Print
Hits: 4749

दंतचिकित्साशास्त्र हे मौखिक आरोग्याची काळजी देणारे शास्त्र/व्यवसाय आहे.

हास्य हे आनंद व हर्षाचं प्रतिक आहे. असे म्हणतात की, अगणित मुळ शब्दांना बोलक करण्याचं सामर्थ्य हास्यात असत आणि हेच हास्य खुलविण्यासाठी खरी मदत झाली ती दंत सौंदर्य शास्त्राची, हास्याचं सौंदर्य दातांच्या मोहकतेवर आणि त्यांच्या चमचमणार्‍या शुभ्रतेवर अवलंबून असतं. दातांच्या नियमित स्वच्छतेमुळे दात सुंदर होतातच शिवाय श्वासही सुगंधित होईल.

रूट कॅनॉल ट्रीटमेंट
रूट कॅनॉल करून दात वाचविण्याची पध्दत काही अगदीच नविन नाही. आज दात वाचविण्याकडे लोकांचा कल जास्त दिसून येत आहे. अशीच दात वाचविण्याची एक पध्दत म्हणजे रूट कॅनॉल ट्रीटमेंट (नसेचा इलाज) दातांना लागलेली कीड फार जुनी असेल किंवा दात दुखायला लागला असेल म्हणजे कीड दातांच्या तिसर्‍या थरापर्यंत म्हणजे पल्प (नस) पर्यंत पोहचते. अशा परिस्थितीत रूट कॅनॉल ट्रीटमेंट करावी लागते. कीड जेव्ह दाताच्या पल्प (नस) पर्य़ंत पोहचते. तेव्हा तेथील रक्ताची नस बाहेरील वातावरणाच्या संपर्कात येते. त्यामुळे संसर्ग होऊन तिथे पू तयार होतो. अशावेळी दातामध्ये असलेली रक्ताची नस काढून टाकतात व त्या जागी गटापची नावाचे औषधी मटेरियल भरतात. त्यानंतर त्यावर कंपोझीटचे आवरण चढवतात त्यामुळे दात वाचतो आणि ही ट्रीटमेंट एका भेटीत अथवा दुसर्‍या भेटीत पूर्ण होते. खर्चही मध्यमवर्गीयांना झेपेल असाच आहे.

दात साफ करणे
आपण दिवसभर जे काही अन्न खातो पितो, त्याचे सूक्ष्मकण नीट ब्रश न केल्याने निघत नाही त्यामुळे त्याचे थर वाढत जातात. त्यास कॅलक्युलस किंवा टार्टर म्हणतात. ज्या व्यक्ती जर्दा, पानमसला, गुटका यांचे सेवन करतात त्यांच्या दातावर असा थर लवकर जमा होतो. अशावेळी हिरड्यातुन रक्तामिश्रित पू येतो. हिरड्या कमजोर होतात. अशा स्थितीत लक्ष न दिल्यास पायरिया होऊन दात आपोआप हलून पडून जातात. त्यासाठी वर्षातून एकदातरी दात साफ करणं आवश्यक असतं. अल्ट्रासौनिक स्केलरने दातांवरील टार्टरचा थर स्वच्छ होऊन हिरड्या पुन्हा पूर्ववत होतात. दातांना जर काळपट रंग आला असेल तर ब्लिचिंग पध्दतही उपलब्ध आहे. त्यामुळे दांताचा रंग बदलून पांढराशुभ्र होऊ शकतो.

डेंक्चर वयोवृध्दाना नीट जेवता यावे यासाठी संपूर्ण कवळी (कम्प्लीट डेंक्चर) बनविण्यात येते. ज्या ठिकाणी एक दोन किंवा अधिक दात काढलेले असतील त्या ठिकाणी फिक्स किंवा काढता घालता येणारे दात लावता येतात. फिक्स दात अर्थात सोनं, सफेद मेटल आणि सिरॅमिकपासून तयार केलेले असतात. कोणताही दात काढल्यानंतर त्या ठिकाणी खोटा दात लावणं जिकरीच असतं. अन्यथा आजुबाजूचे दात जागा मुळाल्यामुळे सरकतात व त्यामुळे दातांमध्ये फटी पडून कमजोर होऊ शकतात.

इम्पॅक्टेड मीलर
अनेकवेळा अक्कलदाढ पूर्णत: बाहेर येऊ शकत नाही, हाडातच अडकुन राहते. त्याला कॅम्पॅक्टेड मीलर म्हणतात. अशावेळी एक छोटसं ऑपरेशन करून अक्कलदाढ काढता येते.

वेड्यावाकड्या दातांवर उपचार
वेड्यावाकड्या दातामुळे चेहर्‍याचे सौंदर्य कमी होतं. कित्येकवेळा बोलायला व अन्न चावायलाही त्रास होतो. तोंड पूर्ण बंद न झाल्याने लाळ गळते. अशा दातावर उपचार करून दात नीट करता येतात. वाकड्या दातांवर तार बांधण्यात येते, एक ते दीड वर्षाच्या कालावधीत दात आत जाऊन एका रांगेत येतात. त्यामुळे चेहर्‍याच्या सौंदर्यातही वृध्दी होते.

प्रभावी, मधूर हास्याने आपल्याला सगळ्यांची मनं जिंकता येतात. एक आत्मविश्वास निर्माण होतो. परंतू तुमचे दात जर सुंदर नसतील तर निराश होऊ नका. आजच तुमच्या दंतवैद्याकडून आधुनिक उपचाराद्वारे दातांचं सौंदर्य प्राप्त करा.