Print
Hits: 33097

अभ्यास कसा करावा?
आपण ज्यांना टीनएजर्स असे संबोधतो किंवा कीशोरवयीन मुलं म्हणतो- म्हणजे १३ ते १८ या वयोगंटातील मुले व अभ्यासांचा कंटाळा करणारी.मला माझ्या तीन इच्छा कोणत्या हे विचारले तर सांगेन - परीक्षा आणि अभ्यास नावाचे राक्षस नसावेत.

शिक्षकांनी आमच्याशी मित्राप्रमाणे  वागावे आणि शाळेत जाणे म्हणजे पिकनीक ला गेल्या सारखे वाटणे असे १४ वर्षाची सरीता सांगते.

सर्वसाधारणपणे किशोरवयीन मुले अभ्यांसाचा कंटाळा करतात.अभ्यास न करण्याची कारणे ती शोधत असतात. "माझ पोट आज दुखतंय मला आज बर वाटंत नाही किंवा मला सगळ येतयं. वैगरे बहुतेक वाक्य आईवडीलांना आपल्या मुलांकडुन ऎकायला मिळतात.

खुप अभ्यास करुन परीक्षेत चांगले यश मिळवणे हे मुलांच्या योग्य वाढीचे द्योतक आहे. अभ्यास न करणारी मुले आणि त्यांना अभ्यांसाला जबरदस्तीने बसवणारी पालक मंडळी या दोघांच्या वादविवादाने घरांच वातावरण पार बिघडुन जाते. म्हणुनच मुले का अभ्यास करत नाहीत, याची कारणे आपण अभ्यासली पाहीजेत.

१. अभ्यास करणे हे मुलांना कंटाळवाण वाटतं.बऱ्याचदा अभ्यासक्रम भरपुर असतो आणि अ अभ्यास आणि आपल्याला एवढा प्रंचड अभ्यास करायचा आहे, हे पाहुनच मुलांचा अभ्यासातला रस संपतो.

२. आमचे शिक्षक आम्हाला निट शिकवत नाहीत. किशोरवयीन मुलांना शिकवण्यात येणारे अनेक विषय असतात. ते योग्य रीतीने शिकवले तरच मुलांना रस वाटतो.

३. पाठांतराचा तीटकारा- अनेक मुले न समजताच धडाधड पाठंतर करतात. पण मध्येच एखादा विषय शब्द कींवा वाक्य विसरल तर प्रश्नाला उत्तर देणं त्यांना कठीण जातं. त्यामुळेच त्यांना परीक्षेत कमी मार्क मीळतात. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी लागणारा आत्मवीश्वास ते गमावतात.

४. अभ्यास करणे महत्वाचे आहे असं मला वाटंत नाही. बऱ्याच मुलांना अभ्यासांच महत्वच पटलेल नसतं.पालकांना वाटत असंत की, आपल्या मुलानी अभ्यास का करायचा हेच माहीत नसंत. आणि हेच माहीत नसल्याने त्यांचे अभ्यासांत लक्ष लागंत नाही.

५. "माझे आई-वडील माझ्याकडुन अति अपेक्षा करतात." अस अनेक मुलं म्हणतात. आई-वडीलांच्या अति अपेक्षामुळे मुलांवर दडपण येतं. मुले एकाग्र बनु शकत नाहीत. (या ठीकाणी सद्या चालु असलेल्या ’घरोघरी’ या उत्क्रुष्ट नाट्काची सहजच आठवंण यावे.)

६. काही वेळा मीत्रांच्या संगतीने , आई-वडील घटस्फोटीत आहेत, व्यसनी आहेत , एकमेंकाशी सतत भांडत असतात, मुलांला देखील सतत मारहाण करत असतात, त्याने मुलं अभ्यासात मागे पडतात.

७. काही वेळा मीत्रांच्या संगतीने अभ्यास करण्यांच मुलं टाळतात. अभ्यास आपल्या मीत्राला आवडत नाही, म्हणुन त्यांना पण आवडत नाही. कारण आपण जर का अभ्यास मधे रस दाखवला तर ग्रुप मधे बाहेर फेकले जावु अशी त्यांना भीती असते.

