आरोग्य.कॉम
  • मुखपृष्ठ
  • पर्यायी उपचार पद्धती
    • आयुर्वेद
    • होमिओपॅथी
    • निसर्गोपचार
    • अ‍ॅक्युप्रेशर
    • अ‍ॅक्युपंक्चर
    • अरोमा थेरपी
    • बॅच फ्लॉवर औषधे
    • घरगुती उपाय
    • मसाज
    • योग
    • ध्यान
    • रेकी
    • संमोहन
    • बॉडीवर्क
  • आजार आणि रोग
    • सामान्य आजार
    • संसर्गजन्य आजार
    • विशिष्ट आजार
  • कुटुंबाचे आरोग्य
    • पुरूषांचे आरोग्य
    • वृध्दांचे आरोग्य
    • महिलांचे आरोग्य
    • मुलांचे आरोग्य
    • किशोर आरोग्य
    • प्रथमोपचार
    • तंदुरूस्ती
    • पोषक पदार्थ आणि अन्न
    • पाळीव प्राणी
  • आरोग्य संपदा
    • वैद्यकीय करियर
    • ग्रामिण आरोग्य
    • हॉस्पिटल्स
    • रुग्णहक्क समिती
    • आरोग्यासाठी टिप्स
  • विमा
    • आरोग्य विमा
    • वैद्यकीय नैतिकता
    • टेलीमेडिसीन
    • इच्छामरण
  • लैंगिकता
    • लैंगिकता म्हणजे काय?
    • लैंगिक शिक्षण
    • गर्भधारणा
    • विवाह
    • कामजीवन आणि अपंगत्व
    • मासिकपाळी
    • ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिझम
    • शरीरभाषा
    • लैंगिकतेपार
    • फेटिशीझम
    • लैंगिक संवेदना गोठणे
  • स्व-मदतगट
    • एपिलेप्सी
    • स्किझोफ्रेनिया
    • पार्किन्सन्स
    • व्यसनमुक्ती
    • स्थुलता
    • कर्करोग
    • नैराश्य
    • अपंगत्व
    • मुत्रपिंड स्व-मदतगट
    • सेतू
    • कोड - पांढरे डाग
    • सहचरी मदत गट
Aarogya.com
English | ગુજરાતી | नोंदणी | लॉग-इन
  • मुख्यपृष्ठ
  • लेख
  • मानसशास्त्र
  • अभ्यास कसा करावा?

अभ्यास कसा करावा?

  • Print
  • Email
Details
Hits: 17192

आपण ज्यांना टीनएजर्स किंवा किशोरवयीन मुलं म्हणतो - म्हणजे १३ ते १८ वयोगटातील अशी मुले अभ्यासाचा कंटाळा करतात. मला माझ्या तीन इच्छा कोणत्या हे विचारले तर सांगेन - परीक्षा आणि अभ्यास नावाचे राक्षस नसावेत.

शिक्षकांनी आमच्याशी मित्राप्रमाणे  वागावे आणि शाळेत जाणे म्हणजे पिकनिकला गेल्यासारखे वाटावे, १४ वर्षाची सरिता सांगते. सर्वसाधारणपणे किशोरवयीन मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात. अभ्यास न करण्याची कारणे ती शोधत असतात. ‘माझं पोट दुखतंय मला बरं वाटत नाही, मला आज कंटाळा आला आहे’ मला सगळं येतयं, वगैरे वाक्य बहुतेक आई - वडिलांना आपल्या मुलांकडून ऎकायला मिळतात.

खूप अभ्यास करून परीक्षेत चांगले यश मिळवणे हे मुलांच्या योग्य वाढीचे द्योतक आहे. अभ्यास न करणारी मुलं आणि त्यांना अभ्यासाला जबरदस्तीने बसवणारी पालक मंडळी या दोघांच्या वादविवादानं घराचं वातावरण पार बिघडून जाते. म्हणूनच मुले अभ्यास का करत नाहीत, याची कारणे आपण अभ्यासली पाहिजेत.

