समाधानकारक संभोगासाठी योनीमार्गाची लांबी किती हवी?
शरीररचना शास्त्रानुसार, लैगिक उत्तेजना झालेली नसताना योनीमार्ग तीन ते साडेतीन इंच (आठ ते दहा से. मी.) लांब असतो जेव्हा पाठीमागची भिंत साधारण एक इंच लांब असते. कामोत्तेजना झाल्यावर तो मार्ग लांब प्रसरण पावतो. त्यामुळे सर्वसाधारण आकाराच्या कोणत्याही शिश्नाला तो सहज सामावून घेवू शकतो. त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे योनीमार्ग ही काही पक्की नळी नाही. तो स्नायूंनी बनलेला असतो. लवचिक असतो, म्हणूनच शिश्नाभोवती तो आवळून धरता येतो, शिश्नाला पकडू शकतो. समाधानकारक संभोगासाठी योनीमार्गातील वंगण महत्वाचे, लांबी नाही.
जी बिंदू म्हणजे काय?
योनीमुखापासून आत दीड ते दोन इंचावर (चार ते पाच सेंमी अंतरावर) योनीच्या वरच्या पटलावर हा विषयवासनेने उद्दीपित होणारा भाग असतो. सुप्रसिध्द स्त्रीरोग चिकित्सक डॉ. ग्राफेनबर्ग यांच्या नावाने ओळखला जातो. शारीरीकदृष्ट्या आसपासच्या योनी पेशीजालंपेक्षा तो वेगळा नसतो पण त्याभागाचे कार्य मात्र वेगळे असते. तो एक न्यूट्रल भाग असतो. जघनास्थितीच्या अगदी खालच्या लगतच्या भागाला उत्तेजना दिली जाते, तेव्हा स्त्रीला विलक्षण सुख मिळते. हे सुख संभोगातील घर्षणामुळे मिळणार्या सुखापेक्षा वेगळे असते.
पी बिंदू म्हणजे काय?
पी बिंदू हे पूर्णचंद्रनाडीचे डॉ. सामक यांनी केलेले नामकरण आहे. सोळाव्या शतकातील भारतीय कामशास्त्राचा अनंगरंग हा एक महत्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथात या पूर्णचंद्र नाडीचा उल्लेख आहे. मूत्रोत्सर्गी नलिकेच्या बाजूचा हा भाग, स्त्राव करणार्या ग्रंथींनी भरलेला असतो. या भागांमुळे स्त्रीला स्त्रावात्मक असा लैंगिक आनंदाचा परमोच्च आनंद मिळू शकतो.
स्त्रीयांच्या कामजीवनातील ही नवी संकल्पना आहे. काही स्त्रियांना, लैंगिक सुखाच्या परमोच्च क्षणी, योनीमार्गातून स्त्रवण होते असे काही संशोधकांनी मांडले आहे त्यांच्या अभ्यासातील निष्कर्षांची कारणमीमांसा पी बिंदू मध्ये सापडते. जेव्हा जी बिंदूला उत्तेजना दिली जाते तेव्हा अनेक स्त्रीयांना स्त्रवण अनुभवता येते. पण काही जणींना जी बिंदूला उत्तेजना न देताही स्त्रवण होते. दुसरी परिस्थिती पी बिंदूचे गृहीतकाद्वारे स्पष्ट होते.
स्त्रीच्या सुखासाठी शिश्निका महत्वाची असते का?
भ्रणावस्थेत असताना ज्या पेशीजालातून पुरूषांचे शिश्नाची वाढ होते, त्याच पेशीजालातून शिश्निकेची वाढ होते. म्हणूनच शिश्नाला मसाज केल्यावर पुरूषाला जे सुख मिळतं तसेच सुख शिश्निकेच्या भागात मसाज केल्याने कामोत्तेजना मिळते. शिश्निकेतील मज्जातंतू थेट मेंदूतील लैंगिक केंद्राला उत्तेजित करतात.