आरोग्य.कॉम
  • मुखपृष्ठ
  • पर्यायी उपचार पद्धती
    • आयुर्वेद
    • होमिओपॅथी
    • निसर्गोपचार
    • अ‍ॅक्युप्रेशर
    • अ‍ॅक्युपंक्चर
    • अरोमा थेरपी
    • बॅच फ्लॉवर औषधे
    • घरगुती उपाय
    • मसाज
    • योग
    • ध्यान
    • रेकी
    • संमोहन
    • बॉडीवर्क
  • आजार आणि रोग
    • सामान्य आजार
    • संसर्गजन्य आजार
    • विशिष्ट आजार
  • कुटुंबाचे आरोग्य
    • पुरूषांचे आरोग्य
    • वृध्दांचे आरोग्य
    • महिलांचे आरोग्य
    • मुलांचे आरोग्य
    • किशोर आरोग्य
    • प्रथमोपचार
    • तंदुरूस्ती
    • पोषक पदार्थ आणि अन्न
    • पाळीव प्राणी
  • आरोग्य संपदा
    • वैद्यकीय करियर
    • ग्रामिण आरोग्य
    • हॉस्पिटल्स
    • रुग्णहक्क समिती
    • आरोग्यासाठी टिप्स
  • विमा
    • आरोग्य विमा
    • वैद्यकीय नैतिकता
    • टेलीमेडिसीन
    • इच्छामरण
  • लैंगिकता
    • लैंगिकता म्हणजे काय?
    • लैंगिक शिक्षण
    • गर्भधारणा
    • विवाह
    • कामजीवन आणि अपंगत्व
    • मासिकपाळी
    • ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिझम
    • शरीरभाषा
    • लैंगिकतेपार
    • फेटिशीझम
    • लैंगिक संवेदना गोठणे
  • स्व-मदतगट
    • एपिलेप्सी
    • स्किझोफ्रेनिया
    • पार्किन्सन्स
    • व्यसनमुक्ती
    • स्थुलता
    • कर्करोग
    • नैराश्य
    • अपंगत्व
    • मुत्रपिंड स्व-मदतगट
    • सेतू
    • कोड - पांढरे डाग
    • सहचरी मदत गट
Aarogya.com
English | ગુજરાતી | नोंदणी | लॉग-इन
  • मुख्यपृष्ठ
  • लेख
  • नैराश्य
  • निराशेच्या कोशातून बाहेर पडायला हवं!

निराशेच्या कोशातून बाहेर पडायला हवं!

  • Print
  • Email
Details
Hits: 4291

राणीचे एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. हे प्रकरण तीन वर्षे टिकले. या काळातील आयुष्य जणू तिच्यासाठी स्वर्गातील नंदनवन बनले होते. पण एक दिवशी तिचे त्याच्याबरोबर कडाक्याचे भांडण झाले आणि ‘आता मी तुझे तोंड देखील पाहणार नाही.’ असे सांगून त्याने तोंड फिरविले ते कायमचे.

या घटनेलाही आता दोन वर्षे झाली, पण अजूनही तिला तो येईल अशी आशा वाटते. आज सहा वर्षे झाली तरीही श्रीमती सावंत आपल्या २३ वर्षे वयाच्या मुलीचा सिलिंग फॅनला अडकलेला मृतदेह विसरू शकत नाहीत. अजूनही रात्री त्या दचकून उठतात. झोपेत जोरजोरात रडतात. आपल्या इतर दोन मुलांची आणि पतीची देखभाल करण्यात त्यांना काही रस उरलेला नाही.

अधिकारी दांपत्याने आपला १५ वर्षाचा संसार अडीच वर्षापूर्वी संपवला. श्री. अधिकारी एक प्रेमळ, समंजस आणि एकनिष्ठ पति म्हणून यशस्वी ठरले नाहीत. घटस्फोट घेतल्याबद्दल आणि संसारातील स्वतःच्या अपयशाबद्दल त्यांना अजूनही टोचणी लागून राहिली आहे.
यातनामय भुतकाळ
माणसाच्या जीवनात घडलेल्या काही भयंकर घटनांचे परिणाम त्याच्या संपूर्ण आयुष्यावर कसे होतात आणि तो त्या घटनांमुळे आपले वर्तमान आयुष्यही कसे मातीमोल करून टाकतो. यांचीही काही उदाहरणे आहेत. जणू त्यांचा यातनामय भूतकाळ त्यांचा वर्तमानकाळ बनला आहे.