  1. अभ्यास करणे हे मुलांना कंटाळवाणं वाटतं. बऱ्याचदा अभ्यासक्रम भरपूर असतो आणि आपल्याला एवढा प्रचंड अभ्यास करायचा आहे, हे पाहूनच मुलांचा अभ्यासातील रस संपतो.
  2. आमचे शिक्षक आंम्हाला नीट शिकवत नाहीत. किशोरवयीन मुलांना शिकवण्यात येणारे अनेक विषय नवे असतात. ते योग्य रीतीने शिकवले तरच त्यात मुलांना रस वाटतो.
  3. पाठांतराचा तिटकारा - अनेक मुलं विषय न समजताच धडाधड पाठांतर करतात. पण मधेच एखादा शब्द किंवा वाक्य विसरलं तर प्रश्नाला उत्तर देणं त्यांना कठीण जातं. त्यामुळेच त्यांना परीक्षेत कमी मार्क मिळतात. त्यामुळं पुढं अभ्यास करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास ती गमावतात.
  4. अभ्यास करणे महत्वाचे आहे असं मला वाटत नाही. बऱ्याच मुलांना अभ्यासाचं महत्वचं पटलेलं नसतं. पालकांना वाटत असतं की, आपल्या मुलांना आपण अभ्यास का करायचा ते माहीत आहे, म्हणून त्याबाबतीत ते आपल्या मुलांशी काही बोलत नाहीत. आपण अभ्यास का करायचा, हेच माहीत नसल्यामुळे मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. आणि परीक्षेचा निकालही निराशाजनक असतो.
  5. “माझे आई-वडिल माझ्याकडून अति अपेक्षा का करतात” असं अनेक मुलं म्हणतात. आई-वडिलांच्या अति अक्षेपांमुळे मुलांवर दडपण येतं त्यामुळे ती एकाग्र बनू शकत नाहीत. (या ठिकाणी सध्या चालू असलेल्या ‘घरोघरी’ या उत्कृष्ठ नाटकाची सहजच आठवण यावी.)
  6. ज्या मुलांचे आई-वडील घटस्फोटीत आहेत, व्यसनी आहेत एकमेकांशी सतत भांडत असतात. मुलाला सतत मारहाण करीत असतात, त्यांची मुलं अभ्यासात मागं पडतात.
  7. काही वेळा मित्रांच्या संगतीने अभ्यास करण्याचं मुलं टाळतात. आपल्या मित्राला अभ्यास आवडत नाही, म्हणून त्यांनाही आवडत नाही. कारण त्यांनी अभ्यासात रस दाखवला तर ग्रुपमधून बाहेर फेकले जाण्याची त्यांना भीती असते.

अभ्यासामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा, बुध्दीचा मोठया प्रमाणावर विकास होतो. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची माहीती होते, ते समजून घेता येतं. स्वत:च्या प्रगतीसाठी अभ्यासाची अत्यंत आवश्यकता असते. आणि म्हणून किशोरवयात हा अभ्यास करणं आवश्यक असतं. त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्र्वास निर्माण होतो.
अनेक किशोरवयीन मुलं अभ्यास तर भरपूर करतात, पण त्यांनी अभ्यास कसा करायचा याच्या काही नोंद खाली दिलेल्या आहेत. त्यामुळे मुलांना आपला अभ्यास नक्कीच सुधारता येईल.

