हस्तमैथुनामुळे शिश्नाचा आकार लहान होतो का? आणि त्याचा परिणाम लैंगिक क्षमतेवर होतो का?
हस्तमैथुन म्हणजे मानसिक कल्पनाचित्रांसह, शिश्नाला किंवा टोकाला केलेला मसाज. कामुक कल्पनाचित्रांमुळे मेदूतील कामोत्तेजम केंद्र उद्दीपित होतं तर शिश्नाच्या मसाजामुळे, शिश्नातील रक्तप्रवाह वाढतो. हस्तमैथुनाने वीर्यपात झाल्यानंतर/उत्कर्षबिंदू गाठल्यानंतर, शरीरातील अंतर्गत रचना पूर्वस्थितीत येतात. त्यात शिश्नाच्या सापळ्यात अडकलेले रक्त पुन्हा रक्ताभिसरण संस्थेत परत जाणे समाविष्ट आहे. त्यामुळे शिश्नाचा आकार लहान होतो आणि संकुचित झाल्यासारखे दिसते. त्यामुळे माणसाला आपल्या हस्तमैथुनानेच शिश्नाचा आकार लहान झाल्यासारखे वाटते. त्याचा संबंध तो लैगिक क्षमतेशी जोडतो. लैंगिक क्षमतेचा संबंध तो शिश्नाच्या आकाराशी जोडत असल्याने तो चिंताग्रस्त होतो.
ही चिंताच आत्मतुष्टीची व्यथा होते. त्याची लैंगिक क्षमता सामान्य क्षमतेच्या तुलनेत खालावते आणि त्याचा दोष तो हस्तमैथुनाला देतो. हे अगदी स्पष्ट आहे की हस्तमैथुनामुळे शरीराच्या अंतर्गत कोणत्याही रचनेला धोका पोहचत नाही आणि शिश्नाच्या कामावरही कोणताही परिणाम करीत नाही.
जास्तीचे, अतिरेकी हस्तमैथुन केल्यामुळे शुक्रांणूची निर्मिती कमी होते का?
कोणत्याही क्षणी हस्तमैथुन केले की त्यावेळी शुक्राणू पिंडात असलेल्या शुक्रांणूचे पतन होते. या पिंडाचे अस्तरामध्ये सातत्याने वीर्यनिर्मिती होत असते. वीर्यपतन झाल्याने, पिंड रीकामे होवून वीर्य निर्मितीला चालना मिळते. अशाप्रकारे हस्तमैथुनमुळे शुक्राणूची/वीर्याची निर्मिती घटण्याऐवजी वाढण्यास उत्तेजना मिळते. त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे अतिरेकी हस्तमैथुन वगैरे काही नसते. शरीर क्रिया करण्यास जो पर्यंत परवानगी देते तो पर्यंत आणि तेवढ्या वेळा हस्तमैथुन शक्य आहे जेव्हा शरीर साथ देत नसेल तेव्हा कितीही मानसिक इच्छा असली तरी हस्तमैथुन संभवनीय नाही.
हस्तमैथुनमुळे शारीरीक अशक्तपणा/ थकवा का जाणवतो?
अशक्तपणा किंवा थकवा हस्तमैथुनंमुळे होत नाही. त्यानंतर माणसाला थोडावेळ दमल्यासारखे वाटते याचे कारण म्हणजे वीर्यपतन हा शिश्नाच्या स्नायूंना व्यायामच असतो. जोरकसपणे केल्याने शरीरातील उर्जा खर्च होते. त्यामुळे दमणं हे अशक्तपणाचे लक्षण मानले जाते. थोडयाश्या विश्रांतीनंतर दमणे थांबते आणि पुन्हा हस्तमैथुन करता येते.
स्वप्न दोषामुळे जैवशक्तीचा नाश होतो का?
जैवशक्ती म्हणजेच वीर्य असे समजले जाते. त्यामुळे स्वप्न दोष किंवा रात्री वीर्यपतन होणे म्हणजे जैवशक्तीचा नाश असा चुकीचा अर्थ काढला जातो. ही संपुर्ण कल्पनाच अशास्त्रीय आहे आणि त्या बाबतचे गैरसमज दूर व्हायलाच हवेत. शुक्राणु पिंडाच्या अस्तरात तयार होणारे वीर्य हे जैविकद्रव्य आहे. ते रक्ताच्या थेंबापासून तयार होत नाही किंवा शारीरिक ऊर्जेसाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक घटकांपासून तयार होत नाही. म्हणूनच स्वप्नदोष आणि शारीरिक शक्तीचा नाश यांचा काही एक संबंध नाही.