Print
Hits: 7431

एका ठराविक वयात आल्यानंतर नव्याने कुणाशीही मैत्री करणे कठीण जाते. मान्य आहे. शाळा- कॉलेजमध्ये असते तशी निर्व्याज्य, सरळ मैत्री नंतरच्या आयुष्यात मिळत नाही. पण अशी मैत्री करने आवश्यक आहे. नव्हे ती आपली मानसिक गरज आहे कशी?
लतिका तशी सगळ्यांच्यात मिळूनमिसळून राहणारी. किटी पार्ट्या, छंदाचे वर्ग, नवयाचे मित्र, त्यांच्या बायका, नवऱ्याची बिझनेस कॉंटॅक्टस्‌, क्लब.... एक ना अनेक.

लतिकाचे हे भले मोठे मित्रमंडळ पाहेले की सगळ्यांना ति हे वाटे. पण स्वत: लतिका मात्र समाधानी नाही. कारण तिच्या मते तिला खरेखुरे मित्र- मैत्रिणी नाहीत. ज्या लोकांना मी ऒळखते. ते माझे तथाकथित मित्र आहेत. यापैकी एकाही माणसावर ती कणभरही विश्वास ठेवत नाही. माझ्या समस्या घेऊन मी त्यांच्याकडे गेले तर मला त्यांच्यापैकी एकहीजण मदत करणार नाही, याची मला अगदी खात्री आहे. मला कधी कधी खूप एकाकी वाटते. पण काय करणार? शाळा कॉलेजमध्ये भेटतात, तेच खरे मित्र त्यानंतर आपले हित जपण्यासाठी जोडण्यात आलेले ते सामाजिक संबंध असतात.
जीवश्‍चकंठश्‍च
पण लतिकाच्या उलट वीणाचं अशा सामाजिक संबंधातूनच दोन अगदी जवळच्या मैत्रिणी मिळवल्या. त्या माझ्या नवऱ्याच्या मित्रांच्या बायकाच आहेत. सुरूवातील सामाजिक गरज म्हणूनच आम्ही स्वाभाविकपण भेटलो होतो. पण नंतर आमची मैत्री अशी काही वाढत गेली की आता आम्ही अगदी जीवश्‍चकंठश्‍च मैत्रिणी बनलो आहोत. माझे तर त्यांच्याशिवाय पानच हालत नाही. त्यांच्या सहवासात एखाद्या कॉलेज गर्लसारखी मी उनाडत असते, मजा करते, असं ती म्हणते.

आपल्या आयुष्यात ‘मित्र’ नावाच्या प्राण्यांबरोबर घालवलेले क्षण एक अवीट गोडी घेऊन येतात. मित्र म्हणजे केवळ संकटकाळीस धावून येणारी किंवा तुम्हाला सतत समाधान, सुख मिलवून देणारी व्यक्ती नव्हे. मित्र म्हणजे अशी व्यक्ती की जिच्या सहवासात तुम्ही स्वाभाविकपणे वागता, तुम्हाला मुखवटे घालण्याची अगरज भासत नाही. अगदी मोकळेपणाने तुम्ही त्या मित्राबरोबर वागता.

आपल्यापैकी अनेकांना मित्र असतातच. पण मित्र नसणारेही अनेक जण आहेत. त्यांना ’मित्र’ नसण्याची अनेक कारणे असू शकतात. असे लोक स्वत:ला काही प्रश्न विचारतात, मला मित्र असावेताच कां? मित्रांना मी एवढे महत्व का द्यावे? मला मित्र नसतील तर असे कोणते आभाळ कोसळणार आहे? या प्रश्नांची उत्तरे आपण शोधूया.
एखाद्याशी मैत्री करणे आपण कां टाळतो?
काही लोक स्वभावत:च अंतर्मुख असतात. काही लोक परिस्थितीमुळै अंतर्मुख बनतात. अंतर्मुख व्यक्ती आपल्या मनात काही ठाम विचार ठेवून असतात, त्या सामाजिक संपर्क, सोशल बहिर्मुख व्यक्तींना मैत्री करायला आवडते, लोकांच्यात मिळून मिसळून रहाण्यात त्यांना विशेष आनंद असतो. ’सामाजिक सोशल फोबिया’ असल्यामुळे काही जण अंतर्मुख बनतात. अशा प्रकारचे लोक सार्वजनिक ठिकाणी अत्यंत अस्वस्थ असतात. इतरांच्या उपस्थितीत काम करणं त्यांना कठीण जाते. अनोळखी व्यक्तींशी बोलणं त्या टाळतात.

