तर त्याला आपल्या कुटुंबाच्या नियमांसंबंधी माहिती द्यावी. असे शब्द वापरणे हे आपल्या व्यक्तीमत्वाला शोभत नाही अशा शब्दात समजवावे.

सार्वजनिक व खाजगी जागेतील फरक समजवण्याने हे काम सोपे होऊ शकते. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे स्नानगॄहाचा वापर आपण ज्याप्रमाणे खाजगी तत्वावर करतो त्याचप्रमाणे शाररिक अंगांविषयी किंवा बाळाच्या जन्माविषयी फक्त आपल्या पालकांशी खाजगीतच चर्चा करावी. असे त्यांना सांगितल्याने बरेचसे लक्ष्य साध्य होते.

लक्षात ठेवा