  1. तुमचे अभ्यासाचे टेबल, टी. व्ही., स्वयंपाकघर आणि ट्रॅफिकच्या आवाजापासून दूर असायला हवे टेबलवर कॉमिक्स, गोष्टीची पुस्तके नसावीत.
  2. शक्य असेल तर अभ्यासाची एक ठराविक वेळ असावी. म्हणजे त्या वेळेत अभ्यासात तुमचं मन एकाग्र होण्यास मदत होईल. रवीला रात्री दहानंतर अभ्यास करायला आवडतं. कारण त्यावेळी सर्वजण झोपलेले असतात आणि सर्वत्र शांतता असते.
  3. सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्ती ४५ मिनिटं ते एक तासपर्यंत एकाग्र राहू शकते. त्यानंतर एकाग्रता भंग होऊ लागते. म्हणजेच जेव्हा एखादा किशोरवयीन मुलगा एकच पाठ एक तासापेक्षा अधिक काळ वाचत असतो. तेव्हा पाठाचं स्मरण करणं त्याला कठीण जातं. त्याही पेक्षा जेव्हा तो मुलगा तीन तास सलग अभ्यास कतीत असतो. तेव्हा त्याची स्मरणशक्ती कमी होते आणि तो अधिक विस्मरणशील होतो. म्हणूनच किशोरवयीन मुलांनी सर्वसाधारणपणे तासभरच अभ्यास करायला हवा. त्यानंतर १० - १५ मिनिटांचे मध्यंतर घेऊन मग पुन्हा अभ्यासाला सुरूवात करावी. यामुळे स्मरणशक्ती ताजीतवानी राहते आणि अभ्यासक्रम चटकन लक्षात यायला मदत होते.
  4. छोट्या मध्यंतराप्रमाणेच मुलांनी काही काळ खेळण्यात, मित्रांशी गप्पा मारण्यात, टीव्ही बघण्यातही घालवला पाहिजे. यामुळे मुलांना जीवनाविषयी आस्था वाटते आणि अभ्यास करताना उत्साह येतो.
  5. रोज अभ्यास करायची सवय ठेवा, म्हणजे परीक्षेच्या वेळी ताण जाणवणार नाही.
  6. एखादा धडा वाचताना तो नेमका कशाबद्दल आहे ते जाणून घ्या. त्यातील मुद्यांची शीर्षके, धड्याची प्रस्तावना आणि सारांशही नीट वाचा. यामुळे त्या धड्यांची नीट ऒळख होते आणि तुमची अभ्यासाची तयारीही अधिक होते.
  7. वाचून झाल्यानंतर पुस्तक बंद करून, तुम्ही जे वाचलं ते आठवण्याचा प्रयत्न करा. केलेला अभ्यास लिहून काढणे सर्वात उत्तम. त्यामुळं तुम्ही तुमची उत्तरं अधिक चांगल्या तऱ्हेने लिहू शकता. आणि तुमचा गोंधळही त्यामुळे उडत नाही. शिवाय लिखाणामुळे तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या स्मरणात चांगला राहतो. शिकण्याची क्षमता ही माणसाला मिळालेली महान देणगी आहे. तिचा उपयोग करा. आणि आयुष्यात यशस्वी व्हा.

65

मानसशास्त्र

  • जवळच्या माणसाशी नातं कसं जोडाल?
  • तुमच्या मुलाला कसे वाढवाल?
  • मुल कशाचा जास्त द्वेष करतात?
  • मुलांबरोबरचे संबंध सुधारा
  • करियर कसे निवडाल?
  • मोठे होण्याची गोष्ट
  • अभ्यास कसा करावा?
  • वैवाहिक जीवनातील गुंता: पत्‍नीचे संशय पिशाच्च
  • मुलांच्यासाठी असं करायला हवं
  • पुन्हा वसंत येऊ द्या!
  • खरंच तुम्हाला मित्राची गरज आहे?
  • प्रेमाला उद्‍गार द्या...
  • निराशेच्या कोशातून बाहेर पडायला हवं!
  • तुमचे जीवन कसे घालवाल?
  • घटस्फोट हाच पर्याय?
  • पन्नाशीनंतर लैंगिक - सुखाचा अधिकार आहे?
  • जीवनावर प्रेम करा
  • मानसशास्त्राची मदत घेण्यात गैर काय?
  • प्रेमविवाह का मोडतात?
  • घटस्फोटानंतर - २
  • घटस्फोटानंतर...

Swine Flu

National Award for Outstanding achievement by a Non-Professional - Tushar Sampat

Introducing Digital Practice for Doctors & Healthcare professionals

विशिष्ट आजार
सामान्य आजार

आरोग्य नेटवर्क

आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.

» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pune Aarogya
Digital Media Dedicated to Healthcare of Punekars

वेबसाईटशी लिंक करा

aarogya logo

ईमेल कोड

आमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या

 आरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.

स्वास्थ्य साधने

  • हेल्थ डिरेक्टरी
  • संदेश बोर्ड
  • हेल्थ कॅल्क्युलेटर

आरोग्य.कॉम विषयी

आरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.

अधिक वाचा...

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू

अधिक वाचा...

सदस्यांच्या प्रतिक्रया

“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.!”

  • आमच्या विषयी
  • प्रतिक्रिया
  • गोपनीयता नीति
  • साइट मॅप
  • संपर्क
  • मित्रांशी संपर्क साधा

कॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.