Print
Hits: 4893

मुलं ही परमेश्वराची देणगी आहे असे म्हटले जात असले तरी आईवडील त्याच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका निभावत असतात. हव्या त्या पध्दतीने मुलाच्या व्यक्तीमत्वाला आकार देण्याचे काम त्याच्या हातात असते. या व्यक्तिमत्व विकास प्रक्रियेत आईवडिलांचा सहभाग महत्वाचा. मग शाळा व मित्रमैत्रिणी यांचा क्रम लागतो.

मुलत: कोणत्याही मुलाच्या आयुष्याची पहिली सहा वर्षे ही महत्वाची असतात. या वयातच ते मूल आपण पालकांना आवडते की नाही याबाबतीत विचार करत असतेव एका ठराविक निर्णयापर्यंत येऊनही पोहोचते. जेव्हा त्या मुलाचा घरात चांगल्या पध्दतीने स्वीकार होतो, त्याची नीट काळजी घेतली जाते, घरातील माणसे त्याच्यावर प्रेम करतात तेव्हाच त्या मुलाला आपण ‘आवडत्या’ मुलाच्या संकल्पनेत मोडतो हा समज येतो.

जेव्हा एखादे मूल घरातून दुर्लक्षिले जाते, त्याची देखभाल व्यस्थितपणे होत नाही. तेव्हाच त्या मुलाला आपण नावडते असल्याची जाणीव होते. एकदा ही भावना निर्माण झाली की ती आयुष्यभर दृढ राहते. त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, वातावरण समूळ बदलेपर्यंत हा समज बदलू शकत नाही.

जेव्हा घरात पहिले मुल येते. तेव्हा त्याचे आईवडील त्याला एका विशिष्ठ पध्तीने वाढवतात. त्या तरूण जोडप्याला, त्यांच्या आईवडीलांनी ज्या पध्दतीने वाढविलेले त्याच पध्दतीच्या, त्याच काळातल्या नैतिक कल्पना, मूल्यविचार, सत्यासत्य, चांगले - वाईट, हित-अहित या संबंधीच्या कल्पना ते आपले मूल वाढविताना प्रत्यक्षात आणतात.(उदा. मुलगा व मुलगे समान नाहीत. स्त्रीने (मुलीने) कुटुंबासाठी त्याग केलाच पाहिजे. वेळप्रसंगी आपल्या आनंदावर, सुखावर पाणी सोडून!) जुन्या काळात त्या जोडप्याच्या आईवडिलांनी संगोपनप्रक्रियेत ज्या ज्या चुका केलेल्या असतात, त्यांचीही अनवधानाने पुनरावृत्ती होत असते.

अशा पध्दतीने हे चक्र पिढ्यान पिढ्या चालू राहते. उदा. बाळाच्या आजीने बाळाच्या आईला पुरेसे प्रेम, जिव्हाळा, दिलेला नसेल, तिच्या दैनंदिन वर्तणुकीबद्दल, यशाबद्दल कौतुक केलेले नसेल, जिज्ञासा दाखवली नसेल, तिच्यासाठी पुरेसा वेळ दिलेला नसेल तर ही तरूण आई अजाणता आपल्या मुलींशी तसेच वागण्याची शक्यता असते. त्यामुळे हे नवीन मुल पुन्हा त्याच प्रकारच्या दु:खातून, वेदनातून जाते. या उलट बाळाच्या आईला जार दुर्लक्षिल्या जाणाऱ्या दु:खाची सूज्ञ जाणीव असेल तर ती आपल्या मुलीशी खचिताच तसे वागण्याचे टाळेल.

वस्तूस्थिती अशी आहे की, कोणतेच आईवडील आईवडील परिपर्णू नसतात आणि कोणतेही मूल अगदी परिपूर्ण पध्दतीने वाढविले जात नाही.
मुलाला वाढविताना, योग्य भावनिक बंध तयार व्हावेत यासाठी कही मार्गदर्शनपर सूचना पुढीलप्रमाणे:
कोणतेही मूल वाढविताना, मूलत: तीन प्रकारची शिस्त आईवडील पाळतात.

