Print
Hits: 4620

आपल्या मुलांना समान वागणूक देणे पालकांच्या दृष्टीने खरेच महत्वाचं आहे का? पालकांना आपल्या मुलांपैकी एखाद्याबद्‍दल जास्त ओढ वाटत असेल तर काय होईल? चोवीस वर्षाची प्रीती म्हणते, मुलगी म्हणून जन्माला येणं एवढं वाईट असेल तर मी जन्मालाच आले नसते तर किती बरं झालं असतं!

माझ्या कुटुंबियांनी मला सतत दुजाभावाने वागवले आणि माझ्या भावांना मात्र माझ्यापेक्षा महत्व दिलं.

कुटुंबांत एखादी दूर्घटना घडली की त्याचा ठपका माझ्यावर ठेवण्यात येतो. मला जे स्वत:ला मनापासून करावसं वाटतं ते करण्याचे स्वातंत्र्य माझे पालक मला देत नाहीत. स्वैर भटकंतीची मला परवानगी नसते.

मला माझ्या कुटुंबात एक कैदी म्हणूनच वागवले जाते, तशी वागणूक माझ्या भावांना मात्र मिळत नाही मी मुलगी म्हणून जन्माला आले यात माझी काही चूक आहे का?

सध्या मी एक सुखी विवाहीत स्त्री आहे. मला दोन मुलंही आहेत. परंतु जेव्हा जेव्हा आम्ही भावंड माझ्या माहेरी एकत्र जमतो तेव्हा मी दुर्लक्षित राहते. बालपणी मी माझ्या आईवडिलांना नकोशी होतेच, पण अजूनही त्यांना मी नकोशी वाटत असेन कां? तसं वाटावं अशीच वागणूक अद्यापही मला माझ्या माहेरी मिळते. त्याचे कारण मात्र मला कळू शकत नाही. असं सौ. आचरेकर यांच म्हणणं आहे.

एकोणीस वर्षाची बबिता म्हणते अगदी साध्या चुकांसाठी मला माझ्या घरात मला बोलणी खावी लागतात. कोणत्याही बाबतीत घरचे लोक मला प्रोत्साहन देत नाहीत. त्यांना माझ्याबद्दल प्रेम वाटत असावं असं मला कधीच वाटत नाही. माझी मोठी बहीण माझ्या आईवडिलांची अत्यंत आवडती आहे. ते मला सतत म्हणतात, ‘बघ ती तुझ्यापेक्षा किती वरचढ आहे’.

एकाच कुटुंबातील सख्ख्या भांवडांना आईवडील सारख्याच प्रेमानं, जिव्हाळ्यानं, वाढविताना दिसत नाहीत. त्यांच्यात भेदभाव तुलना केली जाते. ही तुलना इतक्या थराला पोहचते की सर्व मुलांमध्ये एखादच किंवा एखादीच आईवडिलाना जास्त आवडतात. आपणच जन्म दिलेल्या आपल्या मुलांमध्ये असा दुजाभाव करणं योग्य आहे कां? इतर भावंडापेक्षा वेगळे असण्यात त्या मुलाची कोणती चूक आहे? जेव्हा आपण एकाच मुलाचे इतर मुलांपेक्षा फाजील लाड करणारे आईवडील पाहतो तेव्हा वरील प्रश्न मनात येतात.{mospagebreak} खूपदा पालकांपैकी एकजण मुलांमध्ये अशी तुलना किंवा तरतमभाव करताना दिसतो. अगदी क्वचितच आईवडील दोघेही एकाच पद्दतीनं वागताना दिसतात. जेव्हा आईवडील आपल्या मुलांमध्ये एकालाच महत्व देतात त्यामागं बरीच कारणं असतात कां? एखाच्याच मुलाचे कोडकौतुक करताना मग आईवडील त्याच्या यशाचं गुणगान गाताना दिसतात त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. त्यांची जास्त काळजी घेतली जाते. वेगवेगळ्या भेटवस्तू त्याला देण्यात येतात. त्याचे अपराध पोटात घातले जातात. शिवाय त्याच्या अपयशाला पक्षी कमी आवडनाऱ्या मुलाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांच्याशी अशा पध्दतीनं वर्तन केलं जातं की ते मुल नकोसं आहे हे त्याल कळून यावं या मुलाच्या अपराधांना शिक्षा मिळते त्याच्या विशेषज्ञ उल्लेखनीय कामगिरीबद्दल, यशाबद्दल पालक अलिप्त राहतात.