अभ्यासांने प्रत्येक व्यक्त्तीचा मनाचा, बुध्दीचा मोठया पमाणावर विकास होतो.आपल्या आजुबाजुच्या वातावरणांची माहीती होते, ते समजुन घेता येते. स्व:ताच्या प्रगतीसाठी अभ्यासाची अत्यंत आवश्यकता असते आणि म्हणुन किशोररवयात हे अभ्यास तर भरपुर करतात. पण त्यानी त्यांचा अभ्यास कसा करतात याचा नोंदी पण दीलेल्या आहेत. त्यामुळे मुलांना आपला अभ्यास नक्कीच सुधारता येईल.

१. तुमचे अभ्यासाचे टेबल, टीव्ही, स्वयंपाकघर हे ट्रँफिक्च्य आवाजापासुन दुर असायला हवे. टेबलावर काँमीक्स व गोष्टीची पुस्तके नसावीत.

२. शक्य असेल तर अभ्यासाची एक ठरावीक वेळ असावी, म्हणजे त्या वेळेत अभ्यासात तुमंच मन एकाग्र होण्यास मदत होईल. रविला रात्री दहानंतर अभ्यास करायला आवडतं. कारण त्यावेळी सर्वजण झोपलेले अस्तात आणि सर्वत्र शांतता असते.

३. सर्वसाधारण प्रत्येक व्यक्ती ४५ मीनीटं ते १ तास एकाग्र राहु शकते. त्यानंतर एकाग्रता भंग होवु लागते. म्हणजेच जेव्हा एखादा किशोर वयीन मुलगा एकच पाठ एक तासापेक्षा जास्त वेळ वाचत असतो. तेव्हा त्याची स्मरण करणे त्याला कठीण जांत. त्याही पेक्षा जेव्हा मुलगा तीन तास सलग अभ्यास करीत असतो. तेव्हा त्यांची स्मरण्शक्त्ती कमी होते. आणि तो अधिक विस्मरणशील होतो . म्हणुनच कीशोरयीन मुलांनी सर्वसाधारणपणे तासभरच अभ्यास करायला हवा. त्यानंतर १०-१५ मीनिटांचे मध्यंतर घेऊन मग पुन्हा अभ्यासाला सरुवात करावी. यामुळे स्मरणशक्ती ताजीतवानी राहते आणि अभ्यासक्रम चटकन लक्षात यायला मदत होते.

४. छोट्या मंध्यतराप्रमाणे मुलांनी काही काळ खेळण्यात, मीत्रांशी गप्पा मारण्यात, टीव्ही बघण्यात घालवला पाहीजे. यामुळे मुलांना जीवनावीषयी आस्था वाटते आणि अभ्यास करताना उस्ताह येतो.

५. रोज अभ्यास करायची सवय ठेवा, म्हणजे परीक्षेच्या वेळी ताण जाणवार नाही.

६. एखादा धडा वाचताना तो नेमका कशाबद्दल आहे ते जाणुन घ्या.त्यातील मुद्याची शीर्षके, धड्याची प्रस्तावना आणि सारांश नीट वाचा. यामुळे धड्याची नीट ओळख होते.

७. वाचुन झाल्यांनंतर पुस्तक बंद करुन, तुम्ही जे वाचंल आठवण्याचा प्रयत्न करा. केलेला अभ्यास लिहुन काढणे सर्वात उत्तम. त्यामुळे तुम्ही तुमची उत्तरे आधीक चांगल्या तर्हेने लीहु शकता. आणि तुमचा गोंधळ उडत नाही. शिवाय लीखाणामुळे तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या स्मरणात राहतो. शिकण्याची क्षमता ही माणसाला मीळालेली महान देणगी आहे. तिचा उपयोग करा. आणि आयुष्यात यशस्वी व्हा.