  1. दरारायुक्त शिस्त (Authoritarian Discpline) किंवा कडक शिस्त: ही शिस्त एका जुन्या म्हणीवर आधारित आहे. Spare the ord means spoiling the child (लकडीशिवाय मकडी वळत नाही) इथे आईवडील मुलांना नियम आखून देतात वते मुलांना पाळावेच लागतात.असेच नियम का? असा प्रतिप्रश्न मुले विचारू शकत नाहीत. जर मुलांनी नियमबाह्य वर्तन केले तर त्यांना अघोरी, क्रूर शिक्षा केली जाते. ती नियमाप्रमाणे वागली तरीही त्यांचे कौतुक केले जात नाही. कारण एक प्रकारची लाच (Bribery) देणे होय असे पालकांना वाटते.
  2. मोकाट सोडणारी सिस्त (Permissive Discipline) या प्रकारच्या शिस्तीला एक गोष्ट गृहित धरलेलली असते ती ही की मुले आपल्या वर्तनाच्या फलितावरून (Consequences) धडा घेऊन बरेवाईट काय ते समजून वागतील आणि सामाजिक दृष्ट्या ग्राह्य अशा वागणुकीकडे स्वत:च जाऊन पोहचतील म्हणजे काय तर मुलांना कायदेकानू, रीतीरिवार, नितिनियम . यांचा वस्तूपाठ दिला जात नाही. त्यांच्या सद्‌वर्तनाबद्दल शाबासकीही मिळत नाही व गैरवर्तणुकीबद्दल शिक्षाही मिळत नाही.
  3. लोकशाहीवादी शिस्त: (Democratie Discipline) या शिस्तप्रणालीतल्या शिस्तीमागचा कार्यकारणभाव मुलांना समजावून दिला जातो. त्यांना तर नियम त्रासदायक, जाचक वाटत असतील तर त्यांना तसे मोकळेपणाने व्यक्त करण्याची मुभा दिलेली असते. गुन्ह्याबद्दल योग्य ती शिक्षा द्यावी असा आईवडिलांचा प्रयत्न असतो. याचा अर्थ हा, की चुकीच्या वर्तुणुकीबद्दल शिक्षा होत असते. सामाजिकदृष्ट्या मान्यतापूर्ण वर्तणुकीबद्दल त्यांचे कौतुक तोते वत्या स्वरूपात समाजमान्यता व बक्षीसही मिळते.

शिस्तीच्या या विविध पध्दतीचे मुलांवर होणार परिणाम पुढीलप्रमाणे:

  1. मुलांना मोकाट, सोडणाऱ्या पालकांची मुले स्वार्थी, दुसऱ्यांच्या हक्काविषयी बेफिकीत आणि आक्रमक वृत्तीची होतात. अधिकातारूढ व्यक्तींना धुडकावून टाकण्याची त्यांची वृत्ती बनते.
  2. कडक शिस्तीत वाढलेली मुले पालकांच्या समोर आज्ञाधारक तर समवयस्कांबरोबर आक्रमक अशी होतात. आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या मनात दबून असते. म्हणून वडीलधाऱ्या व्यक्तींबद्दल त्यांना तिटकारा वाटू लागतो. शारीरिक शिक्षा जितके जास्त तितकी ही मुले अधिक उदास, हेकट व हट्‌टी बनत जातात. वैयक्तिक व सामाजिक असंतूलन हा त्याचाच परिणाम! हा परिणाम मोकाट सोडलेल्या मुलांमध्येही दिसतो.
  3. लोकशाहीवादी शिस्तीत वाढणारी मुले दुसऱ्यांच्या हक्कांची कदर करतात, जपणूक करतात व स्वत:च्या अयोग्य वागण्यावर निर्बंधही घालू पाहतात. या मुलांना एखाद्याबद्दल तात्कालिक राग येऊ शकतो. पण तिटकारा किवा धुडकावून लावण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. ती संतुलित वागणुकीचे उत्तम उदाहरण ठरतात.