विवाह
प्रणयाचं महत्त्व
- Details
- Hits: 5546
महाराष्ट्र टाईम्स
- डॉ. राजन भोसले
पहिल्या समागमाच्या आधी पुरेसा प्रणय करणं जरुरीचं असतं, असं यापूर्वीच्या तुमच्या एका उत्तरात मी वाचलं आहे, याचं कारण समजवावं.
समागमाच्या आधी पुरेसा प्रणय करणं जरुरीचं असतं, हे अनेकांना ठाऊकच नसतं. प्रणयातून होणा-या सुखद संवेदनांमुळे पुरुषाचं शिश्न ताठ आणि स्त्रीच्या योनीमध्ये ओलावा निर्माण होतो. या दोन गोष्टी समागम घडून येण्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. हेच अनेकांना माहिती नसतं. पुरेशा म्हणजे जवळजवळ २५ ते ३० मिनिटं प्रणय केल्याशिवाय संभोग करायचा प्रयत्न केल्यास तो फसण्याची शक्यता जास्त असते.
समागम करण्याआधी जो प्रणय करायचा असतो. तो केवळ पहिल्या रात्रीच नव्हे तर प्रत्येक वेळी संभोग करण्याआधी करणं अत्यंत जरुरीचं असतं. असं न केल्यास समागम अशक्य होईल आणि त्यातून आनंदही मिळणार नाही.