Print
Hits: 4200

पर्यायी औषधोपचार म्हणून ‘गंधोपचार’ या उपायास आता प्रसिध्दी मिळत आहे.

‘गंधोपचार’ ही एक अशी उपचार पध्दती आहे की ज्यात शरीराचा तोल, मन व आत्मा यांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी होतो. गंधोपचारात नैसर्गिक झाडांचा अर्क शरीर सुदृढ ठेवण्यासाठी वापरला जातो. ही एक खूप प्राचीन पध्दती आहे. या उपाचारामध्ये वासहुंगणे, झाडापासून, फुलापासून, साली आणि खोडापासून शीत दाबाने किंवा उर्ध्वपातनाने काढलेले तेल/अर्क यांनी मसाज करणे हे अंतर्भूत आहे.

हा एक थेंब अर्क/तेल जीवंत झाडाच्या १ औंस इतका असतो. हा अर्क अतिशय परिणामाकारक असतो व त्यामुळे त्याचा परिणाम अतिशय सूक्ष्मपणे होतो असे तज्ञ सांगतात. हळूहळू गंधोपचार या उपचार पध्दतीस भारतामध्ये निसर्गोपचार म्हणून मान्यता मिळू लागली आहे. यामधे त्वचेवरील छिद्रामुळे शरीरावर व मनावर उपचार होतात, शिवाय ही पध्दती सुरक्षीत आहे. याचा वापर थंडी, खोकला, निद्रानाश, सांधेदूखी यामधे केला जातो. या उपचारामधे नैसर्गिक तेल हूंगून किंवा मसाजाद्वारे प्रवेशकरते आणी प्रसरते, काही काळ रहाते. यामधे साइड इफेक्टस्‌ नसल्याने सर्व वयोगटातील लोकांसाठी वापरले जाउ शकते. गंधोपचार तज्ञ असा इशारा देतात की इतर पध्दतीप्रमाणे याचा स्वत: वापर करू नये. सुवास हा यामधील महत्वाचा घटक आहे पण वासाचा सर्वांवर सारखाच परिणाम होतो असे नाही. अर्कामुळे मानसिक आरोग्य सुधारते, सकारात्मक विचारांना चालना मिळून नकारात्मक विचार कमी हो‍उ लागतात. सूखद आठवणी, भावना जागृत होतात, भावनिक तोल सांभाळला जातो, आरामदायी वाटते आणि लैंगिक भावना जागृत होण्यास मदत होते. या अर्कांना/तेलांना खूपच वैद्यकीय गूण आहेत. उदा. अँटी सेप्टीक, अँटी बॅक्टेरीयल, अँटी व्हायरल, अँटी टॉक्सीक आणि अँटी इनल्फेमेट्री इत्या.

औषधी गुणधर्म असणारी जवळ जवळ २०० प्रकारची तेल/अर्क गंधोपचारामध्ये वापरली जातात. केस सौंदर्य, सौंदर्य प्रसाधनांच्या व्यवसायात त्वचेवरील सुरकूत्या कमी करण्यासाठी व इतर त्वचेस ंबंदी समस्या दूर करण्यासाठी केला जातो. संपृक्त अर्क/तेल हे अतिशय तीव्र असते व ते नैसर्गिक आहे म्हणून धोका नाही असे नाही. याच्या अयोग्य वापरामुळे धोके निर्माण हो‍उ शकतात म्हणून हे उपचार तज्ञांकडून घ्यावेत. गरोदरपणात बसिल, जस्मीन, रोझमेरी, पेपरमिंट यांचा वापर टाळणे आवश्यक आहे नाहीतर गर्भपात होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाबामधे पाइन, रोझमेरीचा वापर टाळावा. ही उपचार पध्दती एक दंत कथा बनून राहिली होती पण सध्या लोकांना तिचे महत्व पटायला लागले आहे.