पण असे आयुष्य जगणे योग्य आहे काय? आपल्याच आयुष्याची जाणूनबुजून अशी विलापिका करणे कितपत बरोबर आहे? वरीलप्रमाणे आयुष्य जगणार्‍या लोकांनी खरेच अशा प्रकारचे प्रश्न स्वतःला विचरण आवश्यक आहे.
माणूस आपल्या आनंदी आयुष्याची अशी राखरांगोळी का करतो याची काही कारणे खालीलप्रमाणे संभवतात:
जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही भयंकर यातनामय अनुभव येतो, तेव्हा त्याच्या मनात एक नकारात्मक भावना निर्माण होते (राग, निराशा, अपराधीपण, दुःख वगैरे) काही काळ ही भावना त्याच्या मनात घर करून राहते हे खरे, पण जसजसा काळ पुढे सरकतो. तसतशी ती व्यक्ती त्या यातनामय अनुभवातून स्वतःला सावरते. तो अनुभव विसरण्याचा ती प्रयत्‍न करते. पण समजा, ती व्यक्ती त्या अनुभवातून दीर्घकाळ सावरू शकली नाही तर तिचे आयुष्य अधिकच यातनामय होते.

  1. दैनंदिन आयुष्याकडे पाठ फिरवल्यामुळे वर्तमान आयुष्य अधिक कठिण, यातनामय होते.
  2. अशी व्यक्ती सतत, उदास, निराश राहते आणि काही काळानंतर स्वतःचाच द्वेष करू लागते. अशावेळी थोडे जरी मनाविरूध्द घडले तरी ती चिडचीड करू लागते.
  3. अशा व्यक्ती बराच काळ नैराश्यग्रस्त राहिल्या तर त्यांना हृदयरोग, पोटविकार, दमा, अल्सर, यासारखे रोग उद्‍भवू शकतात.
  4. या व्यक्ती सामाजिक संपर्क टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्‍न करतात.
  5. स्वतःविषयी त्यांनी विश्वास गमावलेला असतो. त्यांच्या मनातून आत्मसन्मानही नाहीसा होतो. जीवनाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून त्या व्यक्ति पाहतात. आणि त्यामुळेच जीवनावरची आणि स्वतःवरची त्यांची श्रध्दा उडते.

हे सारे मातृवियोगामुळे
पाच वर्षापूर्वी शिल्पाची आई एका कार अपघातात मरण पावली. या घटनेचा तिच्यावर एवढा परिणाम झाला आहे. की तिने आत्मविश्वास तर गमावला आहेच. पण त्याचबरोबर ती निराश, चिडखोर बनली आहे.

लोकांपासून दूर जाऊ पाहते आहे, आज तिला दम्याच्या विकाराने पछाडले आहे. तिचे केस कमालीचे गळतात आणि आता तिचे वजनही घटले आहे.

काही व्यक्ती आयुष्यात घडलेल्या क्लेशदायक घटना पूर्णपणे विसरून जाण्याचा प्रयत्‍न करतात, म्हणजे अशी काही घटना आपल्या आयुष्यात घडली होती, ही वस्तुस्थितीच ही मंडळी नाकारतात. अशा विस्मृतीत गेलेल्या त्यांच्या समस्या अंतर्मनात अगदी टक्‍क जाग्या असतात. आणि हेच मानसिकदृष्ट्या अधिक धोकादायक असते. अशा व्यक्तींवर खालीलप्रमाणे परिणाम होतात.

  1. कारण नसाताना अशा व्यक्ती निराश, हतवीर्य आणि चिडखोर बनतात. काही वेळा त्या आक्रमक आणि हिंसकही बनतात.
  2. रात्री वाईट स्वप्ने पडणे, झोपेत रडणे, किंचाळणे किंवा बडबडणे वगैरे त्यांना जडतात.
  3. चित्रपट, टी. व्ही. पाहताना किंवा गोष्टी ऐकताना स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या घटनेप्रमाणे घडलेली घटना पाहिली किंवा ऐकली तर अशा व्यक्ती पुन्हा अस्वस्थ, निराश, चिडखोर बनतात पण आपण असे का वागतो, याचे आकलन त्यांना होत नाही.

