Print
Hits: 8348

कृतज्ञतेची भावना
मी लहान असताना सुट्टिच्या दिवसात माझ्या आजीकडे जात असे. ती अतिशय धार्मिक , शांत व समाधानी वृत्तीची अशी स्त्री होती. सकाळी साधारण दोन एक तास तिची पुजा अर्चा चाललेली मी पहात असे. त्यांनतर मला तिने बनवलेल रुचकर असे जेवण जेवायला मिळे.

तिची पुजा अर्चा चाललेली असताना एका गोष्टीने माझे लक्ष वेधुन घेतले होतं ‘मी आभारी आहे’ हे वाक्य तीने असंख्य वेळा म्ह्टलेले माझ्या लक्षात आलं. ती अन्न, वस्त्र, निवारा , चांगली मुल, नातंवड, उबदार घर, तिची ठणठणीत असलेली तब्येत अशां असंख्य चांगल्या गोष्टी ज्या तिच्या वाट्याला आल्या होत्या त्याबद्दल ती त्या ‘सर्वसाक्षी परमेश्वराचे’ आभार मानत असे. अगदी दररोज उगवणा-या सूर्यापासून प्रत्येक गोष्टीबद्दल ती त्या आदीशक्तीचे उपकार मानत असे. मी तिच्या ह्या आभार मानण्यातील निरर्थकतेबद्दल सतत वाद घालत असे.माझ्या प्रतीपादनामद्ये सकाळी लवकर उठणे, लवकर झोपणे, शाळेला जाणे, अभ्यास करणे, परिक्षेला बसणे, आईसक्रीम खायला मीळणे या बाबत माझी तक्रार असे. या व अशा अनेक बाबींबदल माझी तक्रार असे. माझं म्हंणण असे की, परमेश्वराने चांगल आणि वाईट सारखंच निर्माण केल आहे व ह्या जगाचा समतोल राखलेला आहे. अर्थात चमचमीत जेवल्यानंतर आमचा वाद संपुष्टात येत असे.

इतक्या वर्षांनंतर मी आता ह्या ‘कृतज्ञ असणा-या वृत्तीचा’ एक नवीन अर्थ लाऊ शकतो. हळुहळु माझ्या लक्षात आलं की माझ्या आजीचे मुद्दे मला पटलेले आहेत. मला असं जाणवल की, आपल्या सुप्त मनाच्या पातळीवर आपल्याला जे जे हवस वाटतं ते ते आपल्याला मिळतं. आपण सतत जर आपल्याकडे काय नाही होणार ह्यावर लक्ष केंन्द्रीत केले तर आपल्याला मिळणा-या सुखसोयी कमी होतील. अतिशय उच्च दर्जाची अस्मिता बाळगणा-या लोकांचीच अधिकाधीक निरनिराळ्या लोकांशी मैत्री असते. आयुष्यात सतत आनंदी असणारी माणसंच एक चांगल कार्यक्षम व यशस्वी आयुष्य काढू शकतात. मनुष्य स्वभाव स्वाभाविकत: काय नाही आहे हेच पाहत असतो. दहा गोष्टी बरोबर झाल्या व एक गोष्ट चुकीची झाली तर त्या चुकीच्या गोष्टिकडेच माणसांचे लक्ष केन्द्रित होते. तुम्हाला जे जे काही मिळालेलं नाही, आणि ज्या बद्दल तुम्ही सतत कष्टी आहात अशा गोष्टी आपल्याला नको होत्या म्हणुनच आपल्याकडे नाहीत असे समजा.

तर आपल्याकडे काय काय ‘चांगल’ जमा झाल आहे ह्याची एकदा यादी कर व ज्या कोणामुळे हे मिळणे शक्य झाल आहे त्या सर्वाचं ऋण माना.चला तर मग आपण माझ्या छानशा आजी पासुन सुरुवात करु या.