३१ वर्षाच्या कुमारला तो १४ वर्षाचा असल्यापासून सोशल फोबिया होता. दुसऱ्याच्या सहवासात तो अतिशय अस्वस्थ होत असे, आणि म्हणूनच तो लोकांना भेटणेच टाळायचा. इतरांच्या सहवासात खाणं-पिणं त्याला जमत नसे. दुसऱ्याशी बोलतानाही कसं बोलावं. दुसऱ्याची टीका कशी परतवून लावावी वगैरे गोष्टी त्याला जमत नसत. फोनवर बोलणही त्याला कठीण जाई. मानसोपचारामुळे आता त्याने या दोषावर मात केली आहे. कही लोकांना एखाद्याशी मैत्री करणं महत्वाचं वाटत नाही. अशा व्यक्ती फक्त स्वत:च्या असतात. त्या आपली सुखदु:ख इतरांबरोबर वाटू शकत नाहीत. जसजसा काळ पुढं सरकतो, तसतशी रिकामपणाची (सामाजिक जीवन नसल्यामुळे)जाणीव त्यांना खाऊ लागते.

कित्येक नवविवाहित जोडप्यांना आपण एकमेकांचे खरे मित्र आहोत आणि आपल्याला तिसऱ्या मित्रांची गरज नाही असं वाटतं. नव्याची नवलाई संपेपर्यंत त्यांची ही समजूत खरीही असते. पण कालांतराने हीच गोष्ट एक समस्या बनते. म्हणूनच इतरांच्या सहवासात राहून त्यांच्याबरोबर विचारांची सुखदु:खांची देवाण घेवाण करणं आवश्यक असतं. मित्रांकडून आलेले वाईट अनुभव ध्यानात घेऊन अनेकजण मैत्री करण्याचं टाळतात. हे अनुभव खालीलप्रमाणे.

 1. माझ्या मित्रांनी मला धोका दिला ज्यावेळी मला गरज होती त्यावेळी कोणीही मला मदत केली नाही.
 2. माझी गुपितं मी त्याला विश्वासानं सांगितली. पण त्यानं माझा तो विश्वास तोडला.
 3. मी तिला विश्वासात घेतलं होतं, पण तिनं माझा गैरफायदा घेतला.
 4. माझे मित्र व्यसनी आहेत ते दारू आणि अंमली पदार्थाचे सेवन करतात. ते इतरांना मारहाणही करतात. काही नेळा तर त्यांनी चोऱ्याही केल्या आहेत.
 5. माझ्याजवळ पैसा होता तेव्हा सगळेच माझे मित्र होते. ज्यावेळी पैसा संपतो तेव्हा कुणीच कोणाच मित्र नसतं.
 6. तिच्या माझ्याबाबत खूपच अपेक्षा आहेत. बऱ्याचदा ती मला गृहित धरते. म्हणून मी तिची मैत्री तोडली.

अशा काही अनुभवांमुळे अनेकांना आपण नवे मित्र केले तर पुन्हा अडचणीत येऊ अशी भीती वाटते. काही लोकांना अनोळखी मानसांशी बोलायला अवघड वाटतं. स्नेहा पटवर्धन ऑफिसला जाताना ठराविक बसनं जाते. त्या बसमध्ये तिला अनेक ओळखीचे चेहरे दिसतात. पण त्यांच्याशी बोलायचं कसं हेच तिला समजत नाही. तिनं बोलायला तोंड उघडलं तर आपल्याबद्दल इतर लोक काही चुकीचे समज करून घेतील अशी तिला भिती वाटते.

करीअरमध्ये, कुटुंबामध्ये किंवा अभ्यासामध्ये आकंठ बुडालेली असतात. मैत्री करण्यासाठी, मित्रांबरोबर वेळ घालवण्यासाठी त्यांच्याजवळ वेळच नसतो, अशा लोकांना नैराश्य येते, त्यांना एकाकी वाटते. मैत्री करण्यासाठी आपल्याला वेळ नसतो, असे त्यांनी म्हणण्यापेक्षा मित्रांच्या सहवासात घालवण्यासाठी ते वेळ काढत नाहीत असं म्हणणं जास्त योग्य ठरेल.

