Print
Hits: 55926

अकाली वीर्यपतन म्हणजे काय?

अकाली वीर्यपतन ही सर्वाधिक आढळणारी लैंगिक समस्या आहे. व्यक्तिला जेव्हा विर्यपतन व्हावे असे वाटत असते, त्या अगोदरच जर विर्यपतन झाले तर ते अकाली वीर्यपतन. यामुळे सहचरीचे समाधान होऊ शकत नाही आणि तिलाही निराश व्हायला होतं.
डॉ. सामकांनी अकाली वीर्यपतनाचे काही वैद्यकीय गट केले आहेत.

अकाली वीर्यपतनाचे गट कोणते?

गट ४ : म्हणजे लिंग योनीत शिरण्यापूर्वीच विर्यपतन होणे.

गट ३ : लिंग योनीत शिरल्यानंतर, जेमतेम पाच धडकांच्या आतच विर्यपतन होणे.

गट १ : गट २ ते ४ प्रकारात नाही, पण तरीही पुरूषाच्या विर्यपतनाच्या अपेक्षित वेळेपेक्षा लवकर, झालेले विर्यपतन.

अकाली वीर्यपतनावर उपचार कोणते?

काही तंत्र शिकून घेतल्यावर ही समस्या सुटु शकते. या तंत्रात विर्यपतनाच्या क्रियेवर, प्रत्यक्ष विर्यपतन होण्यापूर्वी नियंत्रण ठेवता येते. विर्य एकदा का मूत्रमार्गात पोचलं की त्याला थोपवणं अतिशय अवघड असतं या तंत्रात डिस्ट्र्क्शन स्टॉप अँड स्टार्ट आणि स्किझ यापध्दतीचा समावेश होतो. काही तज्ञांनी, डोर्सल नर्व्ह बाबत शस्त्रक्रिया करण्याचे तंत्र विकसित केले आहे. या तंत्रात लिंग योनि घर्षणाचे वेळी लिंगातून बाहेर पडणार्‍या द्रावांचे नियमन केले जाते. यामुळे आपोआप लवकर होणारे विर्यपतन टळेल असे वाटते. पण इथे विर्यपतनाचा संबंध, मानसिक उत्तेजनाशी असल्याचे दुर्लक्षित केले जाते.

डॉ. सामकांनी आपोआप होणार्‍या क्रियेच्या नियंत्रनाचे नवे तंत्र विकसित केले आहे. त्याला इंटर्नल स्किझ टेक्निक म्हणतात. हट योगा वज्रोली मुद्रेची ही सुधारीत आवृत्ती आहे.

मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भात वापरल्या जाणार्‍या शब्दांचे अर्थ:

A) अबनॉर्मल बिहेव्हियर : असाधारण वर्तन
असाधारण म्हणजे काय - तर साधारण नाही ते ! साधारण म्हणजे चार चौघं असतात तसं एकाच

सेक्स टॉनिक्स म्हणजे काय?

सेक्स टॉनिक्स म्हणजे, कामेच्छा तीव्र करणारी, शिश्नाचं उत्तेजन कडक राखणारी आणि स्त्रियांना स्वर्गीय सुख देणारी जादुई औषधं अशा औषधातून ‘सुपरमॅन’ सारख काहीतरी लैंगिकबल वर्धन अपेक्षित असतं.

पुरूषांकरता सर्वोत्त्म टॉनिक कोणतं?

सर्वाच्या सर्व समस्या सोडविणारं एकचं एक "रामबाण इलाज" असं औषध अस्तित्वात नाही.

मग विआग्रा काय आहे?

नको तितका गदारोळ उठवलेलं हे एक औषध आहे. ज्यांना शिश्न उत्तेजनास / उठण्यास त्रास होतो, त्यांच्या करता हे औषध तयार केलं गेलं. शिश्नाच्या उद्दीपनाच्या शास्त्रीय जीवशास्त्रीय अभ्यासावर हे औषध आधारीत आहे. सिल्डेनाफिल किंवा विआग्रा हे फॉस्फोडाईट्रेज ५, इनहिविटर औषधी आहे. केमील सायकलीक GMP चा नाश थांबवून, शिश्न ताठरलेल्या स्थितीत रहाण्याची क्षमता वाढविली जाते. विआग्रा डॉक्टरांच्या देखरेखीखालीच घ्यायला हवं.

जर एखाद्या व्यक्तीला शिश्नाच्या ताठरतेत काही समस्या असतील विआग्रा घेण्यास अडचणी काय येतात?

दुर्दैवाने, ज्या पध्दतीने शिश्नाची ताठरता विआग्राने मिळविली जाते त्याचा हृदयावर परीणाम होतो. त्या पध्दतीने हृदयाच्या स्नायुतून कॅल्शियम आयन्स बाहेर पडतात व हृदयाचे शिथिलीकरण होते. हे जीविताला धोकादायक असते. धमनीच्या पोकळी चे विस्फारण झाल्यामुळे रक्तदाब कमी होतो. जर व्यक्ति हृदय विकाराबाबत नायट्रो-व्हेसोडायलेटर औषध घेत असेल तर जीवाला धोका संभवतो.

मग सुवर्णभस्म/ शिलाजीत यांनी काय होतं?

लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी प्रचंड प्रमाणात जाहिरात बाजी झालेलं सुवर्ण भस्म हे औषध आहे. सुवर्ण धातू असल्याने ते हाडात, मूत्रपिंडात किंवा शरीरातील इतर अवयवात साचून राहू शकतं आणि त्याचा परिणाम, त्या अवयवाच्या कार्यावर होतो. सुवर्णभस्मामुळे अवयवांना दीर्घकाळात धोका निर्माण होवू शकतो. शरीरातील महत्वाच्या धातूच्या- वीर्याच्या पतनामुळे शरीरातील जो धातूक्षय होतो, तो सुवर्ण भस्माच्या सेवनाने भरून येतो व पुन्हा शरीराच्या क्रियेला उर्जा मिळते ही भ्रामक मानसिक समजूत आहे. सोन्याच्या आणि धातू निर्मितीचा काही एक संबंध नसतो आणि वीर्यपतनामुळे शरीराची क्षमता घटत नाही. हिमालयातील खडाकांपासून शिलाजित तयार होते. त्याचा आंधळा उपयोग करताना, शिश्न खडकासारखं कठीण होतं ही भ्रामक समजूत होती.

वैद्यकिय शास्त्रानुसार या कल्पना तर्कदुष्ट, अतार्कीक आणि कोणताही शास्त्रीय आधार नसलेल्या आहेत.