Print
Hits: 5569

लैंगिक शिक्षणाशी ओळख करुन देण्यासाठी एक चांगली योजना म्हणजे मुलांना त्यांच्या शरीरात होणारे बदल व्यवस्थित समजावून सांगणे व त्याच बरोबर हेही सांगावे की आता त्यांच्या शरीरात नेमके कोणते बदल होणार आहेत. तसेच त्यांना हेही समजावून सांगावे की लवकरच त्यांच्या जीवनाशी निगडीत असे भावनिक बदलही होणार आहेत. तसेच त्यांच्या जीवनातील लैंगिकतेचे महत्वही त्यांना सांगणे महत्वाचे असते. एका मुलानंतर दुस-या मुलालाही शिकवण्यासाठी हीच पद्धत वापरावी.

असे मानले जाते की कोणत्याही मुलाचे पहिले शिक्षक हे त्याचे पालक असतात आणि हे खरेच आहे. मुलांच्या मात्यापित्यांइतके चांगले कोणताही शिक्षक शिकवू शकणार नाही. लैंगिक शिक्षणाला सुरवात वयाच्या सुरवातीच्या म्हणजेच मुले शाळेत जायला लागण्याआगोदरच करावी. त्यांच्या प्रश्नांना सकारात्मक उत्तर द्यावे. त्यांना "मी अस्तित्वात कसा आलो?" हा प्रश्न सतत पडलेला असतो. या विषयातील प्रश्न व उत्तरे दोन्ही बाजूंनी नियमित राहिले पाहिजेत. लहान मुले म्हणजे वयाच्या ३ ते ४ वर्षात मुलांनी अद्याप संभोग किंवा कामोत्तेजनेविषयी काहीच शिकलेले नसते. पण त्याहून अधिक वयाच्या मुलांना या गोष्टी माहित असणे गरजेचे असते. ह्या विषयी माहिती देताना सावध पवित्रा व प्रामाणिकता असावी लागते.

मुलांना शिकवताना पालकांनी मुलांना प्रश्न विचारण्याची संधी दिली पाहिजे. शिक्षण म्हणजे दुहेरी बाजूंनी आपल्या विचारांची देवाणघेवाणीची एक प्रक्रियाच असते. एकेरी मार्गाने योग्य हेतु साध्य होत नाही. पालकांनी म्हणजेच एकाअर्थी असलेल्या शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रश्न लैंगिक विषयाशी संबंधीत असो वा नसो पण पालंकांनी त्यांना उत्तर देताना नेहमी खरे उत्तर द्यावे. एकाअर्थाने ही मनमोकळ्या नातेसंबंधांची सुरवातच असते.

समाज आणि शाळाही त्यांना या विषयाची माहिती देत असतात पण पालकांच्या शिकवण्यामुळे मुलांच्या मनात प्रभावी असा मंच तयार होतो व त्यांचे पुढील आयुष्य याच संकल्पनेवर आधारित असते. म्हणूनच पालकांनी मुलांच्या मनावर सकारात्मकतेने या विषयाचे धडे गिरवले पाहिजेत, त्यांच्या मनात एक सकारात्मक मंच तयार केला पाहिजे. अंदाजे गृहित धरण्याने किंवा दुर्लक्ष करण्याने मुलांना काहीच मदत मिळणार नाही. त्याऎवजी त्यांच्या दृष्टिकोनाला बळकटी आणण्याचे काम जबाबदारी घेऊन पार पाडावे. चिडचिड केल्याने किंवा राग व्यक्त केल्याने हा विषय त्यांच्यापासून अधिक दुर जातो. तसेच तरुण होत असताना ते अधिक विद्रोही व स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊ लागतात.

लैंगिक शिक्षण म्हणजे काय?
लैंगिक आणि नातेसंबंधांचे शिक्षण हे शाळेतील अभ्यासक्रमात सामाविष्ट केले गेले आहे. शाळेत मुलांना त्यांच्या अभ्यास क्रमानुसार संभोग, लैंगिकता, भावना, नातेसंबंध व लैंगिक आरोग्याविषयी शिकवले जाते. या मधे मुल्य, दृष्टिकोन, वैयक्तिक व सामाजिक कौशल्ये, समान्यज्ञान आणि समजूतदारपणा यांचाही समावेश असतो.

यामधे खालील विषय असू शकतात.

लग्न व स्थिर नातेसंबंधांचे महत्व