Print
Hits: 5424

तुमचे आपल्या कुटुंबियांशी संबंध कसे आहेत? ते फारसे स्निग्ध नसतील, दुरावा असेल आणि हे संबंध अधिक जिव्हाळ्याचे व्हावेत, असे तुम्हासं मनापासून वाटत असेल तर या महत्वाच्या सूचना वाचा:

आपल्या कुटुंबातील माणसे आपली आहेत, असा प्रत्येकालाच विश्र्‍वास सार्थही असतो. जवळजवळ प्रत्येक कुटुंबातील सदस्य एकमेकांशी प्रेमाने, आपुलकीने जखडलेले असतात. त्यांचमुळे एखाद्या कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी ते नेहमीच सिध्द असतत. आई-वडील आणि मुले, भावंडे, इतर नातेवाईक यांच्यात योग्य तो जिव्हाळा असेल तर सर्व काही आपोआपच सुरळीत होत जाते.
अभाव जिव्हाळ्याचा
परंतु काही कुटुंबांमध्ये निमक्या या जिव्हाळ्याचाच अभाव असतो. मुलांत आणि पालकात योग्य संपर्क नसतो. त्यामुळे अनेक समस्या उभ्या राहतात. ‘माझे वडील माझ्याशी क्वचितच बोलतात. जेव्हा बोलतात. तेव्हा फक्त अभ्यासाचे चौकशी करतात’ माझे आई-वडील तसे खूप चांगले आहेत. आम्ही काहे वेळा फिरायलाही जातो. पण बाहेत प्रत्येकजण स्वत:च्या विचारातच गुंग असतो. ‘माझ्या अठरा वर्षाच्या मुलीने गेल्या वर्षी आत्महत्या केली, आमच्या कुटुंबात जिव्हाळा असता तर असे काही घडलेच नसते.’

आजच्या भरधाव वेगाने पळणाऱ्या जगात दुसऱ्यासाठी वेळ काढणे प्रत्येकालाच कठीण असते. आईवडील पैसे मिळविण्यात दंग असतात, तर मुले त्यांच्या अभ्यासात दोन्ही गोष्टी आवश्यक असल्याने त्या बाबतीत आपण कुणालाच दोष देऊ शकत नाही. पण आज आपण प्रेम, परस्परांचा सहवास यापेक्षा पैशाला अधिक महत्ब देऊ लागलो आहोत. हे बरोबर आहे कां?

आपल्याकडे लहान मुलांची काळजी घेणे, त्यांना वाढवणे, त्यांचे पालन-पोषण करणे वगैरे जबाबदारी घरातील स्त्रीची (पत्नीची) आहे, असे समजले जाते. पुरूषाने (किंवा पतेने) बाहेत जाऊन कुटुंबासाठी पैसा मिळवून आणावा अशी अपेक्षा असते. यामुळेच कुटुंबातील सदस्यांच्यात एक अंतर निर्माण होण्याचा धोका असतो. कारण प्रत्येक लहान मुलाला आई-वडील दोघांच्याही आधाराची मनस्वी गरज असते.

तुम्हाला तुमचे कुटुंब आनंदी असावे. असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील. एकमेकांच्या जवळ येण्यासाठी काही सूचना खाली दिल्या आहेत. त्या पालकांसाठी उपयुक्त आहेतच, पण मुलांनाही त्यांचा उपयोग होईल.

१. संपूर्ण आठवड्याच्या तुमच्या कामाचे कॅलेंडरच्या मदतीने एक वेळापत्रक तयार करा. येत्या आठवड्यात तुम्ही करणार असलेल्या प्रत्येक कामाची (कोणतेही काम, मीटिंग, शाळा - कॉलेजमधील विविध कामे, ऑफिसमध्ये आणि बाहेर असलेली कामे, सहली वगैरे) नोंद करून ठेवा, हे वेळापत्रक तयार केल्यानंतर तुम्हाला एखादा दिवस मोकळा मिळत असेल तर त्यावर x अशी खूण करून ठेवा. याचा अर्थ तुखी तो दिवस आपल्या कुटुंबासाठी राखून ठेवला आहे, असा होते.

ध्यानात ठेवा

  1. हे कॅलेंडर सर्वांना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी टांगा.
  2. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आवडेचा एखादा कार्यक्रम तुमच्या नोंदीत असायला हवा. उदा. उपाहारगृहात जाऊन खाद्यपदार्थाचा आस्वाद घेणे, चित्रपट पाहणे किंवा गप्पा मारत बसणे.
  3. बऱ्याचदा एका कुटुंबात राहात असूनही, आपण एकमेकांना फारसे ऒळखत नाही. अलीकडे तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागले आहे याचे एक कारण म्हणजे अनेकदा आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींना गृहीत धरतो. आणि एखाद्या वेळेस आपल्यात आणि इतर सदस्यांच्यात संपर्क कमी झाला तर त्याचा फारसा विचार आपण करीत नाही.

