मुलांचे आरोग्य लेख
मुलांचा पौष्टिक आणि मजेदार आहार
- Details
- Hits: 39932
ई-सकाळ
डॉ. श्री बालाजी तांबे

मुलांच्या रक्त, मांस, अस्थी आणि मज्जाधातूंचे पोषण व्यवस्थित होते आहे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. संपूर्ण शरीराला प्राणशक्तीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रक्तधातू, शरीर घडण्यासाठी आणि स्टॅमिना वाढविण्यासाठी मांसधातू, उंची वाढण्यासाठी, कणखरपणा येण्यासाठी अस्थिधातू आणि बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी मज्जाधातू यांचे पोषण होणे गरजेचे असते. मुलांच्या एकंदर आहाराची योजना करताना, या साऱ्याचाच विचार करायला हवा. ......
"कौमारभृत्य' हा आयुर्वेदाने लहान मुलांसाठी आखलेला खास विभाग! यात मुलांचे आरोग्य कसे राखावे याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. लहान मुलांचा आहार कसा असावा, येथपासून त्यांची खेळणी कशी असावी, कपडे कसे असावे, त्यांच्यावर कोणकोणते संस्कार करावेत, अशा अनेक विषयांची चर्चा या विभागात आहे.