Print
Hits: 5440

आपल्या मुलांना लैंगिकतेविषयी कमी वयात किंवा लवकर शिकवताना ब-याच अडचणी येतात. त्याविषयावर चर्चा करताना मनमोकळेपणाने संवाद साधता येत नाही. नेहमी आपल्या मुलांच्या प्रश्नांना उत्तर हे साध्या सोप्या शब्दातच द्यावे. या गोष्टी अतिशयोक्ती करुन किंवा अधिक रंजित करुन सांगण्याची काही आवश्यक्ता नसते. त्यांना खरे तेच सांगावे. त्यांना उत्तरे देताना विषयावरच संबंधीत उदाहरणे देऊन समजवावे जेणेकरुन त्यांना योग्य ती माहिती आरामात मिळू शकेल.

आजची मुल खूप जागृक असतात व ते जे ऎकतात व बघतात त्यामुळे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. लहान मुलांच्या जीवनात यासाठी प्रसिद्धीमाध्यमे महत्वाची भूमिका बजावतात. यांच्या चुकीच्या प्रदर्शनामुळे मुलांवर नकारात्मक परिणामहोऊ शकतात काही अश्या चुकीच्या गोष्टी असतात ज्यामुळे त्यांच्या मनात चुकीच्या समजूती घर करु लागतात. या समजूती सुधारण्याची आवश्यकता असते. दुस-या बाजूने विचार केला तर आपल्या मुलांशी या विषयी चर्चा करताना खूप समस्या येतात. ह्या संबंधी बोलणे त्यांना सोपे जात नाही. पण हे तडजोड करण्यासारखे कारण नाही. लक्षात ठेवा आपल्या मुलांचे चांगले भवितव्य त्यांच्या पालकांनी दिलेल्या लैंगिक शिक्षणावरही अवलंबून असते.

जेव्हा आपले मुल तारुण्यात पाऊल ठेवायला लागेल तेव्हाच लैंगिक शिक्षणाचे धडे देण्यास सुरवात करावी. कारण त्यांचे हेच वय अधिक घातक ठरु शकते. त्यांच्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. अशा वेळेस त्यांना माहिती नसल्याने वेगवेगळे प्रश्न विचारु शकतात. व त्यांना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे मी कसा जन्माला आलो किंवा मुलांचा जन्म कसा होतो. जर यासंधीचा फायदा घेत आपण प्रश्नांची निट उत्तर दिली नाहीत तर पुढे ते जे बाहेरील जगाकडून ऎकतील व त्यावर विश्वास ठेवायला लागतील.

आपल्या मुलांना यौवनावस्थे आगोदरच लैंगिक शिक्षण देणे फार गरजेचे असते. पुढे शरीरात होणा-या बदलांसाठी त्यांची तयारी करणे ही पालक या नात्याने आपली जबाबदारीच आहे. काही मुलींना फारच कमी वयात म्हणजेच वयाच्या १० व्या वर्षीच सुरवात होते. तर मुलांना त्याहून ही कमी वयात ओली स्वप्ने पडण्यास सुरवात होत असते. जर अशावेळेस मुलांना त्यांच्यात नेमके कोणते बदल होत आहेत याची कल्पना नसेल तर ते घाबरुन जाऊ शकतात व विनाकारण त्याच गोष्टींमुळे विचलित होऊ शकतात. त्यांना या बदलाविषयी माहिती पुरवणे अत्यंत महत्वाचे ठरते.

आपल्या मुलांना प्रामाणिक उत्तर देणेही महत्वाचे असते. खोटे सांगणे किंवा चुकीच्या संकल्पना मांडणे घातक ठरु शकते. स्वतःला यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी चांगल्या पुस्तकांचा आधार घ्यावा. याप्रकारचे मार्गदर्शन घेतल्याने अशा संकल्पना मांडण्यास मदत होते. चित्रांच्यामदतीने किंवा सांकेतिक गोष्टींनी यासर्व गोष्टी वयाच्या ३ ते ४ वर्षातच साध्य होतात.

त्यापेक्षा अधिक वयाच्या म्हणजे ५ ते ८ वर्षाच्या मुलांना समजवताना परिस्थिती अधिक बिकट झालेली असते. त्यांना या वयात तरुण मुलांकडून अधिक महिती मिळत असते. अशा वेळेस योग्य मार्ग म्हणजे आपण मुलांनाच त्यांना संबंधीत विषयी काय माहित आहे हे विचारणे. यामुळे आपणास त्यांना नेमक्या कोणत्या गोष्टी माहित आहे याचीही माहिती मिळते. जर माहिती चुकीची असेल तर ती जागीच सुधरवावी. लैंगिक शिक्षण देताना मुक्त संवाद होणेही तितकेच गरजेचे आहे.