काही जणांना स्वत:विषयी न्युनगंड असतो, किंबहुना स्वत:विषयी विश्वासच नसतो, त्यांच्यातच वेगवेगळे फोबिया असतात. स्वत:विषयी अत्यंत हीन अशी भावना त्यांच्या मनात असते. त्यामुळे मैत्री करणं त्यांना कठीण जाते.
मैत्री करणं महत्वाचं का आहे?
ज्याप्रमाणं आपण अन्न पाण्याशिवाय जगू शकत नाही, त्या प्रमाणंच मानसिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी आपल्याला मित्रांची आवश्यकता असते. मैत्री करणं आपण टाळलं तर आपल्याला एकटेपण, नैराश्य, कंटाळा, उदासी, जीवना विषयीच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. एवढंच नव्हे तर आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थितीला तोंड देणं आपल्याला जमत नाही.

आपल्याला जवळचे मित्र असतात. त्यांच्याबरोबर आपण विचारांची त्यांच्यामुळे आपण अधिक आनंदी माणूस बनतोच. पण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाशी स्वत:ला ‘ऍडजस्ट’ करायला शिकतो.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला विविध स्वभावांच्या, विविध दर्जाच्या व्यक्तींशी कसे वागावे याचे ज्ञान होते. आपण माणूस आहेत. स्वाभाविकच आपल्याला भावना आहेत. त्याचबरोबर इतरांच्यात मिळूनमिसळून राहणं ही आपली मानसिक गरज आहे ही गरज आपण ऒळखली नाही, तार अनेक मानसिक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं तसच उतरांच्या सहवासात राहिल्यामुळे मानसिक दृष्ट्या आपल्याला खूप सुरक्षितही वाटते.
मैत्री कशी करावी?

 1. भूतकाळातील चुकांमधून शिकण्याची, सुधारण्याची आपली वृत्ती असते. त्याचपध्दतीने आपल्या मित्रांनी दिलेले वाईट, त्रासदायक अनुभव स्वीकारून भविष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अंगिकारावा.
  तुमच्या मित्रानं सधी काळी तुमचा गैरफायदा घेतला असेल. पण सगळेच मित्र तसे नसतात. प्रत्येक मनुष्य वेगळा असतो, हे ध्यानात घ्या
 2. तुम्हाला कसला फोबिया असेल किंवा लोकांच्या उपस्थितीत तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, तर सरळ मानसोपचारतज्ज्ञाकडे जा. कारण या समस्येला उपचारांची गरज आहे.
 3. तुम्हाला इतरांबरोबर आपल्या भावना, विचार अनुभव यातील कशाचीही देवाणघेवाण करणे आवडत नसले तरी ती करायचा प्रयत्न करा. त्यातून येणारा अनुभव निश्‍चतच चांगला असेल.
 4. क्लब, जिम्नॅशियम्स, छंद वर्ग वगेरे ठिकाणीस नियमितपणे जा. पाटर्यांनी तुमची उपस्थिती असणे आवश्यक आहे.

कुठल्याही भीतीशिवाय अनोळखी व्यक्तीबरोबर संभाषण सुरू करा. पहिल्याच भेटीत शक्यतो त्या व्यक्तीविषयी कोणतेही ग्रह मनात आणू नका.

एक गोष्ट ध्यानात घ्या. पहिल्याच भेटीत आपण त्या व्यक्तीविषयी केलेला अंदाज फर्स्ट इंप्रेशन बरोबर असतोच असे नाही. काळाबरोबर आपल्या मित्राला/मैत्रिणीला अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्‍न करा.

एखाद्याशी जवळीक साधायची असेल तर तुम्हाला चांगला श्रोता बनावे लागेल. पण त्याचबरोबर तुमच्यात बोलघेवडेपणाही असायला हवा.

आपल्या नेहमीच्या गडबडीतून आपल्या मित्रांसाठी काही वेळ खास राखून ठेवा. केवळ फोनवरून मित्र मैत्रिणींशी बोलून भागणार नाही. त्यांच्याबरोबरच तुम्ही तुमचा वेळ घालवला पाहिजे.