Print
Hits: 26925

उत्थापनातील बिघाड म्हणजे काय?

नंपुसकत्व किंवा उत्थापनातील बिघाड ही सर्वाधिक भेडसावणारी सामान्य समस्या आहे. लिंगाला ताठरता न येणं किंवा संबंधापर्यंत ताठरता टिकून न राहणे म्हणजे उत्थापनातील बिघाड अशी सर्वसाधारण व्याख्या करता येईल. हा प्रश्न मानसिक किंवा शारीरिक असू शकतो. कामेच्छेची प्रक्रिया मानसिक असली तरी प्रत्यक्ष शिश्नाला ताठरता येणं आणि ताठरता टिकवून ठेवणं हा शारीरिक भाग असून यात अनेक घटक असतात.

उत्थापनातील बिघाडाची कारणे कोणती?

शारीरिक प्रतिसाद, रक्तवाहिन्या, मज्जातंतू, लैंगितेशी संबंधित हार्मोन्स, आणि लैंगिक स्नायु ( पी.सी स्नायू) या घटकांशी निगडीत असतो. मेंदूतली हायपोथलॅमस भागात असलेल्या कामेच्छा केंद्रात कामेच्छा निर्माण व्हायला लैंगिकतेशी संबंधित हार्मोन्स जबाबदार असतात. या केंद्रातून संदेश मज्जातुतूमार्फत रक्त वाहिन्यांमार्फत पोहोचवला जातो.

शिश्नाच्या पेशीजालातील रक्त वाहिन्या प्रसरण पावतात. रक्त वाहिन्या प्रसरण पावल्यावर रक्तपुरवठा वाढतो आणि शिश्नाचे स्नायू प्रसरण होऊन, शिश्न ताठ रहाते. मग शिश्नाचे स्नायू कठीणपणा आणण्यासाठी आणि ताठरलेले ठेवण्यासाठी मग कार्यरत होतात. हे सर्व घटक योग्य प्रकारे काम करत असतील, तरच उत्थापन शक्य आहे! अन्यथा समस्या येवू शकतात.

मानसोपचारांचा कसा उपयोग होतो?

मानसोपचारांचे उद्दिष्ट चिंता, अपराधीपणा आणि अन्य गंड दूर करण्यासाठी होतो. त्यात लैंगिक शिक्षण आणि मार्गदर्शनाचा समावेश होतो. मानसोपचारांमुळं व्यक्तिच्या मनातील संकोच जातो, आत्मविश्वास वाढतो आणि म्हणून कामेच्छेचे उद्दीपन होते. एक लक्षात घ्यायला हवं की मानसोपचारांचा उपयोग शारीरिक बिघाडांकरता होत नाही. त्यामुळे कामेच्छा वाढली तरी शारीरिक प्रतिसाद वाढण्यास काही उपयोग होत नाही. हा एक उपचार आहे पण यशाची खात्री नाही.

पापाव्हेराईन इंजेक्शन हे काय असतं?

या इंजेक्शनमुळे, शिश्नातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. हे स्थानिक-शिश्नाला द्यायचं इंजेक्शन असतं. या इंजेक्शनमुळे शिश्न कामेच्छा नसताना सुध्दा ताठरते. याच प्रकारची अजूनही काही औषधे आहेत. उदा. प्रोस्टाग्लँडीन ई १. या उपचारांना आय सी व्ही डी - इन्ट्रो कॅर्व्हेनस व्हेसोडिलेटर थेरपी म्हणतात.

या उपचारांचा कितपत उपयोग होतो?

या इंजेक्शनमुळे शिश्नातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि शिश्न ताठरण्याचा थेट परिणाम दिसतो. पण त्रासदायक असतं. त्या व्यक्तीला काळजीपूर्वक इंजेक्शन घ्यायला शिकवावे लागते. शिश्नात साठलेलं रक्त दोन तासात पूर्ववर रक्ताभिसरणात मिसळायला हवं. जर चार तास शिश्न ताठरलेलं राहिलं तर तातडीने मूत्रचिकित्साकडे धाव घ्यावी लागते. यामुळे, कायमचं नपुसकत्व येवू शकते.

व्हॅक्युम डिव्हाईसचा उपयोग शिश्न उद्दीपनात होतो का?

व्हॅक्युम डिव्हाईसच हे एक ग्लास ट्यूब आणि पंप असलेले उपकरण असते. जेव्हा ट्यूब शिश्नाभोवती लावली जाते, तेव्हा पंपामुळे, ट्यूबमध्ये पोकळी निर्माण होते. बाहेर पोकळी असल्यामुळे रक्त आपोआप शिश्नाकडे वाहतं. त्यामुळे शिश्नाला ताठरता येते.

व्हॅक्युम डिव्हाईसचे इतर दुष्परिणाम आहेत का?

उत्तम दर्जाच्या व्हॅक्युम डिव्हाईसची किंमत काही हजारांत असते. कामक्रिडेच्या पूर्वरंगात, उपकरण मध्येच वापरावे लागल्याने अडथळा येतो. या उपकरणामुळे शिश्नाची त्वचा काळीनिळी थंड पडते. या त्वचेचा त्रास स्त्री पुरूष दोघांनाही होतो.

सेक्स थेरपी म्हणजे काय ? कामोपचार कशाला म्हणतात?

डॉ. मास्टर्स आणि मिसेस जॉन्सन या जोडीने ही उपचार पध्दती शोधून विकसित केली आहे. ही पध्दती प्रथम समस्या केंद्रित होती. त्यात कामजीवनातील वर्तन कसे असावे हा भाग समाविष्ट असतो. म्हणून याला बिहेव्हियरल थेरपी असही म्हणतात. डॉ. हेलन कॅपलान यांनी ८० मध्ये त्यात सुधारणा केली आणि स्वतःची उपचार पध्दती म्हणून सांगण्यात येवू लागली. भारतीय कामशास्त्रातुन डॉ. सामक एक नवी पध्दती विकसित केली आहे. त्याला सामक कामोपचार पध्दती म्हटले जाते.

डॉ. सामक यांची तांत्रिक कामोपचार पध्दती म्हणाजे काय?

भारताच्या प्राचीन कामविज्ञानाच्या मूलतत्वांपासून विकसित केलेली ही एक क्रांतीकारी उपचार पध्दती आहे. हृदयरोगातील तंत्रशास्त्र, शारीरिक योगासने यांत अशी काही तंत्रे आहेत ज्यात थोडीशी सुधारून वापरल्यास, माणसाची लैंगिक कार्यक्षमता वाढते. कामोपचारांचा उपयोग केवळ उपचारात्मक नाही तर लैंगिक समस्यांना प्रतिबंधात्मक असाही आहे. हा एक प्रशिक्षण कार्यक्रम असतो त्यात प्राथमिक आणि वरच्या पातळीची तंत्रे शिकवली जातात. यात जोडप्याने करायची तंत्रेही शिकविली जातात.