तुमच्या कुटुंबात ही समस्या असेल तर आजपासूनच ती सोडवण्याच्या कामाला लागा. अजूनही उशीर झालेला नाही. हे लक्षात ठेवा. या विषयावर कां करणे अगदी सोपं आहे. जास्तीत जास्त वेळ तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या सहवासात घालवा.

त्यांचे विचार, इच्छा - आकांक्षा, जीवनातील ध्येये वगैरे गोष्टी जाणून घ्या. त्याचबरोबर तुमच्या इच्छा-आकांक्षांचीही माहिती कुटुंबातील सदस्यांना द्या.
आणि हेही लक्षात असू द्या
दुसऱ्या व्यक्तीच्या मताची चेष्टा किवा त्याच्यावर फार टीका करू नका. पालक म्हणून तुमचे अनुभव आणि मुलांचे अनुभव यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आणि तुमची मुले यामधील अंतर तुमच्यातील दरी बनू देऊ नका.
मुलाच्या शंका - कुशंकांना न कंटाळता उत्तरे द्या.
जर पालकांच्यापुढे काही समस्या असतील (उदा-आर्थिक समस्या, आजारपण, मृत्यू वगैरे) तर समज आलेल्या आपल्या मुलांना या समस्यांपासून दूर ठेवू नका. त्यांना त्याबाबत स्पष्टपणे सांगा. त्यामुळे त्यांना जबाबदारीची जाणीव होईल. एवढेचे नव्हे तर अनेकदा मुलांकडून समस्यांची सोडवणूक होईल. बचत तिच्या हवाली केली. ते पैसे भरपूर नव्हते. पण त्यामुळे आई-मुलांतील आपलेपणाची भावना अधिक दृढ झाली.

अगदी मुलांनाही काही समस्या असतील तर त्यांनी आपल्या आई-वडिलांबरोबर त्याबाबत चर्चा करायला हवी. आई-वडिलांनीही मुलांच्या समस्या जाणून घ्यायला हव्यात. याच मार्गाने ते आपल्या मुलांना पूर्णपणे ऒळखू शकतात.

एकमेकांबरोबर बुध्दिबळ, पत्ते, क्रिकेट, वगैरेसारखे खेळ खेळा. महिन्यातून एकदा तरी मुलांबरोबर तुम्ही चित्रपट पाहायला किंवा सहलीला जायला हवे.

काही कुटुंबे बरोबर फिरायला जातात, पण तरीही त्यांच्यात जवळीक नसते. एकमेकांशी काही देणे घेणे नसते. बाहेर फिरायला गेल्यानंतर आपल्याच कोषात गुंतून राहू नका. सहलीला किंवा फिरायला गेल्यानंतर खऱ्या अर्थाने पालक आणि मुले यांच्यात सुसंवाद निर्माण होऊ शकतो.

सहल किंवा फिरायला जाणे फारसे महत्त्वाचे नाही. (एक रिवाज किंवा उपचार समजून सहलीचा किंवा बाहेर जाण्याचा कार्यक्रम आखू नका) आपल्या कुटुंबाबरोबर घालवलेला वेळ अधिक महत्वाचा असते.

सुट्‌टीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाला घरातील कामे करण्यात सहभागी करून घ्या, किंवा तुम्ही सहभागी व्हा. स्वयंपाकघरातील स्वच्छता, आई-वडिलांना मुलांची मदत, एकत्र बसून वाचन करणे किंवा मुलाच्या भाषणाची किंवा नाटकाची रंगीत तालीम पाहणे. यातूनही कुटुंबातील जवळीक वाढते.

ज्या कुटुंबात पती-पत्नी दोघेही कामासाठी बराच वेळ बाहेर असतात, तिथे रात्रीचे जेवण झाल्यानंतर बाहेर फिरायला जाणे हा कुटुंबातील व्यक्तींना जाणून घ्यायचा एक महत्वाचा पर्याय असतो. आपल्या दिवसभराच्या कामाचा आढावा अशा वेळी ऎकमेकांबरोबर केलेल्या चर्चेतून घेता येतो. त्याचबरोबर आपल्या मुलांनाही योग्य प्रकारे समजावून घेता येते.

दुसऱ्याबद्दल तुमच्या मनातील भावना व्यक्त करणे आवश्यक आहे. ‘आय लव्ह यू’ मला तुझी काळजी वाटते, ‘मला तुझा अभिमान वाटतो’ असे काही शब्द खरंच जादू करतात.

थोडक्यात आपल्या कुटुंबाबरोबर आपले संबंध सुधारणे आवश्यक असतेच. त्यासाठी आपल्याला वेळही काढावा लागतो. कुटुंबाशी आपली जवळीक नसेल तर उशीर न करता, तीजवळीक वाढवण्याचा प्रयत्न करा.