Print
Hits: 7586

जर लैंगिक शिक्षण किशोरवयीन मुलांपर्यंत पोहोचवणे हे उदिष्ट जर साध्य झाले नाही तर नको असणा-या गर्भधारणेचे प्रमाण वाढत जाईल. किशोवयीन मुलांना आपले जिवन हे आपल्या पद्धतीने जगायचे असते त्यामुळे ते गर्भपाताचा पर्याय निवडू शकतात. याचेच परिणामांचे जिवंत उदाहरण म्हणजे गर्भपाताचे प्रमाण किशोरांमध्ये वाढत चालले आहे.

गर्भपात म्हणजे वैद्यकीय प्रक्रियेने गर्भाचा नाश करणे होय. ही प्रक्रिया वेगवेगळयाप्रकारे केली जाऊ शकते. या प्रक्रिये मागचा मुळ व एकमेव उद्देश मात्र गर्भाशयातुन गर्भ काढणे हाच असतो. भारतामध्ये गर्भपात हा कायदेशीर आहे. पण गर्भपात करताना कुटुंबातील कमीत कमी एका व्यक्तीला त्यासंदर्भात कळवणे आवश्यक असते.

गर्भपात ही वाटते तितकी सोपी प्रक्रिया नाही आणि ही नको असलेली गर्भधारणा रोखण्याचा एखादा मार्ग म्हणून उपयोगात आणली जात नाही आणि तसेही किशोरवयात(कमी वयात) गर्भावस्था धारण केल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

गर्भपातामुळे किशोरांना मानसिक समस्या उद्भवतात. त्यांच्या स्वभावात, वर्तनात बदल होतो. त्यांचे आयुष्य नैराश्याकडे झोकले जाऊ शकते. हे नैराश्य वाढत गेल्यामुळे बरेच किशोर वयीन आत्महत्येचा मार्ग पत्करतात. अन्यथा त्यांच्यात अपराधीपणा किंवा राग या भावना तिव्र स्वरुपाच्या झाल्याचे दिसून येते. काहींना आपल्या बाळाचा मृत्यू आपल्यामुळेच ओढावल्याचा अपराधीपणा जाणवत राहतो, काहींना आपणास लैंगिक शिक्षणाचे ज्ञान मिळूनही आपण सुरक्षितता का पाळू शकलो नाही याचा स्वतःवरच भयंकर राग येतो, तर काही किशोर तिव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया देत राहतात. काही किशोर वयीन मुलींना आपली स्वतःची प्रतिमा स्वतःच ढासळवल्याबद्दल मन सतत विचलित राहते कारण तो प्रसंग वारंवार त्यांच्या डोळ्यासमोर येत राहतो. अशाप्रकारे मानसिक ताण वाढत जाऊन रात्री भितीदायक स्वप्न पडणे किंवा वारंवार भास होणे या सारख्या समस्या उद्भवू शकतात.

अनावश्यक गर्भधारणेमुळे गर्भपात व त्याचे वाढते प्रमाण पाहता किशोरांना लैंगिक शिक्षण देणे महत्वाचे ठरते. त्यांना यासर्व गोष्टींचे ज्ञान असणे व जर आपण चुकीचा मार्ग निवडल्यास त्याचे परिणाम काय असू शकतात या संबंधी माहिती असणे आवश्यकच आहे. सर्वसाधारण नातेसंबंधांचे महत्व त्यांना समजले पाहिजे. एकंदरीत शिक्षणाचा हा भाग अत्यंत महत्वाचा ठरतो. इतर सर्व गोष्टींबरोबरच आपल्या जबाबदा-याही महत्वाच्या असतात आणि याच जबाबदा-यांचे ज्ञान लैंगिक शिक्षणामुळे प्राप्त होऊ शकते. तसेच लैंगिक शिक्षणात यासर्व बाबींचा उल्लेख असणे आवश्यक असते.