उलट ते मूल कसं कूचकामी आणि दुय्यम दर्जाचं आहे हे त्याला पटवलं जातं. वरील पध्दतीच्या, भेदभावाच्या वागणुकीतील तीव्रता निरनिराळ्या पालकांमध्ये कमीअधिक प्रमाणत असते. कुटुंबातील एका मुलावर दुसऱ्या मुलापेक्षा जास्त प्रेम करायचं. शिवाय त्या वागण्याच्या समर्थनार्थ काही युक्तिवादही करायचे हे अजबच!
त्यापैकी काही युक्तिवाद पुढीलप्रमाणे.
१. शेंडेफळ
माझे व माझ्या पतीचे आमच्या सर्वात धाकट्या मुलावर खूप प्रेम आहे कारण त्यानंतर मूल होऊ न देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता.
हा मुलगा माझे सर्वस्व आहे. मी त्याचे खूप लाड करतो. त्याचे सगळे हट्‍ट मी पूरे करतो, कारण ह माझा धाकटा मुलगा आहे.
२. ‘तो’ आणि ‘ती’
आम्हला तीन मुलगे व एक मुलगी आहे. ही मुलगी एकुलती एक असल्यने इतर तीन मुलांपेक्षा आमची जास्त आवडती आहे.
मला माझ्या मुलीपेक्ष मुलगा जास्त आवडतो, कारण तोच माझ्या घराण्याचं नाव राखेल आणि माझ्यावर अंतिम संस्कारही करेल.
३. खास (वैशिष्टयपूर्ण) अपत्य
माझा मुलगा पंगू असल्यानं त्याची सतत काळ्जी करावी लागते. त्याचे लाड करावे लागतात. माझी मुलगी मला अशक्त वाटते. ती वारंवार आजारी पडते. त्यामुळे मला तिच्यासाठी भरपूर वेळ काढावा लागतो. माझा मुलगा मला अतिशय प्रिय आहे, कारण बरेच नवस बोलल्यानंतर मला तो झालेला आहे.
४. चांगले मूल
माझी ही मुलगी मला दुसऱ्या मुलीसारखी त्रासदायक वाटत नाही. माझा मुलगा बुध्दीमान आहे म्हणून मला त्याचं कौतुक वाटतं. माझ्या सर्व अपत्यात माझी सर्वात मोठी मुलगी अतिशय सुंदर व आकर्षक व्यक्तिमत्वाची आहे. {mospagebreak} ५. पालकांचे पूर्वायुष्य
मला माझ्या माहेरी मुलगी म्हणून अतिशय वाईट पध्दतीनं वाढवलं गेलं. त्याची भरपाई म्हणून मी माझ्या मुलीवर अतोनात प्रेम करते. तिचे खूप लाड करते. आईवडिल जेव्हा आपल्या मुलात अशी तुलना करतात. तेव्हा एक मूल साहजिकच दुखावलं जातं. एकाचे खूप लाड करण्याने व दुसऱ्याला दुय्यम वागणूक दिल्यानं त्यामुलाचं या तुलना व भेदभावाचे मुलावर होणारे काही परिणाम असे:

  1. आपण दुर्लक्षित, नकोसे, असुरक्षित व कुचकामी आहोत अशी त्याची भावना होते. त्याच्यात आत्मसन्मान व आत्मविश्वास याची कमतरता निर्माण होते. त्यांची वागणूक अकारण लक्ष वेधून घेणारी बनत जाते. शिवाय जीवनाबद्‍दल एक प्रकारचा नकारात्मक दृष्टिकोन त्याच्यात निर्माण होतो.
  2. काही वेळा ही मुलं आक्रस्ताळेपणा करतात आणि सर्वांशीच आक्रमक व शत्रुत्वची भावना बाळगतात.
    १३ वर्षाचा रवि म्हणतो, माझ्या भावाबद्दल मला तिटकारा वाटतो कारण माझे आईवडील त्याचे कोडकौतुक जरा अतीच करतात. मी जणू कामातून गेलेलो आहे अशा पध्दतीनं (विचारानं) ते मला वागवतात.
  3. अशी मुलं मग काही वेळा बंडखोर व हट्‍टी होतात. त्यांची वागणूक पालकांना आणखीनच नकोशी वाटत राहते. काही वेळा ही मुले बंडखोर न बनता एकदमच मवाळ, इदास, व अबोल बनतात. त्यातून मग एक भित्रट, अंतर्मुख व्यक्तिमत्व तयार होतं.
  4. आपल्या आईवडिलांकडून प्रशंसा मिळविण्यासाठी, शाबासकी मिळवण्यासाठी यातली काही मुलं आपण आपल्या भावंडापेक्षा वरचढ कसे ठरू याचाच सदैव ध्यास घेतात तर काही मुलं कशातही काही न करण्याचं ठरवतात व स्वत:च्याच कोषात निष्क्रिय जीवन जगू पाहतात.
  5. तुलना व भेदभाव यांचा अतिरेक झला तरी ही दुर्दैवी मुलं मग घरातून पळून जातात. नशिल्या औषधांच्या (ड्रग्ज) आहारी जातात किंवा सरळ आत्महत्येचा मार्ग पत्करतात.

एक पालक म्हणून तुम्हीही अस भेदभाव करत असाल तर स्वत:ची चूक आत्ताच ओळखून स्वत:च्या वागणूकीत बदल घडवून आणा उशीर करू नका दुर्लक्षित नकोशा मुलांची क्षमा मागा व त्यांच्यासोबत एका नव्याजीवनाची सुरूवात करा.

अपंग मुलाकडे आपला जास्त ओढ असेल तर आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देतो याची कारणं दुसऱ्या मुलाला नीट समजावून सांगा. याबरोबरच धडधाकट मुलाकडेही पुरेसे लक्ष द्या, आपल्या अपंग भावडंला समजावून घ्यायला, त्याच्याशी मैत्री करयला त्याला प्रोत्साहन द्या.

यशं हवं म्हणून यशाच्या मागं धावू नका, तुमची ज्याच्यावर निष्ठा व प्रेम आहे त्याचा पाठपुरावा करा. यश आपोआपच तुमच्या पदरी पडेल.