तसेच ती क्लेशदायक वाटणारी घटना आठवणे त्यांना कठीण जाते. केवळ मानसोपचारांमुळेच अशा व्यक्ती बर्‍या होऊ शकतात.
लैंगिक अत्याचारामुळे
२६ वर्षीय रंजनाला पुरूषांशी बोलणे कठीण जात असे मुलांच्या, पुरूषांच्या उपस्थितीत तिला गुदमरल्यासारखे होई तिल रात्री वाईट स्वप्ने पडत आणि कित्येकदा झोपेत ती किंचाळत उठे. मानसोपचारांमुळे ती बरी झाली. लहानपणी काही वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. तिच्यावरील मानसिक आघातांमधील तीव्रता बरीच कमी झाली आणि आता पुरूषांबरोबर ती सहज संवाद साधू शकते.

खरे तर आयुष्यात घडलेल्या वाईट घटना पूर्णपणे विस्मृतीत गाडून त्यांना नाकारण्यापेक्षा किंवा त्याच घटनांवर विचार करत रहाण्यापेक्षा, त्यांचे घडणे स्वीकारणे हे योग्य, अशा घटनांचा स्वीकार करणे म्हणजे त्याचा आणि त्या स्मृतींशी सरळ सामना करणे होय. ही बाब प्रत्यक्षात करणे कठीण आहे, पण अशक्य नाही. काहीही झाले तरी सत्य तेच राहते, तुम्ही त्यापासून कितीही दूर पळालात तरी त्याचे अस्तित्व राहतेच, ते पुसून जात नाही. म्हणूनच तुमच्या भूतकाळाचा वर्तमान आयुष्यावर काहीही परिणाम होऊ न देता जगायला शिका.
नकारात्मक भावना व्यक्त करा.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अशी कोणतीही परिस्थिती स्वीकारण्यापूर्वी मनात असलेल्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेश, निराशा, अपराधीपणा, दुःख, भीती किंवा असुरक्षितता) व्यक्त कराव्यात. काही काळ अशा स्थितीत राहणे स्वाभाविक असते. हा मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण रमेशकुमारचे उदाहरण घेऊ.

चार वर्षापूर्वी एका अपघातात पाय गेल्यामुळे रमेशला आलेली निराशा, असहाय्यता केवळ महिनाभरच टिकली असती तर त्याच्या आयुष्याला नवा अर्थ प्राप्त झाला असता पण तसे घडले नाही. अपघातात आपण पाय गमावला आहे ही वस्तुस्थिती मान्य करून कृत्रिम पाय बसवण्याच्या प्रयत्‍नाला तो लागला असता, तर त्याचे जीवन आशावादी बनले असते.

पण रमेशासारख्या व्यक्तींनी अजूनही आपल्या केवळ नकारात्मक भावनांनी विणलेल्या कोषातून बाहेर पडायला हरकत नाही. एक सुंदर आयुष्य त्यांची वाट पाहते आहे. कष्ट करण्याची तयारी असेल तर अशक्य, कठीण असे माणसाला काहीच नाही होय ना?


0

नैराश्य

  • निराशेच्या कोशातून बाहेर पडायला हवं!

Swine Flu

National Award for Outstanding achievement by a Non-Professional - Tushar Sampat

Introducing Digital Practice for Doctors & Healthcare professionals

विशिष्ट आजार
सामान्य आजार

आरोग्य नेटवर्क

आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.

» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pune Aarogya
Digital Media Dedicated to Healthcare of Punekars

वेबसाईटशी लिंक करा

aarogya logo

ईमेल कोड

आमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या

 आरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.

स्वास्थ्य साधने

  • हेल्थ डिरेक्टरी
  • संदेश बोर्ड
  • हेल्थ कॅल्क्युलेटर

आरोग्य.कॉम विषयी

आरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.

अधिक वाचा...

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू

अधिक वाचा...

सदस्यांच्या प्रतिक्रया

“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.!”

  • आमच्या विषयी
  • प्रतिक्रिया
  • गोपनीयता नीति
  • साइट मॅप
  • संपर्क
  • मित्रांशी संपर्क साधा

कॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.