Print
Hits: 48105

सामान्यत: संभोग किती वेळा केला जातो?

सर्वसाधारणपणे संभोग किती वेळा केला जातो असे काही प्रमाण नसते. जोडीदाराला मान्य असेल, त्याची इच्छा असेल आणि त्यातून आनंद मिळेल तितक्या वेळा तो साधारणपणे केला असे समजले जाते.

अतिरेकी संभोगमुळे माणसाला शारीरिक दुर्लबलता येते का?

प्रत्येक संभोग हा एक प्रकारचा व्यायामच असतो. संभोग किती जोरदारपणे केलाय त्या प्रमाणात शरीरातील उर्जा खर्च होतच असते. शंभरपेक्षा अधिक कॅलरी सुध्दा खर्च होतात. कॅलरीचा इतका व्यय होत असेल तर ते नुकसान योग्य आहाराने भरून काढणे गरजेचे असते. नेहमीचे जेवण योग्य पध्दतीने घेणे पुरेसे असते. असे असेल तर शारीरिक दुर्बलता येत नाही.

संभोग टाळल्यामुळे, खेळ, अभ्यास, करीअर अशा जीवनाच्या इतर अंगातील कार्यक्षमता सुधारते का?

संभोगक्षम माणसाने, संभोग टाळणे म्हणजे खरे तर त्याच्या जीवनातील इतर अंगातील कार्यक्षमतेला नुकसान पोहोचविणारी गोष्ट आहे. कारण माणसाला प्रत्यक्ष संभोग करणं टाळता येईल. पण त्याबाबतचे विचार तो थांबवू शकत नाही. जर सातत्याने (मेंदूतील) कामजीवनाला उत्तेजना मिळत राहिली तर माणसाला कुठल्याही गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता बिघडते. त्याचा माणसाच्या करत असलेल्या कामावर निश्‍चित परीणाम होतो. त्या माणसाला हाती घेतलेलं काम यशस्वी होण्यासाठी त्याच्या डोक्यात वारंवार येणार्‍या विचारांना काढून टाकणे आवश्यक असते आणि हे शक्य असते लघवी लागल्यावर मोकळ होणं आवश्यक असतं तसं प्रत्यक्ष करून आणि ते शक्य नसेल तर हस्तमैथुन करून, ही जी कल्पना अनेकांच्या मनात असते त्याच्या विरूध्द हे आहे. संभोग केल्यामुळे माणसाची कार्यक्षमता वाढते. खेळ, करीअर, अभ्यास अशा त्याच्या क्षेत्रात अधिक लक्षपूर्वक काम करायला त्याचे मन मोकळे होते.

स्त्रीचे समाधान होण्यासाठी किती वेळ संभोग लांबवायाचा असतो?

संभोगचा आदर्श कालावधी किती याबाबत निश्‍चित असा काही नियम नाही. सगळं स्त्रीच्या मानसिक तयारीवर आणि कामक्रिडेतील तंत्रावर अवलंबून असतं. प्रत्यक्ष संभोगापुर्वी, पुरूषाने स्त्रीला पूर्णपणे उत्तेजित करण्याचे कौशल्य दाखविणे ही निश्‍चित यशाची गुरूकिल्ली आहे.

मासिक पाळीच्या काळात संभोग करणं आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का?

इच्छा असलेल्या जोडीदाराबरोबर कोणत्याही क्षणी संभोग करता येतो. म्हणूनच मासिकपाळी चालू असताना संभोग करायला काहीच हरकत नाही. पण आरोग्यासाठी लिंग संपूर्णपणे धुवून स्वच्छ करणे गरजेचे आहे. आणि संभोगपुर्वी आणि नंतर स्त्रीला त्रास न होता सुखावह वाटणं ही गरजेचे आहे.

गुदद्वारावाटे संभोग घातक आहे का?

काही वेळा गुदद्वारावाटे संभोग अनैसर्गिक मानला जातो. याचं कारण या मार्गाचा जननसंस्थेची संबंध नसतो. पण गुदद्वारातील वर्तुळाकार स्नायुंच्या घट्‌ट पकडीमुळे काही जण या प्रकाराने संभोग करतात. निसर्गत गुदमार्गात कोणतेही वंगण नसल्यामुळे असल्यामुळे असा संभोग वेदनाकारक किंवा जखम होणारा होवू शकतो. गुदमार्ग उत्सर्जन मार्ग असल्यामुळे त्यातील जंतू, संभोग करणार्‍या व्यक्तीच्या मूत्रमार्गास बाधा करू शकतात. त्यानंतर लगेच लिंग/ शिश्न साफ न करताच योनिमार्ग संभोग केला तर योनिमार्गासही बाधा होऊ शकते.